चेहऱ्याला कधीही लावू नका लिंबू (Lemon), त्वचेचे होईल मोठे नुकसान

 त्वचा चांगली सगळेच वेगवेगळे प्रयत्न करतात. ब्युटी इंडस्ट्री देखील आता इतकी प्रगत झाली आहे की, तुमच्या कोणत्याही त्वचेच्या समस्येसाठी इलाज आता उपलब्ध आहे. कितीही ट्रिटमेंट्स असल्या तरी देखील खूप जणांना नैसर्गिक आणि कोणतेही केमिकल नसलेले उपाय अधिक जास्त जवळचे आणि सुरक्षित वाटतात. होम रेमिडीज (Home Remedies) या लोकांना अधिक जवळच्या वाटतात. त्यामुळे चेहऱ्यावर वेगवेगळ्या घटकांचा प्रयोग हल्ली अनेक जण करतात. त्यापैकी एक प्रमुख गोष्ट म्हणजे लिंबू (Lemon). खूप जण आपल्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये लिंबाचा मोठ्याप्रमाणात वापर करते. क्लिन्झिंग आणि व्हिटॅमिन C ने युक्त असलेले असे लिंबू चेहऱ्याला लावणे जितके चांगले तितकेच वाईट आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हीही लिंबाचा उपयोग करत असाल तर तुम्हाला त्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान माहीत असायला हवे.

लिंबामध्ये नेमके कोणते घटक असतात?

लिंबू करु शकते त्वचेचे नुकसान

लिंबू हे सीट्रस गटातील फळ असून त्याचा उपयोग स्वयंपाकात अनेक वेळा केला जातो. लिंबाचा आबंट रस ज्यूस आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी खूपच फायद्याचा असतो. लिंबाचा गर, त्याची साल यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C आहे. जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते. पचनशक्ती चांगली करण्यासाठीही लिंबू हे उत्तम आहे. लिंबू हे ॲसिडीक असे फळ असून त्याचा उपयोग केवळ जेवणातच नाही तर सौंदर्यप्रसाधनांमध्ये, किचन क्लिनिंगमध्ये याचा उपयोग केला जातो. त्यामुळे लिंबामध्ये असलेला व्हिटॅमिन C हा घटक त्वचेसाठी खूपच फायद्याचा असतो. 

लिंबाच्या रसामुळे होऊ शकते का त्वचेचे नुकसान

 लिंबाचा रस किंवा लिंबू हे फळ कितीही चांगले असले तरी त्याचा उपयोग हा त्वचेसाठी तसा नुकसानकारक ठरु शकतो. त्वचेवर लिंबाचा प्रयोग केल्यानंतर नेमके काय नुकसान होऊ शकते चला घेऊया जाणून 

  1.  लिंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲसिड असते. त्वचा ही नाजूक असते ज्यावेळी तुम्ही त्वचेवर लिंबाचा रस लावता त्यावेळी त्या ॲसिडचा परिणाम त्वचेवर होऊ लागतो. त्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. 
  2. ज्यांची त्वचा संवदेनशील आहे अशांनी तर लिंबाचा थेट प्रयोग टाळायला हवा. कारण जर अशा त्वचा असणाऱ्यांनी लिंबू थेट लावला तर त्यामुळे त्वचेवर चट्टे येऊ शकतात. 
  3. जर तुमची त्वचा कोरडी प्रकारातील असेल तर लिंबाचा रस तुम्ही चेहऱ्याला मुळीच लावू नये. कारण चेहऱ्याला जर लिंबाचा रस लावला तर त्यामुळे चेहरा अधिक कोरडी होते. त्वचा अधिक कोरडी झाली की, चेहऱ्याला खाजही येऊ लागते. 
  4. जर तुम्ही लाईटनिंग एजंट म्हणून लिंबाचा उपयोग करत असाल तर तसे अजिबात करु नका. कारण लिंबाचा रस त्वचेवर लावल्यामुळे त्वचा अधिक काळी पडण्याची शक्यता अधिक असते. 
  5. मृत त्वचा काढण्यासाठी लिंबाचा रस वापरला जातो. पण त्यामुळे त्वचेची जळजळ अधिक वाढू शकते. शिवाय त्यामुळे त्वचा कायमची नाजूक होऊ शकते. 

आता लिंबू चेहऱ्याला लावताना थोडासा या गोष्टींचा विचार करा.

Leave a Comment