सेक्सचा मूड आहे हे जोडीदाराला कसे सांगाल

कोणत्याही जोडप्यामध्ये प्रेम, रोमान्स ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही नेहमी रोमँटिक (Romantic Mood) आणि प्रेमात राहिलात तर नातं अधिक घट्ट होतं. पण कधी कधी अशी स्थिती असते की, तुम्हाला सेक्स करण्याचा मूड (Sex Mood) आहे हे पटकन जोडीदाराला सांगता येत नाही. कधी कधी अचानक मूड होतो पण हे तुम्ही तुमच्या जोडीदाराला शब्दात पटकन सांगू शकत नाही. त्यामुळे काही जण आपली इच्छा तशीच मारतात आणि आपल्या जोडीदाराला काय वाटेल असा विचार करून सांगतच नाहीत. कधी कधी मुलींना वाटतं की, आपण आपल्या सेक्सच्या इच्छेबाबत असंच सांगितलं तर आपला जोडीदार नक्की काय विचार करेल? त्याला आवडेल की नाही अथवा त्याने नकार दिला तर आपल्याला वाईट वाटेल असाही विचार केला जातो. पण तुम्हाला जर डायरेक्ट शब्दात हे सांगता येत नसेल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. ज्या वापरून तुम्ही सेक्सचा मूड आहे हे जोडीदाराला सांगू शकता. 

जोडीदाराचा हात पकडा (Hold His Or Her Hands)

सौजन्य – Freepik.com 

कोणत्याही महिला जोडीदाराला आपला हात पकडणे खूपच आवडते. त्या स्पर्शातून त्यांना प्रेम अधिक जाणवते. अगदी पुरूष जोडीदारालाही. त्यामुळे तुमचा मूड असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा हात पकडा आणि त्याला आपल्या स्पर्शातून मूडबाबत कळू द्या. आपला जोडीदार एकटाच असेल अथवा कोणत्या कामात असेल तर त्याला अशा पद्धतीने तुमच्या स्पर्शाने तुमच्या मनातील गोष्टी कळू द्या. 

त्यांची प्रशंसा करा (Praise Your Partner)

तुमच्यी तुमच्या जोडीदाराची प्रशंसा करा आणि त्यांना आपल्या बोलण्यातून हिंट द्या. एखाद्या कपड्यात आपला वा आपली जोडीदार आज कशी दिसत आहे हे त्यांना सांगा आणि मुळात कपड्यांशिवाय तुम्हाला अधिक आवडेल अशीही हिंट द्या. तसंच तुमच्या आयुष्यात त्यांना अधिक महत्त्व आहे आणि तुम्ही असल्यामुळेच अधिक आनंदी असल्याचाही उल्लेख करा. या प्रशंसेमुळे त्यांना तुमच्याबाबत अधिक ओढ निर्माण होईल आणि तुमच्या मूडबाबतही अंदाज नक्कीच येईल. केवळ बाह्य दिसण्यावरच नाही तर तुम्हाला त्यांच्या शरीराचा एखादा भाग खास वाटत असेल तर त्या भागाचीही प्रशंसा करा आणि आता तुम्हाला नक्की त्या भागासह काय करावं वाटत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करा. 

फुलांचा करा वापर (Use Flowers)

सौजन्य – Freepik.com 

प्रेम आणि रोमान्स यामध्ये फुलांचा वापर हे अत्यंत कॉमन आहे. तुम्ही रोमँटिक मूडमध्ये आहात अथवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा आहे हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला न बोलता सांगायचे असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा गजरा घेऊन जा अथवा रात्री घरी तुमचा जोडीदार येण्यापूर्वी गुलाबाच्या कळ्यांनी तुमचा बेड सजवून ठेवा. यापेक्षा अधिक रोमँटिक ते काय असणार? तुमच्या मनातील गोष्ट जोडीदाराला कळायला नक्कीच वेळ लागणार नाही आणि तुमचा दोघांचाही वेळ अधिक चांगला जाईल हे निश्चित. 

स्टिकी नोट्सची घ्या मदत (Take Help of Sticky Notes)

आपला मूड आहे हे नक्की कसं व्यक्त करायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही स्टिकी नोट्सची मदत घ्या. तुम्ही या नोट्समध्ये तुमच्या मनातील लिहून आपला जोडीदार कुठे कोणत्या क्षणी जाणार या सवयी ओळखून तिथे ठेवा. बाथरूम अथवा आरसा अथवा उशीजवळ अशा स्टिकी नोट्स ठेऊन ती वेळ अधिक रोमँटिक बनवा. या नोट्स वाचून नक्कीच तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्ट कळेल आणि जोडीदाराचाही मूड तयार होईल. मात्र स्टिकी नोट्स अधिक रोमँटिक आणि भावना जागृत करणाऱ्या असाव्यात हे नक्की लक्षात ठेवा. 

Leave a Comment