Bigg Boss 16: या आठवड्यात कोण जाणार बाहेर? सुंबुलवर सर्वांची नजर

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चालू झाल्यापासून चर्चेत आहे. रोज घरात कोणती ना कोणती घटना अशी घडते की, त्यावर बाहेर चर्चा होतेच. गेल्या आठवड्यापासून सर्व स्पर्धक गौतम विग (Gautam Vig) आणि सौंदर्या शर्माच्या (Soundarya Sharma) मागे हात धुऊन लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शालिन भानौतच्या (Shaleen Bhanot) चिकनचा किस्सा चालूच आहे. सतत चिकनची मागणी करून शालिन थकत नाही पण त्याच्या या मागणीला बिग बॉस मात्र नक्कीच वैतागले आहेत. पण या सगळ्यात आता सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे या आठवड्यातील नॉमिनेशन. एक प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम (Archana Gautam) आणि सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) यांची नावे स्पर्धकांनी घेतली आहेत. 

या आठवड्यात होणार एलिमिनेशन (Bigg Boss 16 Elimination)

मागच्या आठवड्यात डेंग्यू आजारातून सावरत सलमान खानने शुक्रवारच्या वार रोजी सर्वांचीच शाळा घेतली होती. त्यातही अधिक जास्त ओरडा पडला होता तो म्हणजे सुंबुल तौकीरला. दिवाळीच्या वेळी कोणत्याही स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात आले नव्हते. मात्र आता या आठवड्यात कोणालातरी बाहेर जावेच लागणार आहे. पण या आठवड्याच्या मतदानाच्या लाईन्स बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे कोणालाही काढण्यात येणार नाही असं चित्र सध्या दिसून येत आहे. घरातील सदस्यांनी यावेळी सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम (Archana Gautam) आणि सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) यांची नावे घेतली होती आणि एलिमिनेट करण्यात आले होते. मात्र बिग बॉसच्या आतील बातम्या सांगणाऱ्या ‘द खबरी’ (The Khabari) यांनी दावा केला आहे की, यावेळी घरातल्यांना बाहेर जाण्यासाठी कोणत्या स्पर्धकाचे नाव देण्यात यावे विचारण्यात आले आहे आणि त्यावेळी अधिकाधिक स्पर्धकांनी सुंबुलचे नाव घेतले आहे. तर त्यानंतर सुंबुलला सिक्रेट रूम (Secret Room) मध्ये ठेवण्यात येणार असून तिला तिच्यामागे तिने ज्यांना मित्रमैत्रीण मानले आहे, त्यांच्याबाबत खऱ्या गोष्टी दाखविल्या जाणार आहेत. 

सुंबुलला सलमानपासून सगळ्यांचा पाठिंबा आणि काळजी

वास्तविक गेल्या दोन आठवड्यांपासून सुंबुलला वास्तव काय आहे याबाबत समजून सांगण्यासाठी तिच्या वडिलांना बोलाविण्यात आले, सलमान खाननेदेखील तिला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सुंबुलच्या वडिलांनी तिला शालिन – टीनापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला होता. मात्र सुंबुलला या सगळ्यातून काहीही कळत नसल्याचे दिसून येत आहे. तर सलमानने सुंबुलला ती कुठेही दिसत नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे आता या टास्कनंतर नक्की काय घडणार? सुंबुल घरी जाणार की तिला नक्की हा खेळ काय आहे आणि तिला कसे खेळायला हवे हे कळणार हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र अनेकांचे म्हणणे आहे की, सुंबुलला तिच्या वयामुळे अधिक फायदा करून देत आहेत. इतरांच्या तुलनेत तिला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ का देण्यात येत आहे असाही सवाल सध्या नेटिझन्स विचारत आहेत.  

Leave a Comment