चविष्ट मॅगी नुडल्स बनविण्यासाठी लक्षात ठेवा या सोप्या गोष्टी

मॅगी नुडल्स (Maggi Noodles) हे केवळ एक फास्ट फूडच (Fast Food) नाहीये तर तर ती एक भावना आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात बाकी काही असो वा नसो मॅगीचे पाकिट हे नक्कीच सापडेल. मॅगीचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव आवडते. त्यामुळे मॅगीचे नाव घेतल्यावर चेहऱ्यावर एक छानसं हसू उमटतं. वास्तविक मॅगी नुडल्स बनवणं हीदेखील एक कला आहे आणि ती सर्वांनाच येते असं नाही. कारण सर्वांनाच चविष्ट मॅगी बनवता येत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. काही वेळा लहानसहान चुकांमुळे याची चव लागत नाही आणि स्वाद खराब होते. या लेखातून आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत, ज्या तुम्ही मॅगी नुडल्स बनवताना फॉलो करायला हव्यात. वाट कसली पाहताय घ्या जाणून. 

तेलाचा वापर नक्की करावा (Use Oil While Cooking Maggi)

बऱ्याच जणांना केवळ पाण्यात शिजवून मॅगी खाण्याची आवडत असते. हे पटकन तयार होते, त्यामुळे बरेचदा ही अशीच खाल्ली जाते. पण बरेचदा मॅगी अशीच बनवली तर ती भांड्याला चिकटून बसते. त्यामुळे केवळ मॅगीचा स्वादच बिघडत नाही तर ती तुम्हाला खाण्यासाठीही कमी पडते. तर काही जणांचे पाण्याचे प्रमाणच चुकते. त्यामुळे तुम्ही यासाठी सोपी ट्रिक वापरा. भांड्याला मॅगी चिकटणार नाही यासाठई तुम्ही तेलाचा नेहमी उपयोग करा. भांड्यात सुरूवातील तेल तापवून घ्या आणि मग त्यात मॅगी आणि पाणी घालून शिजवा. यामुळे मॅगी चिकटणार नाही आणि अधिक स्वादिष्ट लागेल. तुम्ही हवं तर मस्कादेखील वापरू शकता. याशिवाय तुम्ही आमटीप्रमाणे तेलात फोडणी देऊन त्यावर मॅगी परतवली तरीही त्याची चव अधिक चांगली लागते हे लक्षात ठेवा. 

कांदा – टॉमेटोचा करा कमी उपयोग (Do not use excessive Onion and Tomato)

Freepik.com

तुम्हीदेखील त्याच व्यक्तींपैकी एक आहात का? ज्यांना प्रत्येक पदार्थात कांदा आण टॉमेटो (Onion And Tomato) घातले म्हणजे त्याची अधिक चव येते असं वाटतं. असे अजिबात नाही. विशेषतः मॅगीच्या बाबतीत तर नाहीच नाही! ज्या व्यक्तींना व्हेजिटेबल मॅगी (Vegetable Maggi) आवडते त्यांनी संपूर्ण एक कांदा – टॉमेटो चिरून न टाकता विचारपूर्वक वापर करावा. जास्त कांदा आणि टॉमेटोचा वापर केल्याने याचा स्वाद गोड लागतो. त्यामुळे विचारपूर्वक याचा उपयोग करून घ्यावा. मॅगी बनवताना केवळ अर्ध्या कांदा आणि टॉमेटोचा वापर करावा. यामुळे चवही लागते आणि अतिरेक होत नाही. 

फ्राईड मॅगी बनविण्याची योग्य पद्धत (How To Make Fried Maggi)

Fried Maggi – Freepik.com

तुम्हाला फ्राईड मॅगी (Fried Maggi) आवडते का? पण भाजी घालून तळलेली मॅगी म्हणजे फ्राईड मॅगी नक्कीच नाही. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, फ्राईड मॅगीसाठी सर्वात आधी मॅगी मसाल्यासह नुडल्स उकडवून घ्या आणि त्यानंतरच भाजी घालून तुम्ही मॅगी नुडल्स तळून घ्या. ही पद्धत अत्यंत योग्य आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मॅगी बनवणार असाल तेव्हा या टिप्सचा नक्की वापर करून घ्या. 

या गोष्टींनी वाढवा मॅगीचा स्वाद 

  • तुम्ही फ्राईड मॅगी बनवत असाल तर त्यात सॉस आणि लिंबाचा रस मिक्स केल्याने याचा स्वाद अधिक वाढतो 
  • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅगीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि मिरचीची फोडणी देऊ शकता 
  • साधी मॅगी अधिक चविष्ट करण्यासाठी तुम्ही त्यात बटर आणि काळी मिरी पावडर मिक्स करून खा 

आम्ही दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आम्हाला खात्री आहे. अशा पद्धतीचे लेख वाचण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा dazzlemarathi.com वर. 

Leave a Comment