रोज भाजी खायचा कंटाळा आलाय तर बनवा असे वेगळे रायते

रोज रोज काय जेवण करायचं अथवा कोणती भाजी करायची हा प्रश्न शाकाहरी व्यक्तींना जास्त त्रासदायक ठरतो. त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळे हवे असेल तर त्यासाठी तुम्ही जेवणात रायत्यांचा समावेश करून घेऊ शकता. यामुळे पौष्टिक जेवणही मिळतं आणि प्रोटीन, फायबरदेखील तुमच्या शरीरात जाण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर तुम्ही आठवड्यातून एखाद्या दिवशी उपवास करत असाल तर त्यासाठीदेखील तुम्हाला हे रायते खाण्यास उपयोगी ठरू शकते. आम्ही तुम्हाला इथे अशा 3 रायता रेसिपी (Raita Recipe) देत आहोत. जे तुम्हाला उपवास असो अथवा रोजच्या आहारात कधीही करून खाता येतील. तसंच यामुळे तुमची त्वचाही तजेलदार राहील आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.  

मिक्स फ्रूट रायता (Mix Fruit Raita)

सौजन्य – Instagram

मिक्स फ्रूट रायता हे हेल्दी होण्यासह अत्यंत स्वादिष्टही असते. दही आपल्या पचनतंत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या रायत्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचा वापर करू शकता. पण हे रायते बनविण्यासाठी जास्त पिकलेल्या फळांचा वापर करू नका. ही फळे व्यवस्थित बारीक कापून घ्या. 

साहित्य 

 • 3 वाट्या तुमच्या आवडीची फळं (सालं काढून कापून घ्या)
 • 1 वाटी दही 
 • 1 लहान चमचा काळी मिरी 
 • 1 लहान चमचा साखर (पिठी साखर)
 • अर्धा चमचा जिरे पावडर 
 • 1 लहान चमचा कापलेले ड्रायफ्र्ट्स 
 • स्वादानुसार सैंधव मीठ 

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात पहिले एका मोठ्या भांड्या दही घ्या आणि फेटून घ्या 
 • त्यात काळी मिरी पावडर, साखर (पिठी साखर) मिक्स करून घ्या 
 • हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात फळं मिक्स करा (अननस, डाळिंबाचे दाणे, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळं) 
 • त्यात वरून जिरे पावडर, मीठ आणि ड्रायफूट मिक्स करा आणि फ्रिजमध्ये काही वेळ ठेवा
 • एक तासाने बाहेर काढून ड्रायफ्रूट्सचे गार्निशिंग करून खायला घ्या 

बटाट्याचे रायते (Aloo ka Raita)

सौजन्य – Instagram

अनेकदा उपवास असेल तर बटाट्याचे तेच तेच पदार्थ खाऊनं कंटाळा येतो. याशिवाय नेहमी बटाट्याचा रस्सा, बटाट्याची भाजी आपण करतो. काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही बटाट्याचे रायते करू शकता. हे अत्यंत सोपे आणि स्वादिष्ट असते. 

साहित्य 

 • पाव किलो दही 
 • अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर
 • पाव चमचा लाल मिरची पावडर
 • 3-4 बारीक चिरलेल्या मिरच्या 
 • 1 मोठा चमचा कापलेला पुदीना
 • 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर
 • 3-4 उकडलेले बटाटे 
 • तेल, जिरे, सुक्या मिरच्या फोडणीसाठी 
 • स्वादानुसार मीठ 

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात पहिल्यांदा दही व्यवस्थित फेटून घ्या आणि बटाट्याची सालं काढून तुकडे करून घ्या आणि तळून घ्या 
 • आता एका भांड्यात दही, बटाटे, लाल मिरची पावडर, पुदीना, कोथिंबीर, मीठ, मिरच्या, जिरे पावडर मिक्स करा 
 • एका भांड्यात तेल गरम करा त्यात जिरे, सुक्या मिरच्या तडतडू द्या आणि झाल्यावर ही फोडणी वरून मिश्रणावर ओता आणि मिक्स करा 
 • थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि एक तासाने खा 

काकडीचे रायता (Cucumber Raita) 

सौजन्य – Instagram

काकडीची कोशिंबीर आपण बनवतोच. त्याचप्रमाणे काकडीचे रायता बनवणंही सोपं आहे. हे स्वादिष्ट असून तुमच्या शरीरासाठी फायदेशरी ठरते. शिवाय हे खाऊन तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटते आणि आळस अजिबात येत नाही. तसंच हे बनविण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. 

साहित्य 

 • पाव किलो दही 
 • दोन काकडी
 • भाजलेले जिरे एक चमचा 
 • अर्धा जमचा जिरे 
 • अर्धा चमचा मीठ 
 • 1 चमचा घरातील तूप 

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात आधी काकडीची साले काढून काकडी किसून घ्या 
 • त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका 
 • एका पॅनमध्ये तूप घ्या आणि त्यात जिरे तडतडू द्या त्यावर काकडी घालून परतून घ्या 
 • एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात मीठ, भाजलेले जिरे घाला आणि मिक्स करा आणि वरून भाजलेली काकडी मिक्स करून रायते तयार 
 • तुम्हाला हवं असेल तर फ्रिजमध्ये ठेऊन खा अथवा नुसतं असंचदेखील खाऊ शकता

भाजी करायचा कंटाळा असेल आणि असे स्वादिष्ट आणि तितकेच हेल्दी खायचे असेल तर तुम्ही या रायता रेसिपीचा उपयोग करून नक्कीच घेऊ शकता. तसंच घरी अचानक पाहुणे येणार असले तरीही तुम्ही या रायता रेसिपी करून वाहवा मिळवू शकता. 

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

मधुमेही रूग्णांसाठी पोहे वा इडली काय आहे योग्य पर्याय

बाजारातून ताजा आणि योग्य हिरवा पालक कसा निवडाल, योग्य ट्रिक

Leave a Comment