तुमच्या वॉर्डरोबमध्ये या साड्या असायलाच हव्यात

 साड्या या तशा सगळ्याच महिलांचा वीक पॉईंट. अनेक जणी साड्या (Saree) रोज नेसत नसल्या तरी नटायची किंवा मिरवायची इच्छा असेल तर साडीला दुसरा पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी देखील प्रत्येक महिलेकडे साड्यांचे काही पर्याय नक्कीच असतात. त्यात प्रामुख्याने पैठणी, कांजिवरम, सिल्क आलीच… पण हल्ली इतक्या वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या लुक देणाऱ्या साड्या मिळतात की, असे प्रकार तुमच्याकडे असायलाच हवेत असे आहे. साडीची आवड असो की, नसो अगदी बजेटमध्ये मिळणाऱ्या साड्यांचे हे प्रकार तुमच्याकडे असायलाच हवेत. चला जाणून घेऊया साड्यांचे हे असे काही लेटेस्ट आणि हटके प्रकार

बनारसी जॉर्जेट  (Banarasi Georgette)

बनारसी जॉर्जेट (सौजन्य: फेसबुक )

बनारस या शहराची ओळख असलेली बनारसी साडी खूप जणांच्या परिचयाची असेल. अनेकदा दुल्हन साड्यांमध्ये या साड्यांचा समावेश होतो. पूर्वी मिळणारे शालू हे देखील बनारसी असायचे. बनारसीची काठ, त्याचा पदर आणि प्रिंट्स इतके भारदस्त असतात की, अशी साडी नेसल्यावर छान रॉयल लुक येतो. बनारसी साडी रॉयल असली तरी ती पटकन नेसता येईल अशी मुळीच नाही. अशावेळी बनारसी साडीची हौस भागवण्यासाठी बनारसी जॉर्जेटसाडी ही फार उत्तम आहे.  बनारसी प्रिंटप्रमाणेच यावर प्रिंट केलेल्या असतात. पण ही जॉर्जेटच्या कपड्यात असल्यामुळे या साड्या नेसायला आणि बसायलाही खूप चांगल्या असतात. या साड्यांचा फॉल चांगल्या असल्यामुळे याला ग्रेसही चांगला येतो.

 या साड्या साधारण 8 हजारांपासून पुढे असतात. या महाग असल्या तरी देखील तुम्हाला त्या नेसल्यानंतर पैसा वसूल साडी असे नक्कीच वाटेल. 

ऑर्गेन्झा साडी (Organza saree)

ऑर्गेन्झा साडी (सौजन्य: फेसबुक )

सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या असा हा साडीचा प्रकार आहे. ही साडी पारदर्शक आणि हलक्या फुलक्या प्रकारात येते. अगदी कमी किमतीपासून याची सुरुवात होते. त्याप्रमाणे याचे कापडही बदलत जाते. तुम्हाला परवडणाऱ्या दरातील आर्टिफिशिअल अशी ऑर्गेन्झा साडी तुम्ही निवडली तरी काहीच हरकत नाही. ही साडी सुळसुळीत नाही. ती थोडी फुगते. पण जर तुम्हाला साडी योग्य नेसायची माहिती असेल तर ती साडी तुम्हाला नीटच बसते. अनेकदा खूप जणी तक्रार करतात की, या साड्या अगदी फुलतात. पण यात जर योग्य रंग निवडला तर ही साडी फारच क्लासी, पार्टीवेअर आणि सुंदर दिसते. यात काहीही शंका नाही. 

ही साडी साधारण 1 हजार रुपयांपासून पुढे मिळते. 

खादी कॉटन साडी (khadi cotton saree)

खादी कॉटन साडी ( सौजन्य: फेसबुक )

खूप जणांकडे साड्याच मुळात कमी असतात. त्यातही असल्या तर पेटीकोट आणि ब्लाऊज असतोच असे सांगता येत नाही. अशावेळी या प्रकारच्या साडी खूपच कामी येतात. खादी सिल्कमध्ये हल्ली इतके प्लेन आणि सुंदर रंग आले आहेत की, ते एखाद्या क्रॉप टॉपवर घातले तरी देखील खूपच सुंदर दिसतात. या प्रकारच्या साड्यांमध्ये रंग निवडताना असा रंग निवडा की, तो तुम्हाला एखाद्या मीटिंगमध्येही चांगला शोभून दिसेल. खादीच्या साड्या दिवसभर नेसल्या तरी त्या अंगाला टोचत नाही त्याचा त्रास होत नाही. अगदी सणावारासाठी ही साडी नेसायची असेल तर तुम्हाला फक्त यावर उत्तम अशी स्टाईल कॅरी करायची आहे. तुम्हालाच तुमचा लुक नक्की आवडेल.  या साड्या तुम्हाला 1200 पासून पुढे मिळतील

चिकनकारी साडी (Chikankari Saree) 

चिकनकारी साडी ( सौजन्य: फेसबुक )

चिकनकारी कुडते जितके प्रसिद्ध आहेत तितक्याच त्या कपड्यांमधील साड्या या सुंदर दिसतात. चिकनकारीचा कपडा खूप महाग असतो. त्यामुळे अर्थातच या साड्यादेखील तितक्याच महाग असतात. पण चिकनकारी सदृश्य कपडा हल्ली बाजारात सहज मिळतो. थोडासा शोध घेतला तर तुम्हाला जॉर्जेटमध्येदेखील असे कापड मिळू शकते. या कपड्याला आवडत्या रंगात डाय करुन देखील तुम्ही अशा साड्या नेसू शकता. जर इतके कष्ट घ्यायचे नसतील तर तुम्हाला अशा साड्याही मिळतीलच. चिकनकारी साड्या या खूपच रिच दिसतात. या साड्यांवर योग्य ज्वेलरी असेल तर एखाद्या मोठ्या कार्यक्रमातही त्या उठून दिसतात.  यासाड्या अगदी 5 हजारांपासून पुढेच आहेत 

लिची सिल्क साडी  (Lichi Silk Saree)

लिची सिल्क साडी (सौजन्य: फेसबुक)

साडी अगदी टापटीप नेसायला आवडत असेल तर तुमच्यासाठी लिची साडीचा पर्याय देखील खूपच उत्तम असा आहे. लिची सिल्कमध्ये तुम्हाला अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न्स मिळतील. या साड्या अंगाला छान बसतात त्यामुळेही त्या खूप जणांना आवडत नाहीत. पण हल्ली बाजारात मिळणाऱ्या लिची सिल्कच्या साड्या खरंच खूप सुंदर आणि रिच आहेत. यात रंगाचे खूप सुंदर पर्याय मिळतात. थोड्याशा जॉर्जेटकडे झुकणाऱ्या अशा या साड्या असल्यामुळे अनेकदा गल्लत होते. सॉफ्ट आणि सुंदर असा हा साडीचा पर्याय स्वस्त आणि मस्त आहे. त्यावर योग्य लुक केला तर या साड्या चांगल्याच भाव खाऊन जातात. 

आता साड्या घेताना हे काही पर्याय तुमच्याकडे आहेत की नाही हे नक्की तपासून पाहा.मानेवरील मळ कसा काढाल, सोप्या टिप्स

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

Leave a Comment