होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

नवरी (Bride) म्हटली की, साहजिकच अनेकांच्या नजरा या तिच्याकडे असतात. तिचा ग्लो आणि तिला या काळात आलेला तजेला हा तिच्या सौंदर्यात भर घालत असतो. पण हा ग्लो आणि तजेला आताच्या काळात सहजा सहजी मिळत नाही. कारण प्रत्येकीचं लाईफ हे करिअर आणि इतर जबाबदाऱ्यांनी गुरफटलेले आहे. त्यामुळे सगळ्यांनाच त्वचेची आणि आरोग्याची म्हणावी तितकी काळजी घेता येत नाही. अशावेळी जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर तुमचे रुटीन काही काळासाठी बदलून पाहा. तुम्हाला तुमच्या आरोग्यात आणि सौंदर्यात नक्कीच भर पडलेली दिसेल. या शिवाय लग्नानंतर पिंपल्स येत असतील तरी देखील तुम्ही काळजी घ्यायला हवी

सकाळचा फेरफटका

नक्की मारा फेरफटका

खरंतर लग्न म्हटले की, खरेदी आली. खरेदीसाठी किती वेळ आपण देतो हे आपल्यालाच कळत नाही. अशावेळी खाण्यापिण्याचे आणि आरामाचे जामच वांदे होतात. पण लग्नाच्या साधारण दोन ते तीन महिन्याआधीपासून तुम्ही या गोष्टी थोड्या टाईमटेबलनुसार करुन घ्यायचा प्रयत्न करा. चांगली झोप मिळाली की, आपसुकच दिवस लवकर सुरु होतो. सकाळी उठण्यामागे अनेक चांगली कारणे आहेत. साधारण 7 वाजता उठून तुम्ही एक मोठा वॉक जरी घेतला तरी देखील तुम्हाला फ्रेश वाटते.डोक्यात काही विचार असतील तर ते या मस्त वातावरणात सुटण्यास मदत मिळते. शिवाय फिटनेसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चालूनही होते. त्यामुळे दिवसभर व्यायाम करता आला नाह तरी देखील चालून जाते.

बाहेरचे टाळा

लग्नाच्या या धामधूमीत बाहेरचे खाणे कितीही टाळले तरी कामांसाठी बाहेर पडल्यावर बाहेरचे खाणे होते. तुम्हालाही सतत या काळात बाहेरचे खावे लागत असेल तर मैदा असलेल्या गोष्टी खाणे टाळा. कारण त्या वजन वाढवतात. त्यामुळे त्वचेवर सीबमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. इतकेच नाही तर अशा बाहेरच्या खाण्यामुळे पोटही खराब होण्याची भीती असते. त्यामुळे शक्यतो बाहेरचे टाळा. अगदीच खायची वेळ आली तर फळांचे रस, डोसा-इडली, दालखिचडी, सँडवीच असे काही पदार्थ खाल्ले तरी देखील चालू शकतील. 

फेस योगा गरजेचा

नक्की करा फेसयोगा

नवरी सुंदर दिसते जर ती टवटवीत दिसत असेल तर… तुमच्या रंगापेक्षाही तुम्ही नाकी डोळी सुंदर असाल तर तुमचा मेकअपही तुम्हाला सुंदर दिसतो. प्रत्येकीच्या चेहऱ्याचे बेस्ट फिचर नक्कीच असतात. काहींचे स्माईल सुंदर असते. काहींचे डोळे तर काहींचे गाल अशावेळी फेस योगा तुम्हाला तुमचे चेहऱ्याचे फिचर अधिक चांगले करण्याची संधी देतो. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दिवसातून थोडासा वेळ काढून फेस योगा करा. फेस योगाचे क्लासेस देखील घेतले जातात. ते देखील तुम्ही केलेत तरी देखील तुम्हाला तुमचे फिचर अगदी ठळक दिसून येतील. 

मेकअप टाळा

त्वचेची काळजी घेण्यासाठी या काळात सतत मेकअप करणे टाळा. शॉपिंग किंवा काही क्षुल्लक कारणासाठी बाहेर जात असाल तर खूप मेकअप करु नका. चेहरा जितका स्वच्छ आणि मोकळा राहील तितकी तुमची त्वचा ही अधिक चांगली दिसते.चेहऱ्याला टोनर, सनस्क्रिन आणि मॉश्चरायझर इतक्याच गोष्टींची गरज असते तितकेच त्वचेला लावा. शक्यतो मेकअप टाळा आणि केल्यास डबल क्लिन्झपद्धतीने चेहरा स्वच्छ केल्याशिवाय झोपू नका. कारण यातील डोळ्याचा मेकअप गेला नाही तर तुमचे डोळे निस्तेज आणि डोळ्यांखाली सतत काळे दिसत राहते. त्यामुळे तुम्ही शक्यतो मेकअप टाळलेला बरा. 

आता तुम्हालाही या दिवसात दिसायचे असेल सुंदर तर या दिवसात तुम्ही हे सोपे बदल करा. 

1 thought on “होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)”

Leave a Comment