लग्नासाठी ठरतेय पांढऱ्या रंगाची साडी ट्रेंडिंग, कोणत्या साडीची करा स्टाईल

नटणे – सजणे हे सर्वच महिलांना आवडते. रोज जमत नसले तरीही कोणाच्या लग्नात वा कार्यक्रमाला जाण्यासाठी तर आपण तयार होतोच. आपल्या लुक्समध्ये बदल करायला तर प्रत्येकालाच आवडतो. तर लग्नसमारंभाला साडी नेसणेही प्रत्येकाला आवडते. पैठणी साडी नेसणे आणि पैठणी साडीची काळजी घेणे हेदेखील आवडते. पण सध्या ट्रेंडमध्ये आहे तो रंग म्हणजे पांढरा. काळ्या रंगासह आता पांढरा रंगही ट्रेंडिंगमध्ये आहे. पांढऱ्या अथवा ऑफव्हाईट रंगांच्या साड्यांमध्ये इतकी विविधता आली आहे की, आता लग्नालाही तुम्ही या रंगाची साडी नेसून जाऊ शकता. या रंगाच्या नक्की कोणत्या स्टाईलच्या साड्या आकर्षक आणि उठावदार दिसतील याबाबत अधिक माहिती. पांढऱ्या रंगाच्या या साडीसह नक्की कोणत्या स्टायलिंग टिप्स असाव्या ज्यामध्ये तुम्ही अप्सरेपेक्षा कमी दिसणार नाही याबाबत काही टिप्स.

चिकनकारी साडी (Chikankari Saree)

Chikankari Saree – Instagram

सध्या चिकनकारी साड्यांची फॅशन अधिक ट्रेंडिंग आहे. साडीचा पांढरा अथवा ऑफ-व्हाईट रंग आणि त्यावर करण्यात आलेले चिकनकारी वर्क (Chikankari Work) हेच याचे वैशिष्ट्य. या रंगामुळे आणि त्यावरील कलाकुसरीमुळेच ही साडी अधिक आकर्षक वाटते. चिकनकारीचे कलेक्शन नेहमीच ट्रेंडिंग असते. 

स्टाईल टीप – यासह तुम्ही मिसमॅच अथवा त्याच रंगाचा ब्लाऊज घालू शकता. फुलस्लीव्ह्ज ब्लाऊजची स्टाईल या साडीसह अधिक उठावदार दिसते. तसंच मोत्यांचे मोठे कानातले घालून तुम्ही तुमचा  लुक पूर्ण करू शकता. तुम्हाला मोती आवडत नसतील तर गोल्डन आणि मोती असे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा. ब्लाऊजचा डीप नेक गळा ठेवा आणि गळ्यात कोणताही दागिना घालू नका. 

ऑर्गेंझा साडी (Organza Saree)

ऑर्गेंझा साडीही सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यातही कस्टमाईज ऑर्गेंझा साडी लग्नसमारंभात अधिक चांगली दिसते. फुलांचे डिझाईन्स असणारी ऑर्गेंझा साडी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक झळाळी आणते. साधी पण तरीही तितकीच आकर्षक असणारी ही साडी तुम्ही लग्नात वापरू शकता

स्टाईल टीप – या साडीसह तुम्ही स्लीव्हलेस ब्लाऊज वापरा आणि साडीचा पदर हातावर सोडा. यासह तुम्ही मोत्याचे चोकर डिझाईन असणारे गळ्यातले घातले तर अधिक सुंदर दिसेल. तसंच या साडीवर कानातले न घालता आंबाडा घालून त्यात गजरा माळल्यास, तुमची स्टाईल पूर्ण होऊ शकते. तसंच ऑर्गेंझा साडी नेसल्यानंतर थोडी फुलते. त्यामुळे तुम्ही याचा परकर व्यवस्थित घालावा. 

बनारसी साडी (Banarasi Saree)

Banarasi Saree – Instagram

लग्नात बनारसी साडी हे नक्कीच कॉमन आहे. मात्र पांढऱ्या रंगाची अथवा ऑफ-व्हाईट रंगची बनारसी फार कमी दिसून येते. तुम्ही कोणत्याही समारंभासाठी ही पांढरी बनारसी साडी निवडू शकता. गोल्डन बॉर्डर आणि पांढरा अथवा ऑफ-व्हाईट रंग हा अधिक उठावदार दिसतो. 

स्टाईल टीप – या साडीसह तुम्ही मिसमॅच ब्लाऊज घातल्यास अधिक सुंदर दिसतो. तसंच तुम्ही मेकअपसाठी बेससह ड्युई मेकअपची निवड करा. हा मेकअप तुम्हाला अधिक भपकेबाज दाखवत नाही आणि आधुनिकता आणि पारंपरिकतेचा मेळही योग्य ठरतो. याशिवाय तुम्ही न्यूड लिपस्टिक शेडचा वापर केल्यास, तुमचा लुक उठावदार दिसतो. यासह राणी हार अथवा मोत्यांचे दागिने छान दिसतात. 

तुम्हालाही लग्नात जाण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी निवडायची असेल तर बिनधास्त निवडा. पांढरा रंग हा सध्या ट्रेंडमध्ये असून तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतो हे नक्की!

Leave a Comment