गौतमने शिव विरोधात केले असे विधान की, सोशल मीडियावर रंगली चर्चा

 Bigg Boss 16 वरुन आता एक नवीच चर्चा समोर होऊ लागला आहे. घरात काही दिवसांपूर्वी शालिन आणि स्टॅनमध्ये जो राडा झाला होता. त्यामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakre) चे नावही पुढे आले होते. घरातून शिवला काढून टाका असा तगादा त्यावेळी स्पर्धक प्रियांका (Priyanka Chahar Choudhary) ने लावला होता. स्टॅन आणि शालिनमध्ये झालेल्या भांडणात स्टॅनने शालिनला मारण्यासाठी अंगावर काचेची वस्तू धावून निघाला होता. हे सगळ्यांनी प्रोमोमध्ये आणि एपिसोडमध्येही पाहिले होते. पण असे असताना घराबाहेर नुकताच एविक्ट झालेला स्पर्धक गौतम विजने शिववर एक वेगळाच आरोप केला आहे. बिग बॉसच्या घरात घडले वेगळे आणि दाखवले वेगळे असे म्हणत त्यांनी एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे. जो धक्कादायक आहे.

शिवचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

 शालिन आणि स्टॅनचा वाद सोडवायला शिव गेला हे आपण सगळेच जाणतो. पण शालिनला मारण्यासाठी शिवने घरातील खूर्ची उचलली होती. स्टॅनपेक्षा शिव हा अधिक आक्रमक झाला होता. पण या गोष्टी प्रेक्षकांना दाखवण्यात आलेल्या नाहीत. या गोष्टी कटाक्षाने टाळण्यात आलेल्या आहेत असा अजब दावा त्याने केलेला आहे. त्याने हे विधान केल्यानंतर आता एक व्हिडिओही वायरल होऊ लागला आहे. हा अगदी दोन सेकंदाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये शिवच्या हातात ब्रेकफास्ट चेअर दिसत आहे. पण हा व्हिडिओ नक्की खरा आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ ज्याने ट्विट केला आहे ते एक बिग बॉसचे फॅन पेज आहे. त्यामुळे त्यात किती सत्यता आहे ते कठीणच आहे. पण हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. शिवसमर्थकांनी शिवची बाजू घेत कमेंट केल्या आहेत. तर शिवविरोधकांनी शिवविरोधात कमेंट्सचा पाऊस केला आहे. पण यामध्ये एक गोष्ट खरी आहे की, जर शिवने शालिनवर हात उचचला असेल तर शालिनने शिवशी चांगले राहण्याची काहीही गरज नाही. असे असताना शालिन-शिवचे नाते चांगले दिसून आले आहे. मग असे असताना गौतमची शिवविरोधात अशी तक्रार का? असा प्रश्न आहे. 

गौतम वीग घराबाहेर जाताच सौंदर्याचे बददले रंग

खरंतरं गौतम वीग या घरात असताना त्याने तशी काही वाखाणण्यासारखी कामगिरी केलेली नाही. तो केवळ सौंदर्यासोबतच घरात दिसला. त्यातही त्यांची जी काही लव्हस्टोरी त्याने दाखवली होती. ती देखील स्क्रिनवर कंटाळवाणी दिसत होती. त्याचा फटका गौतमला बसणे अगदी साहजिक होते. गौतम घराबाहेर जाताना सौंदर्या रडली पण त्यानंतर आता ती शालिन- टिनाचे नाते तुटावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे यांची जोडी घरात आल्यानंतर टिकेल असे वाटत नाही. पण गौतमने ज्या काही मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी शिवला खूप फेव्हर मिळते असे सांगितले. याशिवाय साजिद खान, शालिन यांना देखील खास वागणूक दिली जाते असे सांगितले जाते. टिना- शालिन- स्टॅनची जे काही भांडण झालं त्यासंदर्भात त्याने घराच्याबाहेर येऊन काही वेगळी मतं मांडली आहेत. गौतमने मुलाखतीत त्या भांडणात शिवचे कुठेही नाव घेतलेले दिसत नाही. पण आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर गौतमच्या नावाने हा व्हिडिओ वायरल होताना दिसत आहे. 

दरम्यान गौतमला जरी असे वाटले की तो या खेळात खूप उत्तम होता. पण असे अजिबात दिसून आले नाही.  

Leave a Comment