Bigg Boss 16: ‘आई शपथ’, शिव ठाकरेवर सेलिब्रिटीही आहेत फिदा

बरेचदा मराठी कलाकारांना हिंदी रिलालिटी शो मध्ये कमी लेखलं जातं असं पाहण्यात आलं आहे. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये मराठमोळ्या राहुल वैद्यला (Rahul Vaidya) प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. मात्र त्याला घरात अतिशय तुच्छ वागणूक मिळालेली दिसून येत होतं. तर Bigg Boss 15 ची विजेती ठरली मराठमोठी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash). बिग बॉस 16 (Bigg Boss 16) देखील सध्या गाजत आहे तो शिव ठाकरेमुळे (Shiv Thakare). शिवने याआधी रोडीज आणि बिग बॉस मराठी सीझन 2 हे दोन्ही रियालिटी शो केले आहे. त्यामुळे त्याला अनुभव आहे. मात्र कधी कधी हिंदीमध्ये असे खेळाडू येतात की त्यामुळे हे कलाकार मागे पडतात. मात्र सध्याच्या या सीझनला शिवने अत्यंत चलाखीने खेळत आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे सिद्ध केले आहे. प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही शिवच्या खेळण्यावर फिदा झालेले सध्या दिसून येत आहे. 

शिवचा खरेपणा आणि खिलाडू वृत्ती 

या सीझनमध्ये अनेक खेळाडू आहेत, जे बऱ्याच प्रमाणात कंटेट (Content) देत आहेत पण त्यातूनही टिकून राहणे आणि जास्तीत जास्त स्क्रिनटाईम मिळवणे हे प्रत्येक खेळाडूसाठी कठीण असते. मात्र हिंदीमध्ये असूनही शिवला अधिक दाखविण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे शिवचा खरेपणा आणि खिलाडू वृत्ती. तसंच कोणता खेळाडू कसा खेळतोय हे ओळखण्याची त्याची पारखी नजर. समोरच्या खेळाडूला समजून घेत, त्याची खेळी काय असेल याचा अचूक अंदाज लावत शिव आपले फासे फेकत असल्याने सध्या घरातील ‘मास्टरमाईंड’ ठरत आहे. शिवच्या खेळीपुढे अनेकांच्या खेळी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शालिन भानौतचा (Shali Bhanot) खोटेपणा उघड करण्यापासून ते एमसी स्टॅन (MC Stan) आणि अब्दुशी (Abdu Rozik) आपली मैत्री जपेपर्यंत शिव सर्वांनाच आवडत आहे. त्यामुळे सेलिब्रिटीही त्याचे चाहते झाले आहेत. अतिशय संयमाने आपली बाजू मांडणे असो अथवा एखाद्या गोष्टीविरूद्ध उभे राहणे असो शिव दोन्ही अत्यंत समतोलपणाने करत आहे. 

उर्वशी आणि रणविजय सिंघाने केले शिवचे कौतुक 

अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हा सीझन फॉलो करत असून तिने शिवचे ट्विट करत कौतुक केले आहे. शिवला ‘हुशार स्पर्धक’ असं तिने संबोधित केले असून आपल्याला हा सीझन आवडत असल्याचेही तिने म्हटले आहे. याशिवाय या स्पर्धकांसह आपल्यालाही सहभागी व्हायचे आहे असंही तिने कलर्सच्या टीमला या माध्यमातून सांगितले आहे. तर ‘आतापर्यंतचा बेस्ट कॅप्टन’ अशा आशयाचे ट्विट रणविजयनेही केले होते. तर शो मध्ये सध्या येत असणाऱ्या शेखर सुमनला (Shekhar Suman) देखील शिवची खेळी आवडत आहे. शो चा सूत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) यानेदेखील शिवचे आधीच कौतुक केले आहे. त्यामुळे शिवला केवळ प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही पाठिंबा देत आहेत. याशिवाय शिवच्या सोशल मीडिया फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. तर काही ठिकाणी मीम्समध्येही शिव या सीझनचा विजेता होईल असा अंदाज बांधला जात आहे. शिव ठाकरे असाच खेळत राहिला आणि भरकटला नाही तर या सीझनचा विजेताही मराठमोळाच असेल. दरम्यान प्रेक्षकांना शिव आणि अब्दुची (Shiv And Abdu Friendship) मैत्रीही खूप आवडत आहे. शिव खूप चांगली अब्दुची काळजी घेत असल्याचेही दिसून येत आहे आणि यात कोणताही दिखावा अथवा फेकपणा नाही. त्यामुळे आता शिव पुढे कसा खेळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

Leave a Comment