Bigg Boss : शिवला पडेल का सलमानचा ओरडा, अर्चना येणार का परत

बिग बॉसच्या घरात मोठे रामायण घडल्यानंतर अर्चनाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. घरात हिंसेला जागा नाही हे कारण देऊन अर्चनाला घराबाहेर काढण्यात आला. घरातील इतरांच्या मनातही तेच होते. पण येणारा वीकेंडचा वार हा आपल्या मराठमोळ्या शिव ठाकरे (Shiv Thakre) साठी थोडा कठीण असणार आहे अशी चर्चा होऊ लागली आहे. अर्चनाची चुकी होतीच पण तिला राग आणण्यासाठी थोड्याफार प्रमाणात शिव कारणीभूत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द अर्चनाच्या पेजवरच हा व्हिडओ पडल्यामुळे शिवला सममानचा थोडासा ओरडा खावा लागतो की, काय असे सध्या दिसत आहे. यासोबतच अर्चना पुन्हा परत येण्याच्या बातम्याही सध्या जोर धरु लागल्या आहेत. 

काय झाले आठवडाभरात?

अब्दू कॅप्टन झाल्यापासून अर्चनाने त्याला त्रास देण्याचे काही सोडले नाही. त्याला कॅप्टन बनवण्यासाठी ती पुढे असली तरी देखील तो कॅप्टन झाल्यानंतर तिला देण्यात आलेल्या ड्युटीमुळे अर्चनाचा राग अब्दूवर होता. तिने अब्दूला अनेकदा परदेशी नागरिक, तो लहान नाही, त्याला काही वेगळ्या गोष्टी देण्याची गरज नाही किंवा फिरंगी असे अनेकदा हिणवले. त्याच्या चुका शोधण्यासाठी तिने त्याला प्रचंड त्रास दिला. त्यावेळीही तिला आवरण्याचा प्रयत्न शिवने केला होता. त्याच्यातील ही शाब्दिक भांडण नक्कीच पाहण्यासारखी होती. त्यामध्ये कोण खरा कसा हे देखील कळत होते? अर्चनाच्या या वागण्याला घरातील कोणीच समर्थन दिले नाही. गौरीनेही तिला या बद्दल सांगितले होते की, तुझी आठवड्याच्या शेवटी शाळा घेतली जाणार आहे. पण तरीही अर्चना थांबली नाही. इतकेच नाही तर अनेकदा अर्चना खूप खासगी बाबतीत बोलताना दिसते. 

 अब्दूला तर तिने त्रास दिलाच पण सुम्बुललाही तिने काही सोडले नाही.  सुम्बुल तू कोण आहेस? तू आयुष्यात पुढे गेली नाहीस? तू तूझ्या बापाची होऊ शकली नाही? वगैरे वगैरे ती जे काही बोलली त्यामुळे सुम्बुल आधीच तिच्यावर चिडली होती. त्यामुळे एकाच आठवड्यात तिने इतके राडे केले आहेत की, तिला ओरडा पडणे साहजिक आहे.  

त्यातच शिवसोबत जो काही वाद झाला. तो वाद किचनचे साहित्य लपवण्यावरुन झाला होता. तिने किचनचे साहित्य लपवल्यामुळे झाला होता. त्यानंतर तो वाद थोडासा इकडे तिकडे भरकटू लागला ही गोष्ट खरी असली तरी देखील त्या वादात शिवने वापरलेला ‘दिदी’ हा शब्द अर्चनाला असा काय लागली की, त्यामुळे तिने भावनेच्या भरात त्याचा जोरात गळा आवळला. घरातल्यांना तिचे हे वागणे अजिबात रुचले नव्हते.  

शिवला बसेल का ओरडा 

शिव आतापर्यंत खेळात फारच उत्तम राहिला आहे. त्याने कायम सत्याची साथ दिलेली आहे.  कालही ज्यावेळी त्याला नेमके काय झाले याबद्दल विचारण्यात आले त्यावेळी त्याने मी ‘दिदी’ असे चिडवले ही गोष्ट मान्य केली. त्याबद्दल त्याने माफीही मागितली. पण त्या आधी त्याने अर्चनाला फक्त ‘दिदी’ म्हणा ती खूप चिडते असे सांगितले. तिची पार्टी आणि पॉलिटिकल करिअर याबद्दल बोलण्याच प्रवृत्त केल्याचे दिसले. कदाचित त्यामुळे त्याला सलमानचे ऐकून घ्यावे लागेल असे काहीसे दिसत आहे. अर्चनाचे कान पिळताना शिवलाही त्याचा थोडा फटका बसेल यात काहीही शंका नाही. 

अर्चना येणार का परत? 

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अर्चना परतणार आहे. वीकेंडच्या दिवशी सलमान तिला घेऊन येणार आहे. तिला घरात परत आणणार म्हटल्यावर शिवला त्याचा फटका बसेल याची जाणीव होऊ लागली आहे. आजचा एपिसोड येईपर्यंत खूप जणांना शिवला त्यामुळे काही त्रास होईल का? किंवा शिक्षा होईल का? याची भीति वाटू लागली आहे. 

नेमकं काय होईल यासाठी आज रात्रीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 

Leave a Comment