Bigg Boss Marathi S4: पहिल्यांदाच राडा! दाखल होणार 4 वाईल्ड कार्ड

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) स्पर्धेचे हे चौथे पर्व चालू आहे. पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना धक्के देण्यात आले. रोजची भांडणे आणि स्पर्धकांची बदलती समीकरणे यामुळे हा रियालिटी शो नेहमीच चर्चेत असतो. पण आता 50 दिवसांनंतर एकमेकांना समजून घ्यायला  लागल्यानंतर या स्पर्धकांना मोठा धक्का बसणार आहे. दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच स्नेहलता वसईकरची (Snehalata Vasaikar) वाईल्ड कार्ड (Wild Card) एंट्री झाली होती. पण आता या आठवड्यात एक नाही दोन नाही तर तब्बल 4 जणांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आहे. बिग बॉसच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत  आहे. तर या एंट्रीमुळे घरातील स्पर्धकांचे नक्की काय होणार आणि कोणकोणते नवे स्पर्धक येणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

चावडीच्या दिवशी येणार चार सदस्य 

या चौर्थ्या पर्वाच्या शनिवार आणि रविवारच्या चावडीवर हे चार सदस्य घरात येणार आहेत. त्यामुळे केवळ सदस्यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही यामुळे धक्का बसला आहे. या पर्वात तीन पर्वांसारखी मजा नाही अथवा स्पर्धक व्यवस्थित खेळत नाहीत असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यामुळेच कदाचित आता या चार सदस्यांच्या येण्याने टीआरपी मध्ये फरक पडण्याची शक्यता आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे. यावर्षीचे स्पर्धक हे खेळत नसून केवळ रडतखडत पुढे चालले आहेत असंही म्हटलं जातंय. पण आता नक्की हे चार स्पर्धक कोण असणार आणि या खेळात नक्की काय रंगत आणणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात खेळाडूंनी अक्षरशः सीझन जगला होता असेच अनेकांचे म्हणणे आहे. मात्र या पर्वात तेजस्विनी आणि प्रसाद, अपूर्वा, किरण माने हे स्पर्धक सोडल्यास, कोणालाही नीट खेळता येत नाहीये आणि कोणीच योग्य विचार करून खेळ खेळत नाहीत असं प्रेक्षकांचेही म्हणणे आहे. त्यामुळेच टीआरपी जास्त मिळत नाहीये. कदाचित यामुळेच अचानक चार स्पर्धक बोलाविण्यात आल्याचे नेटिझन्सना वाटत आहे. 

कोण असतील हे स्पर्धक?

पण आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे हे स्पर्धक नक्की कोण असतील? येणारे स्पर्धक या सर्व स्पर्धकांना टक्कर देऊ शकतील का आणि ते नक्की कोणाच्या बाजूने असतील आणि स्वतःच्या डोक्याने खेळ करून प्रेक्षकांचे मन जिंकू शकतील का? असाही आता प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. पण आता या सगळ्यांची उत्तरे ही येणाऱ्या आठवड्यातच प्रेक्षकांना मिळतील आणि त्यासाठी काही कळ सोसावी लागणार आहे.  

Leave a Comment