Bigg Boss 16 : करण जोहरने केला वीकेंडचा वार कंटाळवाणा

 Bigg Boss पाहण्याची मजा ही आठवड्याच्या शेवटी अधिक असते. कारण आठवड्याचा पाढा वाचायला सलमान खान (salman khan) येत असतो. पण यंदाचा आठवडा हा तसा हॅपनिंग नसणार आहे.कारण सलमानच्या जागी करण जोहरला पाहून अनेकांना आधीच आता काहीही होणार नाही असे जाणवले असेल. शिवाय बऱ्याच जणांना त्याने ओटीटीचे केलेले सूत्रसंचलन आठवले असेल. त्यामुळे अर्थातच वीकेंडचा वार हा थोडा कंटाळवाणा थोडा kjo (karan johar) स्टाईल होता असेच म्हणायला हवे. जो तितकाच कंटाळवाणा आणि अभ्यासपूर्वक नव्हता हे नक्कीच दिसून आले.

Bigg Boss 16 | साजिद-शालीनमध्ये कडाक्याची भांडण, कॅप्टन्सी टास्कवरुन राडा

करणने घेतली अर्चनाची बाजू

करण घरात आल्यानंतर त्याला गौरीने घातलेला गोंधळ दाखवण्यात आला. अर्चना कॅप्टन झाल्यापासून गौरीने तिच्यासोबत चांगलीच भांडणं जुंपली. सगळ्या नियमांचे उल्लंघन करत हे सगळे सुरु होते. पण यामध्ये अर्चनाची चुकी नव्हती असे नाही. यामध्ये दोघांकडूनही भांडण सुरु होती. पण असे असताना करण जोहरने मात्र गौरीची चूक दाखवून तिला सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांनाच यासाठी दोषी ठरवले होते. गेल्या काही दिवसांपासून अर्चना ही अनेक कारणांवरुन भांडत आहे. तिने अनेक वाद केले आहेत. असे असताना केवळ दिवसभरातील एखादी गोष्ट पाहून जर त्याने हा निकाल दिला असेल तर या शोच्या चाहत्यांना ही गोष्ट अजिबात पटलेली नाही.

Bigg Boss 16 |  मराठमोळा शिव ठाकरे बनला कॅप्टन

एकतर्फी संवाद

कॉफी विथ करण हा शो करण उत्तम करत असला तरी देखील बिग बॉसचे होस्टिंग काही केल्या त्याला जमले नाही असे म्हणावे लागेल. कारण शनिवारी झालेल्या एपिसोडमध्ये तो त्याची मते घरातल्यांवर थोपवताना दिसला. सलमान खान ( Salman Khan) ची बोलण्याची पद्धत ही वेगळी आहे. तो घरातील चुकीच्या गोष्टीला चूक आणि चांगल्या गोष्टीबद्दल पाठ थोपायला कमी करत नाही. पण करणने आपला एकतर्की संवाद सुरु ठेवला होता. तो स्पर्धकांना प्रश्न विचारुन त्याची उत्तर स्वत: च त्याची उत्तर देत होता. त्यामुळे काही वेळानंतर ते पाहणे कंटाळवाणे होऊ लागले. 

बोलण्यास देत नव्हता वेळ

करण या दिवसाच्या सूत्रसंचलनासाठी तयार नव्हता असे दिसून येत होते. स्पर्धकांनी उत्तरे देऊन आपली बाजू मांडू नये असे त्याला वाटत होते. त्यामुळेच की काय तो जो स्पर्धक आपली उत्तरे देत होता त्याला अर्ध्यात कापून तो पुढे जात होता. करण खेळावरुन नाही तर आतील चेहऱ्यांवरुन आपली मत मांडताना दिसत होता. निमरितलादेखील त्याने काही प्रश्न विचारले पण तिला उत्तर देण्याची म्हणावी तितकी संधी दिली नाही. 

दरम्यान सलमान खान हा आजारी असल्यामुळे या आठवड्यात सलमानच्या जागी करण जोहरने त्याची जागा घेतली. पण या जागी सलमान खान परतावा हीच सगळ्यांची इच्छा आहे.  

Leave a Comment