Mihir Kotecha | ‘मानखुर्दचे मिनी पाकिस्तान होऊ देणार नाही’, प्रचारादरम्यान दगडफेकीनंतर मिहीर कोटेचांचे आव्हान

नॉर्थ ईस्ट अर्थात ईशान्य मुंबईचे उमेदवार असणारे मिहीर कोटेचा याच्या प्रचाराच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, ‘काल माझी मानखुर्दमधून प्रचार रॅली सुरू असताना परत एकदा संजय पाटलांच्या ‘टोपीवाल्या गुंडांनी ‘ मला इजा पोहचवण्याचे उद्देशाने माझ्यावर दगड भिरकवला पण दुर्दैवाने माझ्या भगिनी भाजपाच्या कार्यकर्त्या निहारिका प्रकाशचंद्र खोंदले यांना मानेवरती दगड लागला आणि मार बसला आहे.’ असे मिहीर कोटेचा यांनी सांगितले आहे. 

संजय पाटीलला आव्हान

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत संजय पाटील यांच्यावर मिहीर कोटेचा यांनी निशाणा साधलाय. तर सध्या मानखुर्द क्षेत्राला संजय पाटील हे मिनी पाकिस्तान बनवत असून ते कदापी होऊ देणार नाही. तर १ मे रोजी मानखुर्दमध्ये येणार असल्याचे खुलेआम आव्हान त्यांनी यावेळी दिलंय.  

महाराष्ट्र दिनाला येणारच..

१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा पाठीमागून नाही असे आव्हान यावेळी संजय पाटलांना निशाणा साधत मिहीर कोटेचा यांनी दिलंय. 

Leave a Comment