खुसखुशीत आणि चविष्ट कच्च्या केळ्यांची भजी रेसिपी

दिवाळीची (Diwali 2022) सुट्टी चालू झाल्यापासून ते अगदी दिवाळी संपेपर्यंत घरात गोड पदार्थांची नुसती रेलचेल असते. घरात अनेक पाहुणे येत असतात. तर काही जणांकडे हल्ली दिवाळी पार्टीही (Diwali Party) साजरी करण्यात येते. दिवाळी पार्टीसाठी नक्की काय पदार्थ करायचे असा प्रश्न पडतो आणि मग काही वेळा तेच तेच सामोसे, वडे आणि ढोकळा असे पदार्थ समोर येतात. पण यावर्षी दिवाळीच्या पार्टीत तुम्हाला वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्ही कच्च्या केळाची खुसखुशीत भजी नक्कीच ट्राय करू शकता. ही करणं अत्यंत सोपी आहे आणि इतर भजींपेक्षा थोडी वेगळी लागते. याशिवाय लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही सर्वांनाच आवडेल याची अगदी 100% टक्के खात्री बाळगा. कशी बनवायची ही कच्च्या केळ्यांची भजी ते जाणून घेऊया. 

कच्च्या केळ्यांच्या भजीसाठी साहित्य 

सौजन्य – Instagram
 • 3-4 कच्ची केळी 
 • एक कप बेसन 
 • पाणी (बेसन भिजविण्यासाठी)
 • 1 चमचा लाल मिरची पावडर 
 • एक चिमूटभर हिंग 
 • 1 चमचा ओवा 
 • 1 चमचा जिरे 
 • 1 चमचा लसूण पावडर वा ठेचलेली लसूण
 • चवीनुसार मीठ 
 • तळण्यासाठी तेल
 • चाट मसाला

कच्च्या केळ्यांची भजी बनविण्यीची कृती 

सौजन्य – Instagram
 • सर्वात आधी कच्च्या केळ्यांची साले काढून घ्या. सोलण्याची ही साले नाही निघाली तर तुम्ही सुरीचा वापरही करू शकता
 • त्यानंतर याचे चौकोनी अथवा लांबसर तुकडे (तुमच्या आवडीनुसार) कापून घ्या. हे तुकडे मध्यम आकाराचे ठेवावे. अगदी पातळ वा अगदी जाड ठेऊ नयेत म्हणजे तळल्यावर व्यवस्थित शिजतात 
 • दुसऱ्या भांड्यात बेसन, हिंग, मीठ, लाल मिरची पावडर, लसूण पावडर, जिरे आणि पाणी घालून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्या. (तुम्हाला हवं असल्यास यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडाही तुम्ही मिक्स करू शकता)
 • कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर कच्च्या केळ्याचे कापलेले तुकडे बेसनाच्या पिठात बुडवा आणि मग तळून बाहेर काढा. मध्यम आचेवर तळा जेणेकरून खुसखुशीत आणि चविष्ट होतील
 • तुम्हाला हवं असेल तर मिक्स भजी करण्यासाठी कच्च्या केळ्यासह तुम्ही वांगी, कोबी, पालक अथवा मेथी याचीही भजी तयार करू शकता
 • कच्च्या केळ्यांची भजी तयार झाल्यावर ती एका डिशमध्ये ठेवा आणि त्यावर चाट मसाला (Chaat Masala) अगदी थोडासा पसरवा आणि टॉमेटो केचअपसह (Tomato Ketchup) आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करा. तुम्हाला हवं असेल तर पुदीना चटणीसहदेखील तुम्ही हे खाऊ शकता. 

याचा स्वाद अप्रतिम लागतो आणि याशिवाय एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही या दिवाळीला कच्च्या केळ्याची भजी करू शकता आणि आलेल्या पाहुण्यांकडून वाहवा पण मिळवू शकता. 

Cooking Hacks: आता पराठा होणार नाही चिवट, वापरा या सोप्या हॅक्स 

रोज भाजी खायचा कंटाळा आलाय तर बनवा असे वेगळे रायते

घरीच बनवा मस्त मसाला दूधाचा (Masala Milk Masala) मसाला

Leave a Comment