या Homemade Face Scrub मुळे पोर्स राहतील स्वच्छ

त्वचेची काळजी (Skin care) घेणे हे प्रत्येकाला आवडते. तर प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते आणि त्वचेची काळजी घेण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगळी असते. पण जेव्हा पोर्स स्वच्छ करण्याची गोष्ट असते, तेव्हा अनेक महिला आपली त्वचा एक्सफोलिएट (Skin Exfoliate) करतात आणि त्यासाठी बाजारातून वेगवेगळ्या पद्धतीचे फेसस्क्रब (Face Scrub) महिला खरेदी करताना दिसतात. पण आजकाल नैसर्गिक उत्पादनांवरही जास्त भर दिल्याचे दिसून येते. पण या उत्पादनांची किंमत खूपच जास्त असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी कसा स्क्रब बनवाल जो अत्यंत नैसर्गिक असून पोर्स स्वच्छ राहतील यासाठी ही माहिती. याचा वापर करून तुम्ही पोर्स स्वच्छ करून चेहऱ्यावर अत्यंत नैसर्गिक तजेलदारपणा आणू शकता. जाणून घेऊया स्क्रब बनविण्याची पद्धत आणि याचे फायदे. 

आवश्यक साहित्य (Ingredients To Make Face Scrub)

सौजन्य – Freepik.com
  • 2 मोसंबीची साले (Mosmbai aka Sweet Lemon)
  • 2-3 चमचे बदामाचे तेल (Almond Oil)

बनविण्याची पद्धत (How To Make Face Scrub At Home)

  • घरी फेसस्क्रब बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही मोसंबीची सालं व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घ्या 
  • त्यानंतर ही सुकलेली सालं हातांनी नीट वाटून घ्या (हाताने जमणार नसेल तर मिक्सरला लावा)
  • या पावडरमध्ये तुम्ही 2-3 चमचे बदामाचे तेल मिक्स करून घ्या. हे व्यवस्थित मिक्स केल्यावर स्क्रब तयार होईल
  • आता हलक्या हाताने तुम्ही चेहऱ्यावर मसाज करा 
  • कमीत कमी 5-10 मिनिट्स तुम्ही अशा पद्धतीने मसाज करत राहा 
  • त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा 
  • हे तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळा वापरू शकता 

मोसंबी आणि बदामाच्या तेलाचे फायदे (Benefits of Sweet Lemon and Almond Oil)

सौजन्य – Freepik.com
  • बदामाचे तेल हे त्वचेमधील असणाऱ्या पेशींना जीवनदान देण्यास मदत करते 
  • त्वचेमध्ये निर्माण होणारा कोरडेपणा दूर करण्यासाठी बदामाचे तेल उत्कृष्ट ठरते 
  • यामध्ये असणारे तत्व त्वचेमधील एजिंग सायन्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते 
  • बदामाचे तेल त्वचेला अधिक तकाकी मिळवून देण्यास लाभदायक ठरते 
  • मोसंबीमध्ये असणारे कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरस त्वचेला फायदेशीर ठरते 
  • तसंच यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते आणि त्याशिवाय चेहऱ्यावर उजळपणा आणण्यास मदत करते

हे घरगुती फेसस्क्रब (Homemade Face Scrub) नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला आम्ही सांगितलेली ही फेसस्क्रबची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा. तसंच तुम्ही हे वापरण्यापूर्वी २४ तास आधी पॅच टेस्ट नक्की करून पाहा. त्यामुळे जर एखाद्या पदार्थाची अलर्जी असेल तर त्वचेला नुकसान पोहचणार नाही आणि तुमची त्वचा तशीच नितळ राहण्यासाठी आणि पोर्स स्वच्छ राहण्यासाठी तुम्हाला या फेसस्क्रबचा वापर करून घेता येईल. 

Beauty Care Tips: टॅनिंगमुळे चेहरा झाला असेल काळा, तर वापरा दही

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

मानेवरील मळ कसा काढाल, सोप्या टिप्स

Leave a Comment