पडळकरांची जरांगेवर अप्रत्यक्ष टीका, “धनगर वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव”, !

पंढरपूरच्या सभेत पडळकरांनी जरंगेंवर सडकून टीका केली. नाव न घेता ते जरंगेंना अर्धवटराव म्हणाले. ते म्हणाले, “ झपाटलेला पिक्चरमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातात एक अर्धवटराव नावाचा एक बाहुला असतो. त्याची तार खेचली तसा तो बोलचो. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक अर्धवटराव तयार झालेत.

तसेच पुढे ते म्हणाले की धनगर, वंजारी एनटी आहेत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. भुजबळांच्या नादी लागून हे समाज उगाच आक्रमक होत आहेत. हे दोन्ही समाज स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्रीय नोकरी शिक्षणातलं ओबीसीतून आरक्षण भोगतात.” अशी भूमिका मांडली. आता जरांगे यावर काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार  आहे!

भीमसैनकांनी सोबत लढावं पडळकरांचे आवाहन!

ओबीसी आरक्षण बचाव लढा अधिक व्यापक होणार असल्याची चिन्हे निर्माण झालियेत. आमदार पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातली. “एकीकडे आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं. दुसरीकडे गावबंदी करायची, आमच्यावर बहिष्कार टाकायचे हे प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहेत.” असं पडळकर म्हणाले. बाबासाहेबांनी ओबीसी हा शब्द पहिल्यांदा वापरल्याची आठवण त्यांनी करुन दिली. बाबासाहेबांना थेट ओबीसी आरक्षण प्रश्नाशी यशस्वीपणे जोडल्याचं पहायला मिळतंय. कोळी बांधवांना ओबीसी ऐवजी एसटी प्रवर्गात आरक्षण द्या. अशी भूमिका त्यांनी मांडली.

पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातलीये. ओबीसी समूहांची राज्यात मोठी संख्या आहे. सोबतच दलित समूह घेतल्यास सरकारवर मोठा दबाव येवू शकतो अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Leave a Comment