ब्लाऊज झाला असेल ढगळ, तर वापरा सोप्या टिप्स

भारतीय महिलांसाठी साडी हा एक वेगळाच आणि महत्त्वाचा विषय आहे. साडीचे वॉर्डरोबमध्ये अनन्यसाधारण महत्त्व (Importance of Saree) आहे. साडी हा असा पेहराव आहे जो कोणत्याही वयातील स्त्री ला शोभून दिसतो. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलीपासून ते नव्वदीच्या वयातील बाईपर्यंत प्रत्येकीला साडी सुंदरच दिसते. कोणताही सण असो अथवा कार्यक्रम असो साडी नेहमीच आकर्षक लुक मिळवून देते. पण साडीसह ब्लाऊजचे डिझाईन्स आणि ब्लाऊजही तितकाच महत्त्वाचा आहे. साडीच्या रंग आणि स्वरूपाप्रमाणे ब्लाऊजचा रंग, फिटिंग हेदेखील महत्त्वाचे असते. साडीवर ढगळ ब्लाऊज कधीच चांगला दिसत नाही. यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो.  बरेचदा वजन कमी झाल्याने ब्लाऊज ढगळ होतात. अशावेळी नक्की काय करायचं? तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ब्लाऊज ढगळ अथवा सैलसर झाला असेल तर या सोप्या टिप्स वापरा आणि तुमची चिंता दूर करा. 

कोटीसह करा कॅरी (Use Koti)

सौजन्य – Instagram

तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याची घाई असेल आणि ब्लाऊज ढगळ अथवा सैलसर झाला तर तुम्ही कोटीसह साडी स्टाईल करा. यामुळे ब्लाऊजचा सैलसरपणा दिसणार नाही आणि हे दिसायलादेखील अधिक स्टायलिश दिसते. ज्या रंगाचा ब्लाऊज असेल त्याच रंगाची कोटी वापरल्यास अधिक सुंदर दिसते. तुमच्यावजळ कोटी नसेल तर तुम्ही श्रगचादेखील वापर करू शकता. विशेषतः तुम्ही हेव्ही वर्क कोटी (Heavy Work Koti) घाला ज्यामुळे तुमच्या लुकला अधिक शोभा येईल. तसंच तुमच्या स्टाईलबाबत अगदी चर्चाही होईल. 

ऑफ शोल्डरप्रमाणे करा स्टाईल (Use as Off Shoulder Blouse)

सौजन्य – Instagram

आजकाल ऑफ शोल्डर ड्रेसच नाही तर अगदी ऑफ शोल्डर ब्लाऊजदेखील ट्रेंडमध्ये आहेत. बाजारात तुम्हाला अनेक स्टाईल्सचे ऑफ शोल्डर ब्लाऊज दिसतील. त्यामुळे तुमचा ब्लाऊज सैलसर झाला असेल तर तुम्ही त्याला ऑफ शोल्डर लुक देऊ शकता. तुम्ही तुमचा ब्लाऊज खांद्यावरून दोन्ही बाजूला खाली घ्या आणि ऑफ शोल्डर लुक द्या. अगदी साडीच नाही तर लाँग स्कर्टसहदेखील तुम्ही असा ब्लाऊज वापरू शकता. या लुकमुळे तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल. तसंच यासह एखादी साधी सोपी हेअरस्टाईल करण्याचाही तुम्ही प्रयत्न करा. याशिवाय असा ब्लाऊज घातल्यानंतर चोकर स्टाईल दागिने यावर अधिक उठावदार दिसतील. तुमच्या लुकमध्ये यामुळे अधिक शोभा येईल आणि आकर्षकता दिसून येईल. 

दोरीचा वापर करून बनवा युनिक लुक (Unique Look)

सौजन्य – Instagram

ब्लाऊज सैलसर झाल्यानंतर त्याला पुन्हा शिवण्याने त्याचा लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे असं करण्यापेक्षा ब्लाऊजच्या मागच्या बाजूला दोरी शिवून अधिक चांगले डिझाईन करता येते. हे दिसायलादेखील चांगले दिसते आणि यामुळे ब्लाऊजचा सैलसरपणाही निघून जाण्यास मदत मिळते. तुम्हाला हवं असेल तर बाजारातून तयार लटकन आणूनही तुम्ही याला जोडू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला बाजारातून आणून वापरता येतात. हे युनिक आणि अत्यंत स्टायलिश दिसते. त्यामुळे ब्लाऊज सैलसर झाल्यस, तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहू शकता. 

अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ढगळ ब्लाऊजची स्टाईल या टिप्स वापरून करू शकता. यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही आणि कमी वेळात तुमचे कामही होते. 

Leave a Comment