Beauty Care Tips: टॅनिंगमुळे चेहरा झाला असेल काळा, तर वापरा दही

टॅनिंग (Tanning) बाबत महिलांना वेगवेगळे समज आहे. काही जणींचं म्हणणं असतं की, टॅनिंग केवळ उन्हात बाहेर गेल्यामुळे होतं, तर काहींना वाटतं केवळ उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या उद्भवते. पण टॅनिंगची समस्या (Tanning Problem) ही सर्व हंगामात आणि प्रत्येक स्किन टाईपच्या महिलांना होते. रक्त गोठवणारी थंडी असो वा धो धो पाऊस असो तरीही तुम्ही टॅन होऊ शकता. त्यामुळे तुमच्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ सनस्क्रिन (Sunscreen) लावण्यामुळे टॅनिंगपासून तुमचे रक्षण होत नाही. तर त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय (Home Remedies) करण्याचीदेखील गरज आहे. यासाठी एक सोपा आणि स्वस्त उपाय जो तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातही सापडतो, तो म्हणजे दही. चेहऱ्यासाठी दह्याचा वापर (Curd For Face) टॅनिंगची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठररतो. कारण हे एक नैसर्गिक स्किन एक्सफोलिएटर (Skin Exfoliator) आहे. टॅन झालेल्या त्वचेसाठी दह्याचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या. 

दही, हळद आणि रवा (Curd, Turmeric and Suji)

सौजन्य – Freepik.com

साहित्य 

 • 1 मोठा चमचा दही
 • 1 चिमूट हळद
 • 1 मोठा चमचा रवा 

बनविण्याची पद्धत 

 • एका बाऊलमध्ये दही, हळद आणि रवा मिक्स करून घ्या आणि हळूहळू चेहऱ्यावर स्क्रब करा
 • 2 मिनिट्स स्क्रब केल्यावर साधारण 15 मिनिट्स हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच ठेवा 
 • त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा
 • आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही हा घरगुती फेसस्क्रब (Homemade Face Scrub) वापरलात तर तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतील

DM Tips – तुमची त्वचा अधिक कोरडी असेल तर तुम्ही अर्धा चमचा मधाचादेखील या स्क्रबमध्ये मिक्स करून वापर करू शकता. मध तुमच्या त्वचेला अधिक चांगले मॉईस्चराईज करण्यात मदत करते. 

दही, बेसन आणि गुलाबपाणी (Curd, Besan and Rose Water) 

सौजन्य – Freepik.com

साहित्य 

 • 1 मोठा चमचा दही
 • 1 लहान चमचा बेसन 
 • 1 लहान चमचा गुलाबपाणी

बनविण्याची पद्धत 

 • एका बाऊलमध्ये दही घ्या. त्यात बेसन आणि गुलाबपाणी मिक्स करून मिश्रण बनवा
 • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्स तसंच राहू द्या
 • त्यानंतर तुम्ही चेहरा हळूहळू हाताने रगडून चेहऱ्यावरील फेसपॅक काढा. असं केल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे चेहरा स्वच्छ होतो. चेहऱ्यावरील टॅनिंग जाण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर उजळपणा येतो

DM Tips – तुमच्या त्वचेवर पिंपल्स आले असतील, तर ते ठीक झाल्यानंतरच तुम्ही बेसनाचा वापर करावा. तसंच तुमच्या त्वचेला बेसनापासून अलर्जी असेल तर बेसनाच्या जागी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता. 

दही आणि तांदळाचे पीठ (Curd and Rice Flour)

सौजन्य – Freepik.com

साहित्य 

 • 1 मोठा चमचा दही
 • 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ 

बनविण्याची पद्धत 

 • एका बाऊसमध्ये दही आणि तांदळाचे पीठ मिक्स करून फेसपॅक तयार करून घ्या 
 • आवश्यकता असल्यास, यामध्ये कोरफड जेल (Aloe Vera Gel) आणि मध (Honey)देखील मिक्स करू शकता. यामुळे तुमची त्वचा डीप क्लिन होण्यासह चांगली मॉईस्चराईज्डही राहाते
 • 15 मिनिट्स चेहऱ्यावर हे मिश्रण तसंच राहू द्या आणि मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा 
 • आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करून घ्या. याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल आणि त्वचेवरील टॅन निघून जाईल

DM Tips – हा फेसपॅक टॅनिंग दूर करण्यासह तुमच्या त्वचेवर कसावटही आणेल कारण दही आणि तांदळाचे पीठ दोन्हीमध्ये अँटिअलर्जी घटक असतात. 

वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा प्रयोग चेहऱ्यावर करण्यापूर्वी तुम्ही एक दिवस आधी स्किन पॅच टेस्ट नक्की करून पाहा. जर तुम्हाला त्रास झाला नाही तरच तुम्ही याचा वापर तुमच्या चेहऱ्यावर करा. 

मानेवरील मळ कसा काढाल, सोप्या टिप्स

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

लग्नानंतर होतोय पिंपल्सचा त्रास ही असू शकतात कारण

Leave a Comment