कढी अधिक स्वादिष्ट करण्यासाठी द्या असा तडका, बोटंही चाटाल

कढी हा एक असा पदार्थ आहे जो वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने बनविण्यात येतो. गुजरातमध्ये कढीत साखर वा गूळ घालणे लोकांना पसंत आहे तर राजस्थानमध्ये लसूण तडका लावल्याशिवाय कढी पूर्ण होत नाही. कढी ही भाताबरोबर खायला अधिक प्राधान्य देण्यात येते. तर काही जणांना कढी इतकी आवडते की, नुसती कढीही प्यायली जाते. अनेकदा कढी भात आणि पापड यावरच जेवण पूर्णही होते. कढीला अधिक स्वाद यावा म्हणून कढीला तडका दिला जातो. पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तडका देऊन ही कढी अधिक स्वादिष्ट बनवू शकता आणि याबाबतच आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देणार आहोत. यासाठी तुम्हाला केवळ तीन पदार्थांची गरज आहे आणि तुम्ही याचा वापर करून स्वादिष्ट कढी बनवू शकता. 

लाल मिरचीचा तडका (Red Chili Tadka)

सौजन्य – Freepik.com

स्पेशल कढी बनविण्यासाठी तुम्ही लाल मिरचीची मदत घ्यावी. यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये बेसन, दही, मीठ आणि एक चिमूटभर हळद व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यावर हिंग, कडीपत्ता, धने पावडर आणि दह्याचे मिश्रण घाला. हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी गॅसवर लहान कढई ठेवा. त्यात तेल गरम करा आणि वरून दोन लाल मिरच्या आणि एक हिरवी मिरचीचे तुकडे घाला आणि मग कढीवर हे मिश्रण वरून घाला. हा लाल मिरचीचा तडका तुमच्या कढीचा स्वाद अधिक वाढवतो. 

असा लावा लसणीचा तडका (Garlic Tadka)

लसणाचा स्वाद कढीमध्ये अप्रतिम लागतो. काही जणांना लसूण आवडत नाही. तर काही जैन व्यक्ती या लसूण आलं असणारी कढी पित नाहीत. पण तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही अशी कढी करून पाहाच. यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात दह्याचे आंबट ताक, मीठ आणि बेसन मिक्स करून घ्या. त्यानंतर लसणीच्या पाकळ्या सालं काढून ठेचून त्यात मिक्स करा त्यानंतर एक पॅन गरम करा त्यात तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता, हळद घालून वरून कढीवर घाला आणि गरम करा.  त्यानंतर पुन्हा एकदा कढई गरम करून त्यात तेल गरम करा आणि वरून ठेचलेली लसूण घाला. थोडी सोनेरी होईपर्यंत परता आणि कढीवर तडका लावा. याचा स्वाद अधिक चांगला लागतो. 

बटर तडका (Butter Tadka)

सौजन्य – Freepik.com

बटर तडका कढीमध्ये देण्यासाठी तुम्ही पहिले पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात कांदा चिरून घाला, कडिपत्ता घाला आणि परता. हे व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात लाल मिरची आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला आणि भाजून घ्या. दुसऱ्या बाजूला एका भांड्यात दही, बेसन, मीठ मिक्स करून घ्या. ते उकळवा आणि बटरचा तडका वरून द्या. ही कढी गरमागरम सर्व्ह करा. चवीला अत्यंत स्वादिष्ट लागते. 

एकाच पद्धतीची कढी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही कढी स्वादिष्ट करण्यासाठी अशा तीन पद्धतीने कढीला तडका द्या आणि जेवणात कढीचा स्वाद अधिक वाढवा! या टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला सांगायला विसरू मात्र नका. 

Leave a Comment