कोण आहे शिव ठाकरे

 बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi ) सीझन 2 चा विजेता होऊन शिव ठाकरे घराघरात जाऊन पोहोचला. सध्या शिव हा हिंदी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. हिंदी रिॲलिटी शोमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी आलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) नेमका कोण? त्याने या पदापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय केले? शिवसंदर्भातील या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

Bigg Boss 16| साजिदवर घेतला अनेक महिला सेलिब्रिटींनी आक्षेप

नाव- शिव ठाकरे

जन्म- 9 सप्टेंबर 1989

जन्मस्थळ- अमरावती

रोडीजमुळे बदलले आयुष्य

शिव ठाकरे (सौजन्य- Instagram)

तरुणांनी माहीत असलेला प्रसिद्ध असा आणखी एक रिॲलिटी शो म्हणजे रोडीज (Roadies). 2017 साली आलेल्या रोडीजचे आकर्षण ठरला तो म्हणजे अमरावतीचा शिव ठाकरे. तो या शोमध्ये ज्यावेळी आला त्यावेळी त्याने त्याचे नाव शिव मनोहरराव उत्तमराव झिंगोजीराव गणोजी ठाकरे असे सांगितले होते. त्याची नाव सांगण्याची ती पद्धत त्यावेळीही जजेसना चांगली भावली होती. हा रिॲलिटी शो तो जिंकला नसला तरी देखील तो लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला. रोडीजमध्ये आलेली आव्हाने त्याने खूपच चांगल्या रितीने पार पाडली होती. त्यामुळे त्याला या पहिल्या रिॲलिटी शोमधून चांगली प्रसिद्धी मिळाली. त्याचा फायदा त्याला बिग बॉस मराठी शो मिळण्यासाठी झाला. 

https://dazzlemarathi.com/2022/10/08/bigg-boss-marathi-4-house-samruddhi-jadhav-got-the-honor-of-being-the-first-captain-in-marathi/

उत्तम कामगिरी आणि विजय

 शिव ठाकरे ज्यावेळी बिग बॉस मराठीमध्ये आला. त्यावेळी त्याची केवळ रोडीज म्हणून ओळख होती. पण त्याने उत्तम गेम खेळून तो मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेताही झाला. उत्तम खेळ आणि चांगले विचार या बळावर तो हा सीझन जिंकला होता. सीझन जिंकण्यासोबतच त्याने त्याचा चांगला फॅनबेस मिळवला आहे. आपला माणूस या नावाने त्याचा बोलबाला चालतो. आता हिंदीच्या बिग बॉसच्या या नव्या सीझनमध्येही तो खूपच चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हा सीझन सुरु होऊन आता एक आठवडा झाला आहे पण तरीही त्याच्या अवतीभोवती लोकांना पकडून ठेवण्यात तो यशस्वी ठरत आहे.

कॉन्ट्राव्हर्सीज

#shiveena

शिव ठाकरे तसा तर अगदी साधा मराठी माणूस आहे. तो अमरावतीत डान्स क्लास देखील घेतो.तो ज्यावेळी बिग बॉसमध्ये होता. त्यावेळी त्याची चांगली मैत्री ही अभिनेत्री वीणा जगतापसोबत झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यांची ही जोडी अनेकांना पसंतीस पडली होती. #shiveena हा देखील चांगलाच ट्रेंड झाला होता. पण या दोघांचे एकत्र दिसणे अचानक बंद झाले. सुरुवातीला त्यांनी याचे उत्तर फॅन्सना दिले. शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचे तिने सांगितले. सुरुवातीला या गोष्टीवर अनेकांना विश्वास बसला पण त्यानंतर मात्र अचानक त्यांचे दिसणे कायमचे बंद झाले. वीणाने काढलेला टॅटूही काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे या रिलेशनशीपला कायमचा फुलस्टॉप मिळाला. नात्यांचा विचार करायचे झाले तर तो त्याच्या घरातल्यांचा सगळ्यांचा लाडका आहे. त्याची बहीण ही त्याच्या खूप जवळची आहे. त्यामुळे त्याचे काही कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओ यामध्ये कायम दिसतात. 

आता बिग बॉस 16 मध्ये तो आपला तोच स्पार्क दाखवून सीझन जिंकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Leave a Comment