बटाट्याने बनलेला हा फेसपॅक करू शकतो पिगमेंटशन कमी

पिगमेंटेशन (Pigmentation) असणं ही अत्यंत सामाईक समस्या आहे. ही कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. अनेक महिला महागतले उत्पादन वापरून पिगमेंटशनची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून सुटका मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही बऱ्याचदा योग्य तो परिणाम दिसून येत नाही. पण यामुळे तुम्हाला अधिक नुकसान पोहचण्याचाही धोका निर्माण होतो हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे तुम्ही घरच्या उपलब्ध वस्तूंमधून पिगमेंटशन कमी करू शकता. यामुळे तुमची त्वचा चांगली राहाते आणि तुम्हाला त्रासही होत नाही. जाणून घेऊया पिगमेंटेशन कमी करण्यासाठी नक्की कशाचा वापर करावा आणि कशा पद्धतीने याचा वापर करावा. 

आवश्यक साहित्य (Ingredients To Make Potato And Curd Face Pack To Reduce Pigmentation)

  • 2 बटाटे
  • 3-4 चमचे दही 

बनविण्याची पद्धत (How To Make Potato and Curd Face Pack To Reduce Pigmentation)

सौजन्य – Freepik.com
  • पिगमेंटेशन कमी करण्यासाठी फेसपॅक बनवायचा असेल तर सर्वात पहिले तुम्ही 2 बटाटे मिक्सरमधून वाटून घ्या 
  • त्यानंतर त्यामध्ये 3-4 चमचे दही मिक्स करा. हे व्यवस्थित मिक्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा 
  • लक्षात ठेवा की, फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि हा फेसपॅक कमीत कमी 20 मिनिट्स तसंच ठेवा 
  • त्यानंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करून घ्या आणि आठवड्यातून किमान 3 वेळातरी या फेसपॅकचा वापर करा. याचा वापर नियमित केल्यामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत मिळेल आणि चेहरा तजेलदार होईल 

बटाटा आणि दह्याचे फायदे (Benefits Of Potato And Curd Face Pack)

सौजन्य – Freepik.com
  • बटाट्यात जास्त प्रमाणात मिनरल्स असतात. तसंच यामधील असणाऱ्या विटामिन सी मुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत मिळते 
  • दही त्वचेसाठी अत्यंत नैसर्गिक असे मॉईस्चराईजर (Moisturizer) आहे. त्यामुळे त्यातील तत्व त्वचेवर होण्याऱ्या पिगमेंटेशन कमी करण्यासाठी लाभदायक ठरते 
  • तसंच दह्यातील असणारे प्रोटीन, जिंक, कॅल्शियम हे चेहऱ्याच्या त्वचेला पोषण देण्यासह अत्यंत चांगले ठरते. याशिवाय चेहऱ्यावरील पोर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठीही दह्याचा चांगला उपयोग होतो 

महत्त्वाची सूचनाः या फेसपॅकचा (Face Pack) वापर करण्यापूर्वी तुम्ही नक्की पॅच टेस्ट (Patch Test) करून घ्या. तसंच तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय (Expert Advice) अजिबात या फेसपॅकचा वापर करू नका. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्हाला आम्ही सांगितलेला उपाय जर आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि लेख आवडला असल्यास, शेअर करा. 

या Homemade Face Scrub मुळे पोर्स राहतील स्वच्छ

Beauty Care Tips: टॅनिंगमुळे चेहरा झाला असेल काळा, तर वापरा दही

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

Leave a Comment