साडीवर अधिक आकर्षक दिसतील ‘हे’ चोकर डिझाईन्स, घालून तर पाहा

विविध दागिन्यांची खरेदी (Buying Jewellery) करणे हे तर प्रत्येक महिलेची आवड आहे. त्यामुळे प्रत्येक आऊटफिट्ससह कोणते दागिने घालायचे (Jewellery Designs with Outfits) यानुसार लेटेस्ट पद्धतीचे दागिने (Latest Jewellery Designs) खरेदी केले जातात. सध्या लेटेस्ट दागिन्यांबाबत सांगायचे झाले तर बाजारात असणारे कुंदन दागिने (Kundan Jewellery) हे अधिक लक्षवेधी ठरत आहेत.  त्यातही कोणत्याही लग्न वा सणासमारंभासाठी साडी नेसायची म्हटल्यास, गळ्यात चोकर हा दागिना (Choker Jewellery) सध्या अधिक ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. तुम्हालाही जर साडीवर अधिक आकर्षक दिसायचे असेल तर आम्ही सांगितलेल्या डिझाईन्सच्या चोकर्सची खरेदी करा आणि दिसा सुंदर! त्याशिवाय कशा पद्धतीने स्टाईल करायची याचीही माहिती तुम्ही या लेखातून मिळवू शकता. 

डबल लेअर चोकर डिझाईन (Double Layer Choker Design)

Double layer choker design – Instagram

अशा डिझाईन्सचा चोकर तुम्ही सिल्क साडीसह (Silk Saree) तुम्ही नक्की ट्राय करा. या चोकरमध्ये डबल लेअरसह पेंडंट स्टाईलमध्ये कुंदनचे काम करून डिझाईन्स बनविण्यात येते. तुमचा चेहरा ओव्हल शेप (Oval Shape Face) असेल तर तुम्ही अशा डिझाईन्स चोकर निवडल्यास, तुमच्या स्टाईलला हा अधिक उठावदार दिसेल. तसंच यासह लहान आकाराचे कानातले तुम्ही घातले तर तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता. या डिझाईन्सचे चोकर्स तुम्हाला कमीत कमी 1000 रूपयांपासून बाजारात नक्कीच उपलब्ध होतात. 

पर्ल चैन कुंदन चोकर सेट (Pearl Chain Kundan Choker Set)

Pearl Chain Kundan Choker Set – Instagram

यामध्ये मल्टी लेअर पद्धतीच्या चैनचा वापर करण्यात येतो. असे डिझाईन्स तुम्हाला साधारणतः 600 रूपयांपासून ते 900 रूपयांपर्यंत अगदी सहजरित्या बाजारात उपलब्ध होतात. या पद्धतीचा चोकर हा केवळ साडीवरच नाही तर लेहंगा अथवा पंजाबी सूटसहदेखील उठावदार दिसतो. तुमचा चेहरा डायमंड शेपमध्ये (Diamond Shape Face) असेल तर तुम्ही या पद्धतीच्या चोकर्स डिझाईन्सचा वापर करावा. 

हेव्ही चोकर सेट (Heavy Choker Set)

Heavy Choker Set – Instagram

तुमचे कपडे अथवा साडी ही साधी असेल तर तुम्ही हेव्ही चोकर सेटचा विचार करावा. असे डिझाईन्स तुम्हाला 2000 रूपयांपर्यंत मिळतात. यामध्ये जर तुम्हाला मल्टीकलर चोकर मिळत असेल तर तुम्ही नक्की खरेदी करावा. कारण साध्या साड्यांवर हा अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतो. तुमचा चेहरा गोल आकाराचा असेल (Round Shape Face) तर तुमच्या चेहऱ्यासाठी हे डिझाईन्स उत्तम ठरते. 

मिनिमल डिझाईन चोकर सेट (Minimal Design Choker Set)

Minimal Design Choker Set – Instagram

या पद्धतीचे डिझाईन पाहताना खूपच क्लासी वाटते. बाजारामध्ये असे डिझाईन्स तुम्हाला साधारणतः 500 रूपयांपासून उपलब्ध होते. तुम्ही कशा पद्धतीच्या डिझाईन्सची निवड करता त्यानुसार याचा भाव असतो. अशा डिझाईन्सचा चोकर सेट हा कोणत्याही स्टाईल्सच्या कपड्यांसह उठावदार दिसून येतो. तुम्ही घातलेल्या कपड्यांच्या रंगासह मॅचिंग अथवा कॉन्ट्रास्ट निवड जरी केली तरीही ही स्टाईल तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा वेगळं ठरवेल यात शंका नाही. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात जाण्यासाठी तुम्ही या डिझाईन्सची निवड नक्कीच करू शकता. 

आम्ही दिलेल्या टिप्स आणि चोकर डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर आमचा हा लेख नक्की शेअर करा आणि यावर तुमचे काय मत आहे अथवा तुम्हाला कोणती स्टाईल आवडली हेदेखील कमेंट करून कळवा. तसंच अधिक लेख वाचण्यासाठी dazzlemarathi.com फॉलो करा. 

Leave a Comment