चिकनसाठी घेतला शालिनने बिग बॉसशी पंगा, शालिनचा अतिरेक

Shaleen Bhanot Argue With Bigg Boss Over Chicken: बिग बॉस 16 मध्ये दरवर्षी कोणी ना कोणीतरी असा स्पर्धक असतोच जो बिग बॉससाठी खूपच त्रासदायक ठरतो. तसंच घरात रेशन कमी पडणं यात काहीच नवं नाही. दरवर्षी जेवण आणि सामान यावरून अनेकांची भांडणं होताना प्रेक्षक पाहतात. काही वेळा तर भांडणं ही मारामारीपर्यंत येऊन थांबली आहेत. पण या नव्या सीझनमध्ये शालिनने (Shaleen Bhanot) चिकनवरून केवळ स्पर्धकांचेच नाही तर बिग बॉसचेही डोके फिरवल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर त्याच्या या चिकनप्रेमावरून प्रेक्षकही आता कंटाळले आहेत. पण चिकनसाठी आता शालिनने बिग बॉसशी वाद घालत पंगा घेतला असल्याचे नव्या प्रोमोवरून दिसून येत आहे. 

बिग बॉसशी घातला वाद 

सध्या नवा प्रोमो प्रसारित करण्यात आला असून यामध्ये शालिनने आता डायरेक्ट बिग बॉसशी वाद घातला असल्याचे दिसून येते आहे. शालिन (Shalin Bhanot) आपली जवळची मैत्रीण टीना दत्ता (Tina Dutta) बरोबर गप्पा मारत असतो. टीनाने त्याला विचारले, ‘तुझे चिकन आले नाही का?’ त्यावर शालिनने सांगितले की, ‘नाही आले, बिग बॉस तुम्ही माझे चिकन पाठवले नाही’ त्यानंतर जेवतानाही टीनाने बिग बॉसना सांगितले की, ‘मी तुम्हाला विनंती करते की प्लीज शालिनचे चिकन पाठवा’. शालिन आणि टीनाकडून सतत चिकनबाबत विचारणा केल्यानंतर बिग बॉसने शालिनला कन्फेशन रूममध्ये बोलाविले. ‘तुम्हाला उपाशी ठेवण्याची आम्हाला अजिबात इच्छा नाही. घरातील नियम तसेच आहेत, जे पहिल्यापासून आहेत’ मात्र बिग बॉस बोलत असतानाच शालिन वाद घालायला सुरूवात करतो. 

शालिनने केला अपमान 

बिग बॉसने रागावून शालिनला सांगितले, ‘घरात गेल्या आठवड्यापासून चिकन पाठविण्यात आले होते, जे सर्वांसाठी समान होते. एका माणसासाठी वेगळे चिकन पाठविण्यात येणार नाही. या शो मध्ये सर्व स्पर्धकांच्या डाएटची काळजी घेऊनच साहित्य पाठविण्यात येते. पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्यात येते की, तुझ्यासाठी रोस्टेड चिकन वेगळे पाठविण्यात येणार नाही’ यावर शालिनने रागावून उलट उत्तर देत बिग बॉसचा अपमान केला. ‘बिग बॉस माझे हात पाहा, तुम्हाला तेव्हाच समजेल. शो मध्ये मी जर काही करू शकलो तर ठीक आहे नाहीतर काहीच करू शकत नाही’

अर्चनासह झाले भांडण 

चिकनसाठी शालिनचा त्रास पाहून अर्चनाने त्याला म्हटले, ‘तुला जर माहीत होतं की, शो मध्ये नीट जेवायला मिळणार नाही तर तू शो मध्ये आलाच कशाला. बाजारात इतके चांगले चांगले अभिनेता आहेत, बिग बॉसने त्यांना बोलावलं असतं ना?’ त्यावर शालिनला आपला राग आवरता आला नाही आणि रागात अर्चनासह शालिनने भांडणाला सुरूवात केली. ‘मी तुला विचारलं आहे का?’ असा प्रश्न करत अर्चनाच्या अंगावर धाऊन गेला. टीनाने यावेळी शालिनचा राग शांत करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. 

चिकनसाठी इतकं करणारा शालिन हा पहिलाच स्पर्धक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही सध्या आश्चर्य वाटत आहे. असा कोणता आजार आहे की, ज्यामुळे दिवसाला शालिनला 450 ग्रॅम चिकन खावंच लागतंय. हे न समजल्यामुळे सध्या उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. 

Leave a Comment