मासिक पाळीदरम्यान कशी घ्याल त्वचेची काळजी, सोप्या टिप्स

हार्मोनल बदलाच्या (Hormonal Changes) कारणांमुळे महिलांना केवळ मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) दरम्यानच नाही तर त्याच्या आधी काही दिवस आणि नंतर काही दिवसही त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो. कधीतरी त्वचा कोरडी पडते, तर चेहऱ्यावर पुळ्याही येतात. काही मुलींची वा महिलांची त्वचा कोरडी पडते वा त्वचेवर निस्तेजता येते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान नक्की त्वचेची काळजी (Skin Care) कशी घ्यायची याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  

करा त्वचेची योग्य देखभाल (Take Care of Skin Perfectly)

शरीरात हार्मोनल बदल होतच असतात. यामुळे केवळ मूडच बदलत नाहीत तर त्वचेची गरजही बदलत असते आणि त्वचेच्या गरजा पूर्ण न झाल्यासश अथवा त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास, त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे हार्मोनल सायकल तीन भागात विभागण्यात येते, मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळीदरम्यान आणि मासिक पाळीच्या नंतर. या तिन्ही वेळी त्वचेची काळजी घ्यायला हवी. 

मासिक पाळीच्या आधीचा कालावधी 

मासिक पाळी येण्याच्या सात दिवसाआधीच्या कालावधीला प्री मेन्स्ट्रूअल पिरियड (Pre Menstrual Period) असे म्हटले जाते. या सात दिवसात अॅस्ट्रोजनचा स्तर कमी आणि प्रोजेस्टेरॉनचा स्तर वाढतो. त्यामुळे त्वचा अत्यंत संवेदनशील असते. यामुळे चेहऱ्यावर पुळ्या येणे अथवा चेहरा सुजणे अशा गोष्टी घडताना दिसतात. 

या कालावधीत कशी घ्याल काळजी (How To Take Care Of Skin During Premenstrual Period)

फेसवॉश (Face Wash)

Face Wash – Freepik.com

त्वचेच्या सुरक्षेसाठी सॅलिसिलिक अॅसिडयुक्त फेसवॉशचा वापर तुम्ही करावा. यामुळे त्वचेवरील ओपन पोर्स (Open Pores) बंद होतात आणि चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमांचा त्रास होत नाही. मासिक पाळीच्या तारखेचा प्रत्येक महिलेला अंदाज असतो. तुम्हाला जर रोज असे फेसवॉश वापरायचे नसेल तर त्या कालावधीच्या आसपास तुम्ही हे वापरावे आणि आपल्या त्वचेची काळजी घ्यावी. 

मॉईस्चराईजर (Moisturizer)

नियमित वापरण्यात येणाऱ्या मॉईस्चराईजरपेक्षा तुम्ही ऑईल फ्री (Oil Free) आणि जेल बेस्ड मॉईस्चराईजर (Gel Based Moisturizer) वापरावे. हे तुमच्या त्वचेला अधिक मॉईस्चराईज करण्यासह चेहऱ्याची काळजी घेण्यास उपयुक्त ठरते आणि चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमांना रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

मासिक पाळीचा कालावधी (Menstrual Period)

मासिक पाळीच्या कालावधीदरम्यान अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्हीची पातळी घटते आणि त्यामुळे चेहऱ्यावर पुळ्या येण्याची समस्या बऱ्यापैकी कमी असते. मात्र त्वचेवर निस्तेजपणा दिसून येतो आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज दिसून येते. 

मासिक पाळीच्या कालावधीत कशी घ्याल काळजी (How To Take Care Of Skin During Menstrual Period)

फेसवॉश (Face Wash)

त्वचेच्या सुरक्षेसाठी पीएच बॅलेन्स (PH Balance) फेसवॉशचा वापर तुम्ही करावा. मासिक पाळीच्या कालावधीत चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी असा फेसवॉश अधिक उपयुक्त ठरतो. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही फेसवॉशच्या ऐवजी क्लिंन्झिंग लोशन (Cleansing Lotion) देखील वापरू शकता. 

मॉईस्चराईजर (Moisturizer)

Moisturizer – Freepik.com

मासिक पाळी दरम्यान त्वचा अत्यंत कोरडी होते, त्यामुळे मॉईस्चराईजरकरडे दुर्लक्ष करू नका. त्वचेवर याचा वापर नक्की करा. मासिक पाळीच्या दिवसात त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज करा. जेणेकरून त्वचा अधिक मुलायम आणि तुकतुकीत राहू शकते.  

मासिक पाळीनंतरचा कालावधी (Post Menstrual Period)

Menstrual Period – Freepik.com

मासिक पाळीनंतरच्या कालावधीला पोस्ट मेन्स्ट्रूअल पिरियड असं म्हटलं जातं. या दरम्यान अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्हीची पातळी ही संतुलित होते. ज्यामुळे त्वचा पुन्हा पहिल्यासारखी दिसू लागते. अशा स्थितीत काहीही करण्याची जास्त गरज भासत नाही. मात्र तुम्ही नियमित त्वचेची काळजी अर्थात रूटीन दुर्लक्षित करण्याची चूक करू नका. 

या कालावधीत कशी घ्याल काळजी (How To Take Care Of Skin During Post Menstrual Period)

Skin care during period – Freepik.com

फेसवॉश (Face Wash)

रोज दिवसातून दोन ते तीन वेळा चांगल्या फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा अधिक तुकतुकीत आणि स्वच्छ होईल.  

मॉईस्चराईजर (Moisturizer)

चेहरा धुतल्यानंतर त्वरीत चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा. मॉईस्चराईजर लावल्याने त्वचा कोमल आणि मुलायम राहाते. 

सनस्क्रिन (Sunscreen)

मासिक पाळीच्या दिवसात आणि त्यानंतरही घरातून बाहेर निघताना तुम्ही उन्हापासून वाचण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करावा. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करून घेता येतो. 

मेकअप रिमूव्हर (Makeup Remover)

मेकअप काढल्याशिवाय झोपण्याची चूक अजिबात करू नका. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हल लोशनचा (Makeup Removal Lotion) वापर करावा. 

स्मार्ट टिप्स (Smart Tips)

  • मासिक पाळीदरम्यान त्वचेची काळजी घ्यायची असेल तर या दिवसात डेअरी उत्पादने अर्थात दूध, दही, तूप, पनीर हे अति खाऊ नका. यामुळे चेहऱ्यावर मुरूमं येण्याची शक्यता वाढते 
  • आठवडाभर चॉकलेट्स खाऊ नका. मासिक पाळीदरम्यान चॉकलेट्स हे सौंदर्याचे शत्रू अधिक होतात असं म्हटलं जातं
  • जंक फूड, तळलेले पदार्थ, मसालेदार खाणे यापासून सहसा दूर राहा. याच्या सेवनामुळे तुम्हाला मुरूमांचा अधिक त्रास होतो
  • मासिक पाळीदरम्यान कोमट पाण्याने आंघोळ करा. अधिक गरम वा थंड पाण्यामुळे त्वचा खराब होण्याची अधिक शक्यता असते 
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीच्या दिवसात अधिकाधिक पाणी प्या. यामुळे त्वचा चांगली राहाते आणि त्वचेवरील चमकही टिकून राहाते

तुम्हाला आमच्या या टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच मासिक पाळीच्या तुमच्या तारखेच्या दरम्यान तुम्ही काळजी घ्या. 

Leave a Comment