Bigg Boss मराठी : डॉ. रोहित शिंदे फुस्का बार, कपलगिरीमुळे गेम वाया

 Bigg Boss मराठीचा खेळ दिवसेंदिवस रोमांचक होत चालला आहे. खेळात पुढे जाताना एकेकाचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. नुकताच या घऱात सी- सॉचा टास्क झाला. त्यामध्ये विकास आणि किरण माने यांनी उत्तम कामगिरी केली. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीची चांगलीच चर्चा झाली. ज्या लोकांना घरातील काही तरुण मंडळी फुस्का बार समजत आहेत. पण तेच खरे फुस्का बार आहेत हे काही त्यांना लक्षात येत नाही. घरातील सदस्य आणि पेशाने डॉक्टर असलेला रोहित शिंदे (Rohit Shinde) अनेकदा बायस असलेला दिसून आला आहे. खेळताना त्याची आक्रमकता ही चुकीच्या दिशेने असते हे निदर्शनास येऊनही त्याला काहीच बोलले जात नाही असे दिसून येते.  शिवाय त्याच्यासोबत आलेली स्पर्धक रुचिरा जाधव हिचाही खेळ एवढ्या दिवसात दिसून आलेला नाही. रोहित- रुचिरा या दोघांचा खेळ हा कपलगिरीमुळे वाया गेल्याची चर्चा देखील होत आहे.

रोहित फक्त आवाज खेळात फुस्का बार

रोहित शिंदे आला त्यावेळी तो खेळात खूप चांगला असेल असे दिसले होते. पण त्यानंतर घरात जो काही टास्क झाला त्या टास्कमध्ये त्याची कामगिरी दिसून आलेली नाही. कोणत्याही टास्कमध्ये तो आता फारसा दिसत नाही. बाल्कनीत उभे राहून फक्त आरडाओरड करण्यातच त्याचा सहभाग दिसून आलेला आहे. त्यामुळे त्याची प्रसिद्धी अशीही कमी होताना दिसत आहे. घरात अनेकदा अशा काही परिस्थिती निर्माण होतात. ज्यावेळी घरातल्यांची भांडण होताना दिसतात. त्यामध्ये आपला असा कोणताही मुद्दा रोहितकडे नसतो. पण जर एखाद्या टार्गेट करुन दुसऱ्याशी भांडायचे असेल तर अशावेळी रोहित पुढे असतो. त्याच्या प्रोटीनचा डबा घरातल्यांनी लपवून ठेवल्यानंतर तो ज्या पद्धतीने आक्रमक झाला होता. त्यावेळी त्याने थोडा संयम ठेवणे गरजेचे होते. 

कपलमुळे खेळ होतोय वाया

Bigg Boss च्या घरात कपल म्हणून आल्यानंतर सगळ्यांच्या नजरा दोघांकडे असतात. अशावेळी खेळ उत्तम असेल आणि निर्णय घेण्याची क्षमता दिसून आली तरच या कपलला प्रेम मिळते. घरात आलेले रुचिरा- रोहित आता फारसे खेळताना दिसत नाही. रुचिरा ही खेळात कधीच सहभागी नसते. ती कोणताही खेळ पूर्णत्वास नेत नाही. आतापर्यंत कोणत्याही खेळात ती देखील खेळताना दिसली नाही. पण ती असा आव आणते की ती खूप खेळते त्यामुळे ती सध्या कोणाच्याही नजरेत येत नाही. याचा फायदा तिला या खेळात होताना दिसत आहे. रुचिरा कायम रोहितच्या प्रोटेक्शन शील्डमध्ये असल्यामुळे पुढे जाऊन या खेळात तिचे नक्कीच नुकसान होणार आहे यात काही शंका नाही.

वाईल्ड कार्ड एंट्रीही बायस

खरंतर ज्यावेळी काही एपिसोड पाहून एखादी व्यक्ती घरात येते अशावेळी तिला चांगलं कोण? वाईट कोण? याचा अंदाज आलेला असतो. ज्याचा फायदा चांगली टीम निवडण्याकडे होत असतो. घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेली स्नेहलता वसईकर हिने ही चुकीच्या दिशेने खेळ सुरु केला आहे. ज्याकडे अधिक तरुणमंडळी आहेत त्याच गटात ती जाऊन बसली आहे. खेळात ती चांगली असली तरी देखील तिचे विचार हे प्रेक्षकांना फारसे पटताना दिसत नाही. त्यामुळे स्नेहलतालाही योग्याची बाजू लवकर घ्यावी लागणार आहे. स्नेहलता आणि अपूर्वा आता घरात सारख्याच वावरताना दिसत आहे. 

आता राहिला प्रश्न रोहितचा तर त्यालाही डोळे उघडण्याची गरज आहे. कारण त्याचा घरातून पत्ता कधी कट होईल हे कळणार नाही. 

Leave a Comment