Bigg Boss 16 : शालिनच्या प्रोटीनची हौस काही भागेना

Bigg Boss 16 च्या घरातील स्पर्धकांचे चेहरे आता सगळ्यांसमोर यायला सुरुवात झाली आहे. या खेळात आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी कोणता स्पर्धक गोड-गोड राहण्याचे नाटक करतो हे आतापर्यंत अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यातल्या त्यात घरात जर fake अशी ओळख कायम ठेवण्यात जी व्यक्ती यशस्वी झाली आहे तो म्हणजे शालिन भनौत ( shalin Bhanot) आठवड्याला काही ना काही कारणास्तव तो सलमानचा पारा सटकतो. त्याला ओरडा पडतो पण ‘ ये रे माझ्या मागला’ अशी गत काहीशी शालिनची झालेली सध्या दिसते.शालिन जितका ओरडा खातो तितका तो आणखी चुका करतोय असे आता दिसून येत आहे. आल्या दिवसापासून चिकन आणि प्रोटीनसाठी सतत भणभण करणारा शालिन आता  Bigg Boss च्याही डोक्यात जायला लागला आहे. रविवारी झालेल्या भागातही त्याची तिच प्रोटीनची बडबड दिसली ज्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोक्याला ताप झाला. नेमकं काय झालं चला घेऊया जाणून 

घरात उडाला भडका

कॅप्टनचे अधिकार मिळण्यासाठी आणि खेळात पुढे जाण्यासाठी गौतम सिंह (Gautam Singh) याने घरातील सगळ्यांच्या रेशनचा त्याग करुन आपली कॅप्टन्सी मिळवली. त्याच्या या निर्णयामुळे घरात एकच वाद झाला. त्याला मित्र म्हणणाऱ्या शालिनने गौतमला असा निर्णय का घेतलास यावरुन बरेच सुनावले. घरात सगळ्यांशी संवाद साधत त्याच्या निर्णयाचा धिक्कार करत त्याच्या हातून काहीही खाणार नाही असा प्रण घेतला. मी उपाशी राहीन पण तुझ्या हातचं खाणार नाही. असा पवित्रा घेतल्यानंतर घरात शिव, साजिद, अब्दू, निर्मित, स्टॅन यांनी उपोषण केले. पण घरातील स्पर्धकांची काळजी घेत ज्यावेळी घरात काही जेवणाचे पदार्थ पाठवण्यात आले. त्यावेळी आपल्या प्रोटीनची कमतरता भरुन काढण्यासाठी त्याने लगेचच मागचा पुढचा विचार न करता गौतमने दिलेले  जेवण घेतले. इतके कमी की काय त्याने त्यावर संध्याकाळचे काय? असा प्रश्न करत पुन्हा एकदा प्रोटीनचा पाठा वाचायला घेतला. त्यामुळे शालिन हा कधीच कोणाचा नाही? तो आपलाच विचार करतो आणि फक्त खेळात असल्याचा आव आणतो हे आता सिद्ध झालेले आहे.

बिग बॉसचाही राग अनावर

घरातील काही लोकं उपोषणाला बसली असताना दुसरीकडे शालिनचं मात्र काहीतरी वेगळंच सुरु होतं. शालिनला ज्यावेळी कन्फेशन रुममध्ये बोलावण्यात आलं. त्यावेळी त्याला बिग बॉसने त्याच्या गरजा आम्ही जाणतो आणि त्याचे वैद्यकीय कारण जाणतो असे स्पष्ट सांगितले होते.  पण तरी देखील आपली खातरजमा करण्यासाठी म्हणून त्याने संध्याकाळच्या चिकनचे काय? असा प्रश्न बिग बॉसलाच केला. यावर चढ्या आवाजात बोलण्याशिवाय बिग बॉसकडेही काही पर्याय नव्हता. हे सगळे प्रसारण घरातील इतरांनाही दिसत होते. त्यामुळे शालिन खरा कसा हे केवळ प्रेक्षकांनाच नाही तर घरातल्यांनाही कळाले. त्यामुळे शालिन हा घरात एक फेक चेहरा घेऊन फिरतो हे शिवचे वाक्य तंतोतंत खरे होते. 

शालिनने या आधीही काही क्षुल्लक कारणावरुन घरात तमाशा केला होता. त्यावेळी त्याच्यासाठी डॉक्टर आणण्यात आला. पण त्यावेळीही त्याने डॉक्टरला तू काय शिकला आहेस?  असे विचारुन डॉक्टरांनाही घाबरवले होते. घरात शालिनचा ॲटिट्युड पाहता त्याला आरसा सतत दाखवणे गरजेेचे असणार आहे. आता राहिला प्रश्न दिवसातून 300 ग्रॅम प्रोटीनचा तर आता सगळ्यांनीच त्या गोष्टीची मस्करी करायला घेतली आहे. त्यामुळे शालिन जरा सावध असे म्हणायची वेळ आली आहे. 

Leave a Comment