वेल्वेट साडी आहे ट्रेंडमध्ये, कशी करावी स्टाईल

थंडीबरोबरच वेडिंग सीझनही (wedding season) सुरू होतो. लग्नात सजून जाणे आणि विशेषतः साडी नेसणे यासारखे दुसरे मोठे काम नाही. पण थंडीत नक्की कोणत्या प्रकारची साडी नेसायची याचाही विचार आपल्या मनात असतो. थंडीपासून संरक्षण व्हावे आणि स्टाईलही उत्तम दिसावी यासाठी सध्या वेल्वेट साडी (Velvet Saree) ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही या दिवसात साडी निवडत असाल तर त्यासाठी हेव्ही फॅब्रिकची निवड करा. सिल्क आणि वेलवेट यासाठी उत्तम पर्याय आहेत. वेल्वेट साडी नेसायची तर ती कशा पद्धतीने स्टाईल करावी जेणेकरून तुम्ही आकर्षक दिसू शकता यासाठी या लेखातून काही खास टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. 

वेल्वेट साडीची निवड (How To Select Velvet Saree)

Velvet Saree – Instagram

वेल्वेट साडीमध्ये तुम्हाला फुल वेल्वेट कव्हरेज आणि हाफ वेल्वेट कव्हरेज या दोन्ही पद्धतीच्या साड्या बाजारात मिळतात. तुम्ही जर बारीक असाल तर तुम्ही फुल वेल्वेट कव्हरेज साडीची निवड करा. जर तुमचा बांधा जरा मोठा असेल आणि तुमची जाडी अधिक असेल तर तुम्ही हाफ वेल्वेट कव्हरेजवाली साडी निवडा. वास्तविक वेल्वेटचे कपडे फुलतात, त्यामुळे तुम्ही त्यात अधिक जाडसर दिसू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने वेल्वेट साडीची निवड केल्यास तुम्ही योग्य स्टाईल करू शकता. 

वेल्वेट साडी कशी नेसावी? (How to Drape Velvet Saree)

  • साडी निवडल्यावर आता खरी गोष्ट येते ती म्हणजे साडी नेसण्याची. वेल्वेट साडी ही तुम्ही सरळ पदर अथवा उलटा पदर दोन्ही पद्धतीने स्टाईल करू शकता. जर तुम्ही उलटा पदर (गुजराती पद्धत) काढणार असाल तर तुम्ही पदर ओपन फॉल स्टाईलमध्ये कॅरी करा
  • वेल्वेट साडीमध्ये सरळ पदराची स्टाईल तुम्ही तेव्हाच स्टाईल करा जेव्हा वेल्वेटचा कपडा अधिक कडक नसेल. तुमचे कापड जर मुलायम असेल तर साडीचा पदर सरळच ठेवा कारण हा पदर कॅरी करणे तुम्हाला अधिक सोपे जाते आणि साडीचा लुकदेखील अधिक चांगला दिसतो
  • वेल्वेटची साडी बऱ्यापैकी जड असते त्यामुळे हातावर पदर सोडताना तो आपल्याला सावरता येईल आणि लुक चांगला दिसेल याच पद्धतीने स्टाईल करा.

वेल्वेट साडीसह ब्लाऊज

  • वेल्वेट साडीसह वेल्वेट (Velvet Blouse) आणि सॅटिन (Satin Blouse) हे दोनच ब्लाऊज चांगले दिसतात. तुम्ही या साडीस हाफ स्लीव्ह्ज (Half Sleeves Blouse), फुल स्लीव्ह्ज (Full Sleeves Blouse) आणि स्लिव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) स्टाईल करू शकता 
  • तर नेकलाईनच्या बाबतीत तुम्ही गोल गळा (Round Neck Blouse), बोट नेक (Boat Neck Blouse), टर्टल नेक (Turtle Neck Blouse), स्ट्रॅप स्टाईल (Strap Style Blouse) आणि डीप व्ही नेक डिझाईनची (Deep V Neck Design Blouse) निवड केली तर अधिक आकर्षक दिसेल

वेल्वेट साडी अशी करा स्टाईल (How to Style Velvet Saree)

वेल्वेट साडी स्टाईल करताना तुम्ही यासह बेल्ट, डिझाईनर कंबरपट्टा अथवा नेटच्या दुपट्ट्यासह स्टाईल करू शकता. इतकंच नाही तर यासह तुम्ही अधिक हेव्ही अर्थात जड दागिने घातले तर साडीचा  लुक अधिक चांगला उठावदार दिसतो. या साडीसह तुम्ही मॅचिंग शालचाही वापर खांद्यावर करू शकता. त्यामुळे तुम्हाला रॉयल लुकही मिळतो आणि थंडीपासून संरक्षणही मिळते. 

वेल्वेट साडीची किंमत (Price of Velvet Saree)

बाजारामध्ये कमी डिझाईन्स आणि साध्या लुकची वेल्वेटची साडी ही साधारण 1000 रूपयांपासून मिळते. तर तुम्हाला भरजरी आणि हेव्ही लुक डिझाईनर वेल्वेट साडी हवी असेल तर 3500-5000 रूपयांपर्यंत याची किंमत आहे. मोठ्या शोरूममध्ये याची किंमत अधिक असते. तर तुम्ही या साडीची ऑनलाईन खरेदीही करू शकता. यामध्ये गडद रंगांचा वापर अधिक करण्यात येतो. 

तुम्हालाही वेल्वेटची साडी खरेदी करायची असेल तर या लेखातील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आमचा हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Leave a Comment