Cooking Hacks: आता पराठा होणार नाही चिवट, वापरा या सोप्या हॅक्स 

पराठे (Paratha) म्हटल्यावरच तोंडाला पाणी सुटतं हो ना? प्लेन पराठा (Plain Paratha) असो वा भरलेला अर्थात स्टफ्ड (Stuffed Paratha) हे दही, लोणचं आणि बटर अथवा लोण्यासह मस्तच लागतात. पण अनेकदा पराठे गरमागरम तर चवीला छान लागतात पण काही वेळा चिवट होतात. तर काही जणींना पराठे बनवताना ते नीट फुगत नाहीत याचादेखील त्रास होतो. असे तेव्हाच घडते जेव्हा आपण पीठ भिजवताना आणि पराठे करताना काही चुका करतो. तुम्हाला जर मऊ पराठे बनवायचे असतील तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे. पराठे बनवताना अशा काही साहित्यांचा वापर करा ज्यामुळे पराठे अधिक रूचकर होतील. तसंच पराठ्याचा पीठ भिजवतानाही लक्ष द्या. मऊ पराठे बनविण्यासाठी (How to Make Soft Paratha) नक्की काय ट्रिक्स वापरायच्या ते जाणून घ्या. 

पीठ भिजवताना त्यातच तूप घाला 

सौजन्य – Freepik.com

तूप (Ghee) हा एक असा पदार्थ आहे जो केवळ पराठे शेकवण्यासाठीच नाही तर तुम्ही पराठ्याचे पीठ भिजवतानाही घालायला हवा. पीठ भिजवताना ते नेहमी चाळून घ्या. त्यानंतर तुम्ही एक चमचा तूप गरम करून त्यामध्ये ओता. याला मोहन असेही म्हटलं जातं. त्यानंतर हे पीठ पाण्याने व्यवस्थित भिजवा आणि साधारण अर्धा तास तसंच ठेवा. यामुळे तुमचे पराठे नेहमीच मऊ बनतील आणि चिवट होणार नाहीत.  

पीठ मळताना त्यात दही घाला

तुम्हाला मऊ अथवा फुललेला पराठा हवा असेल तर तुम्ही दुसरा पदार्थ वापरू शकता तो म्हणजे दही. दही तुमचे पराठी अधिक मऊ बनविण्याठी फायदेशीर ठरते. संपूर्णतः मऊ आणि फुललेला पराठा बनविण्यासाठी तुम्ही पिठात ताजे दही मिक्स करा. लक्षात ठेवा तुम्ही जे दही मिक्स करणार असाल ते अजिबात आंबट असू नये. दही घातल्यास, पराठा थंड झाल्यावरही चिवट होणार नाही. मऊ राहील आणि तितकाच स्वादिष्ट लागेल. 

पीठ मळताना घाला कोमट दूध 

सौजन्य – Freepik.com

तुम्हाला जर या गोष्टीची काळजी असेल की पिठात दही घातल्याने आंबट चव लागू शकते तर तुम्ही त्याऐवजी कोमट दूध मिक्स करून पीठ भिजवू शकता. पीठ चाळू परातीत घ्या आणि त्यात तुम्ही कोमट दूध मिक्स करून व्यवस्थित पीठ भिजवा आणि मळा. दूध घातल्यामुळे पीठ एकदम मऊ होईल आणि त्यामुळे पराठादेखील अत्यंत मऊ होतो आणि चिवट होत नाही. 

पीठ व्यवस्थित मळून घ्या 

सौजन्य – Freepik.com

मऊ आणि फुललेला पराठा बनविण्यासाठी तुमच्याकडे सर्वात पहिली आणि महत्त्वपूर्ण पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घेणे. पिठाचा वापर करण्यापूर्वी ते चाळून घ्या आणि भिजवताना कोमट पाण्याचा वापर करावा. तसंच लक्षात ठेवा की, पिठात एकदम पाणी ओतून नका. हळूहळू पाणी घाला आणि पीठ मळा. त्यामुळे पीठ चिकटणार नाही. तसंच पीठ भिजवल्यानंतर ते व्यवस्थित अर्धा तास झाकून ठेवणेही गरजेचे आहे. पीठ भिजवल्यानंतर लगेच पराठा करू नका अन्यथा पराठे कडक होतात. 

व्यवस्थित सारण आणि योग्य आचेवर पराठा शेकवा 

पीठ लाटल्यावर त्यात योग्य सारण भरण्याची गरज आहे. अधिक जास्त वा अधिक सारण भरू नका. जर तुम्ही पिठात जास्त सारण भरले तर ते बाहेर येते आणि पराठा फाटतो. कमी सारण भरल्यास, पराठ्याची चव लागत नाही. त्यामुळे योग्य सारण भरावे. त्याशिवाय पराठे भाजताना आच योग्य असायला हवे. तवा तापवून घ्या आणि त्यावर तूप घाला. त्यानंतर पराठा वरून घाला आणि मग मध्यम आचेवर शेकवा. पराठा शेकवायला थोडा वेळ लागतो पण असा पराठा चिवट होत नाही. 

या पद्धती वापरल्यास, पराठे चिवट आणि कडक होणार नाहीत, तसंच जळणारही नाहीत. थंड झाल्यावरही पराठे मऊ आणि स्वादिष्ट राहतील. पराठ्याचा स्वाद तुम्ही चहा, पुदिन्याची चटणी, बटर, दही यासह नक्कीच घेऊ शकता. 

घरीच बनवा मस्त मसाला दुधाचा (Masala Milk Masala) मसाला

तुम्हाला माहीत आहे का पाव-भाजीची रोचक कहाणी, घ्या जाणून

रोज भाजी खायचा कंटाळा आलाय तर बनवा असे वेगळे रायते

Leave a Comment