स्किन केअर रूटीनमध्ये करा दुधाचा वापर आणि दिसा अधिक तरूण!

लहानपणापासूनच दुधाचे किती फायदे (Benefits of Milk) असतात हे आपल्या मनावर अगदी बिंबविण्यात येते. दूध पिण्याचा तर नेहमीच सल्ला दिला जातो. पण दुधाचा केवळ शरीरासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीही तितकाच फायदा होतो हेदेखील सांगण्यात येते. पण तुम्ही त्याचा योग्य वापर करून घेता का? कारण दूध हे केवळ पिण्यासाठीच वापरण्यात येते. तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दुधाचा वापर (Use of Milk for Skin) करता येईल याचा विचार फारच कमी महिला करतात. कधी उपयोग जरी केला असेल तरी कच्च्या दुधाचा क्लिंन्झर (Cleanser) म्हणून वापर करून अनेक महिला थांबल्या असतील. तुम्ही अधिक तरूण दिसण्यासाठी अर्थात तुमची त्वचा अधिक तुकतुकीत राहण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर नियमित करायला हवा. कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये (Skin Care Routine) दुधाचा वापर करून घेऊ शकता हे आपण जाणून घेऊया. 

सुरकुत्यांवर फायदेशीर (Milk use for skin aging)

Milk use for skin aging – Freepik.com

स्किन एजिंग अर्थात चेहऱ्यावर सुरकुत्या येणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही जणांच्या चेहऱ्यावर याचा परिणाम खूप लवकर दिसून येतो. पण कोणत्याही पार्लरमध्ये जाऊन पैसे घालविण्यापेक्षा तुम्ही दुधाच्या मदतीने या सुरकुत्या कमी करू शकता. यासाठी तुम्हाला एक वाटी दूध घ्यावे लागेल आणि त्यानंतर त्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर हे दूध लावा आणि साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर वरच्या बाजूच्या दिशेने मसाज करा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नक्की फरक दिसून येईल. 

एक्सफोलिएटर (Exfoliator)

दुधाला एक उत्तम एक्सफोलिएटर मानले जाते. नुसत्या दुधाकडे पाहून तुम्हाला याचा अंदाज नक्कीच येणार नाही. मात्र कच्च्या दुधात बेसन मिसळून तुम्ही हे चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने घासल्यास, उत्तम एक्सफोलिएटर म्हणून याचा उपयोग होतो. हे मिश्रण चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स (Dead Skin Cells) काढून टाकण्यास मदत करते आणि चेहऱ्यावरील चमक ही दुप्पट होण्यास मदत मिळते. 

सनबर्न (Sunburn)

Milk use for Sunburn – Freepik.com

सनबर्न जास्त झाल्यास कच्च्या दुधाने त्वचेला आधार मिळतो. दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे सनबर्नचे निशाण मिटविण्यास मदत करते. तुम्हाला रोज उन्हात जावं लागत असेल तर तुम्ही रोज झोपण्याच्या आधी दुधात कापूस भिजवा आणि चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिट्सने चेहरा धुवा.  यामुळे सनबर्नचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुमची त्वचा अधिक चांगली राहील आणि तरूण दिसेल. 

कोरड्या त्वचेला म्हणा बाय-बाय! (Bye-Bye to Rough Skin)

तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर फाटलेल्या दुधाच्या पाण्याने तुम्ही व्यवस्थित करू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते. यापासून तुम्ही नाईट सीरमही (Night Serum) तयार करू शकता. फाटलेल्या दुधात लिंबाचे थेंब, ग्लिसरीन आणि मीठ मिक्स करून तुम्ही एकत्र मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही त्वचेला लावा आणि झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. कोरडी त्वचा हळूहळू तुम्हाला हायड्रेड झालेली दिसून येईल. तसंच त्वचा अधिक मुलायमही होईल. 

मॉईस्चराईजिंग इफेक्ट (Moisturizing Effect)

Milk use for Moisturizing – Freepik.com

दुधाचे वेगवेगळे कॉम्बिनेशन फेसपॅक बनवून तुम्ही त्वचा मॉईस्चराईज करू शकता. हे केमिकलयुक्त नसल्याने अधिक फायदेशीर ठरते आणि त्वचा अधिक चांगली दिसते. 

  • दुधात मुलतानी माती (Multani Mitti) मिक्स करून फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील डाग निघून जातात आणि चेहऱ्यावर येणाऱ्या तेलावरही नियंत्रण राहाते. तसंच त्वचेत कसाव आणण्यासाठीही (Skin Tightening) याचा उपयोग होतो आणि चेहऱ्यावर मुलायमपणा टिकून राहातो
  • तुम्हाला मुलतानी मिट्टी चालणार नसेल तर तुम्ही चंदन पावडरचाही (Sandalwood Powder) वापर करू शकता 
  • चंदन पावडरशिवाय ओटमील आणि दूध मिक्स करूनही याचा फेसपॅक वापरू शकता. हा फेसपॅक तुमच्या त्वचेवरील चमक वाढविण्यासाठी आणि त्वचा अधिक चांगली करण्यासाठी उपयोगी ठरतो

विशेष सूचना – हा लेख आम्ही तुमच्या माहितीसाठी देत आहोत. यात सांगितलेले उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या. 

Leave a Comment