‘कोण आहे खरी ड्रामेबाज..’ राखी-शर्लिनचा रंगला खेळ, भांडणे चव्हाट्यावर

राखी सावंत (Rakhi Sawant) आणि शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही नावं कोणाला माहीत नाहीत असं नक्कीच होणार नाही. जिथे कॉन्ट्रॉव्हर्सी तिथे या कॉन्ट्रॉव्हर्सीच्या दोन्ही राणी हजर असणारच. सध्या बिग बॉस 16 च्या सीझनमध्ये दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) आल्यामुळे शर्लिनने त्याला हाकलण्याची जोरदार मागणी सुरू केली आहे आणि याच गोष्टीवरून राखी आणि शर्लिनमध्ये जोरदार भांडणं जुंपली असल्याचे सध्या दिसून येत आहे. साजिदवर शर्लिन एकावर एक गंभीर आरोप करत जात आहे आणि पोलीसही आपली बाजू ऐकून घेत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र त्यावर राखीने आपले मत मांडत शर्लिनच्या जखमेवर मीठ चोळल्याचे दिसून आले आणि त्यानंतर शर्लिनने राखीची नक्कल करत तिला उलटे सुनावले असल्याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. 

काय म्हणाली राखी 

‘शर्लिन म्हणजे मिळेल तिथे फेम खेचून घेणारी आहे. मी असेच कपडे घालणार ज्यामुळे लोक मला छेडू शकतील आणि मला छेडा’. शर्लिनचे नाव न घेता तिला मर्लिन खोपडा असंही राखीने म्हटलं आहे. तर कोणत्याच बाजूने ती लेडी नाही तर लेडा आहे असं म्हणत राखीने तिची खिल्ली उडवली आहे. वर्षात एक दोन रेप केस कोणा ना कोणावर ती लावतेच असंही राखीने म्हटलं आहे. तर याशिवाय साजिदवरील आरोप हे सिद्ध झालेले नाहीत. तसंच तो बिग बॉसमध्ये चांगलं काम करत असल्याचेही राखीने म्हटलं आहे. मुळात शर्लिनची इमेज चांगली असती तर तिने हे बोलायला हवे होते असं स्पष्ट मत राखीने मांडले आहे. याशिवाय शर्लिनच्या कॅरेक्टरवर बोट ठेवत शर्लिनचे वर्षातून एक दोन वेळा रेप केस येतातच. पण आपण मीडिया क्वीन आहोत आणि त्यामुळे असं सगळं करायची आपल्याला गरज नाही असं राखीने सांगितले आहे. तर शर्लिनला काम मिळत नसल्यानेच ती असे उद्योग करत असल्याचा आरोप राखीने लावला आहे. 

शर्लिनने केली राखीची नक्कल 

तर राखीने केलेल्या आरोपानंतर शर्लिनने राखी ज्याप्रमाणे मीडियाला सामोरी जाते आणि सध्याचा तिचा बॉयफ्रेंड आदिल याच्याशी बोलते त्याची नक्कल करत राखीला टोमणे मारले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. याशिवाय शर्लिनने राखीला ‘नौटंकी’ असा टोमणाही मारला आहे. तसंच आदिलवरून बऱ्याच गोष्टी सुनावल्या असून सध्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपला जबाब पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतले असल्याचेही मीडियाला सांगितले. मात्र या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी शर्लिनलाच उलटसुलट सुनावल्याचे दिसून येत आहे. राखीची बाजू घेत शर्लिनला अभिनयाचे धडे गिरवण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. 

कोण आहे शर्लिन चोप्रा

शर्लिन चोप्रा ही एक अभिनेत्री असून यापूर्वी तिने राज कुंद्रा (Raj Kundra) याच्याविरूद्धही केस केली आहे. आपल्याला न्यूड चित्रपटांसाठी प्रस्ताव देण्यात आला आणि आपला फायदा घेण्यात आल्याचे तिने सांगितले होते. तर साजिद खान याने आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून आपल्याकडे सेक्सची मागणी केले असल्याचेही सध्या शर्लिनने सांगितले आहे. याशिवाय सलमान खान (Salman Khan) याचा पाठिंबा असल्यामुळेच मला न्याय मिळत नाही असा आरोपही शर्लिनने केला आहे. त्यामुळे साजिद खान बिग बॉसच्या घराबाहेर या कारणामुळे येणार का हेच आता प्रेक्षकांसाठी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment