‘अक्षयला एवढा कसला Attitude’, नेटिझन्स संतापले

बीग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) सिझन ४ ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. बीग बॉसच्या घरातील काही सदस्यांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम आणि पाठिंबा मिळतो आहे तर काही स्पर्धकांना प्रेक्षक चांगलेच फैलावर घेताना दिसत आहेत. घरात नुकत्याच पार पडलेल्या ‘खूर्ची सम्राट’ (Bigg boss Tasks) या टास्कनंतर घरातील सदस्यांची एकमेकांविषयची समीकरणं बदलली आहेत आणि साहाजिकच बाहेरुन हा शो पाहणाऱ्या मायबाप प्रेक्षकांचेही स्पर्धकांविषयी असलेले मत या टास्कनंतर बदलल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्स आपली मतं व्यक्त करत आहेत.

वादाचं कारण काय?

कलर्स मराठीने (Colors Marathi) नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अक्षय केळकर (Akshay Kelkar) आणि अमृता धोंगडे (Amruta Dhongde) हे दोन स्पधर्क आपापसांत बाचाबाची करताना दिसत आहेत. रात्रीच्या जेवणावरुन या दोन स्पर्धकांमध्ये वाद झाल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. शाब्दिक वादात अक्षय अमृता धोंगडेवर डाफरताना दिसत आहे. कालच्या टास्कमध्ये दमल्यामुळे आपलं अंग दुखत आहे आणि त्यामुळे रात्रीच्या पोळ्या बनवणं आपल्याला शक्य नसल्यांचं अमृता सांगते आहेत. त्यावर अक्षय तिला बोलण्याचा टोन नीट ठेव असा सल्ला देत, तिची नक्कल करतो आहे आणि यावरुनच अमृता त्यांच्यावर संतापली आहे. यावेळी प्रसाद जवादे (Prasad jawade) आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh) हे दोन स्पर्धकही तिथे असल्याचं दिसतंय.

अक्षयला एवढा कसला Attitude; नेटकऱ्यांचा थेट प्रश्न

दरम्यान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर, नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मात्र बहुतांशी प्रेक्षकांनी ‘अक्षयला एवढा कसला Attitude आहे, अक्षय एवढा कुणाच्या जीवावर उडतो आहे..’ असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे. ‘अक्षय हा अमृताशी उगाचच पंगा घेतो आहे, अक्षय आणि अपूर्वाला लोकांची कळ काढायची आणि फुटेज खायची वाईट खोड आहे, अक्षय अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) च्या जीवावर उडतो आणि तिचा सपोर्ट नसेल तर तो एक दिवसही बीबी हाऊसमध्ये टिकू शकणार नाही..’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्स सोशल मीडियावर देत आहेत.

तर काहीजणांनी अमृता धोंगडेला देखील ट्रोल करत, ‘ही एक टास्क काय जिंकली तर लगेच उडायला लागली…अप्पू आणि तिच्या टीमशी पंगा घेणं तुला महागात पडेल’ अशाप्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. आता अक्षय केळकर आणि अमृता धोंगडेचा हा वाद किती विकोपाला जातो आणि त्यावर कसा पडदा पडतो… हे आज रात्रीच कळेल. 

Leave a Comment