घरीच बनवा मस्त मसाला दूधाचा (Masala Milk Masala) मसाला

 मस्त मसाला दूध पिण्याचा आनंद हा कोजागिरी पौर्णिमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. मसाला दूध हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे असते. म्हणून त्याचे सेवन रोज केले तरी देखील ते आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. बाहेरुन मसाला दूध आणायचे म्हणजे ते शुद्ध असेल की, नाही याची खात्री देता येत नाही. शिवाय चांगल्या ब्रँडचे मसाला दूध घेताना ते इतके महाग असते की, ते परवडत देखील नाही. अशावेळी घरीच तुमच्या समोर तुम्हाला आवडत्या ड्रायफ्रुट्सच्या मदतीने मसाला दूध बनवता आले तर ते फायद्याचे ठरेल. चला जाणून घेऊया मसाला दूधाचा मसाला बनवण्याची रेसिपी

तुम्हाला माहीत आहे का पाव-भाजीची रोचक कहाणी, घ्या जाणून

मसाला दूध बनवण्याची कृती

मसाला दूधासाठी लागणारे साहित्य

मसाला दूधाचा मसाला बनवणे हे फारच सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य जाणून घेऊया. 

साहित्य: 1 कप काजू, 1 कप बदाम, 1 कप पिस्ता, ¼ वाटी चारोळी, साखर, केशर 

कृती : 

  1. काजू, पिस्ता, बदाम आणि चारोळी निवडून घ्या. 
  2. एका पॅनमध्ये एक एक करुन काजू, पिस्ता, बदाम, साखर  आणि चारोळी परतून घ्या. एक एक करुन ड्रायफ्रुट परतून घ्या. 
  3. चारोळी ही अनेकदा खराब असण्याची शक्यता असते. त्यामुळे ती निवडूनच घ्या. चारोळी देखील चांगली शेकेपर्यंत आणि कडक होईपर्यंत भाजून घ्या. 
  4. आता एका स्वच्छ मिक्सरच्या भांड्यात सगळे काजू, पिस्ता बदाम आणि चारोळी एकत्र करुन दरदरीत वाटा. अगदी एक दोन सेकंद मिक्सर फिरवला तरी ते दरदरीत वाटले जाते. खूप पीठ होईल इतके वाटू नका. 
  5. एका मोठा प्लेटमध्ये सगळा मसाला काढून त्यात केशराच्या काही काड्या घाला. सगळा मसाला एकत्र करा आणि एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरा. 

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

मसाला दूध पिण्याचे फायदे

मसाला दूध – Freepik

एखादी गोष्ट ज्यावेळी शास्त्रात एखादी गोष्टीचे सेवन करण्यास सांगितले जाते त्यावेळी आपण ते चांगले म्हणून लगेच पितो. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांच्या घरात मसाला दूध प्यायले जाते. पण मसाला दूध पिण्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. 

  1. ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे आरोग्यासाठी चांगले असते. 
  2. मसाला दूधात काजूच्या तुलनेत थोडे बदाम जास्त घातले तर त्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. 
  3. मसाला दूधाच्या मसाल्याच्या निमित्ताने तुमच्या पोटात दूधही जाते. दूध हे पूर्णान्न हे जे अनेकांना असेच प्यायला आवडत नाही. पण बाजारातील कोणत्याही पावडरीपेक्षा हा मसाला नेहमीच चांगला आणि फायद्याचा आहे. 

आता घरच्या घरी नक्कीच नक्कीच असा मसाला बनवा.

रोज भाजी खायचा कंटाळा आलाय तर बनवा असे वेगळे रायते

Leave a Comment