केवळ 200 रूपयात मिळवा जास्त काळ टिकणारे ब्रँडेड काजळ, जाणून घ्या

मेकअप करणे तर अनेक महिलांना आवडते. त्यासाठी वेगवेगळे मेकअप किट्स (Makeup Kits) आणि उत्पादनही आपण विकत घेतो. पण मेकअपची अनेक उत्पादने ही सगळ्यांच्या खिशाला परवडतातच असं नाही. त्यामुळे अनेक जण ब्रँडची उत्पादने (Branded Products) न घेता स्थानिक उत्पादने खरेदी करतात पण यामुळे त्वचेला नुकसानही होते. कारण यामध्ये वेगळ्या पद्धतीचे केमिकल वापरण्यात येते. मेकअपचा अविभाज्य भाग म्हणजे काजळ (Kajal). कमी पैशात पण चांगल्या दर्जाचे काजळ जे टिकून राहील आणि स्मजप्रूफ असेल अशी ब्रँडेड उत्पादने तुम्हाला रूपये 200 पर्यंत मिळू शकतात.अनेकांना याबाबत माहीतच नसते. तुमच्या खिशात जास्त पैसे नसतील मात्र तुम्हाला ब्रँडेड काजळ (Branded Kajal) वापरायचे असेल तर त्यासाठी कोणता ब्रँड निवडावा याबाबत ही माहिती. 

लॅक्मे आयकॉनिक काजळ (Lakme Eyeconic Kajal)

Lakme Eyeconic Kajal – Amazon.com

लॅक्मे हा खूप जुना आणि तितकाच नावाजलेला ब्रँड आहे. जास्त वेळ टिकणारे काजळ हवे असेल तर तुम्हाला यामध्ये साधारण 0.35 ग्रॅमचे काजळ मिळते जे अधिक काळ टिकते. हे काजळ मॅट असून वॉटरप्रूफदेखील आहे. तसंच दिवसभर व्यवस्थित डोळ्यात टिकून राहते आणि पसरून डोळे खराब दिसत नाहीत. 

किंमत – रूपये 148/-

एल 18 आय ड्रामा काजल (Elle 18 Eye Drama Kajal)

Elle 18 Eye Drama Kajal, Super Black – Amazon.com

सर्वात स्वस्त आणि मस्त असे हे काजळ आहे. तसंच हा ब्रँडदेखील जुना असून याची उत्पादनेही उत्तम आहेत. एल 18 चे हे काजळ वॉटरप्रूफ असून यात मॉईस्चराईजर आहे आणि त्याशिवाय हे डोळ्यांमध्ये अधिक काळ टिकून राहते आणि त्याशिवाय स्मजप्रूफदेखील (Smudge Proof) आहे. 

किंमत – रूपये 85/-

मेबिलिन न्यूयॉर्क कोलोस्सल काजल (Maybelline New York Colossal Kajal)

Maybelline New York Colossal Kajal – Amazon.com

मेबिलिन या ब्रँडचे मेकअप उत्पादन नेहमीच चांगले मानले जाते. याचे नाव ऐकून अनेकांना याची उत्पादने महाग वाटतात. पण या ब्रँडचे काजळ दिवसभर चांगले टिकून राहते. यामध्ये कोरफड मिक्स असून स्मजप्रूफ आहे. त्यामुळे घाम आल्यानंतर हे काजळ पसरत नाही आणि डोळे अधिक आकर्षक दिसण्यास मदत मिळते. 

किंमत – रूपये 135/-

शुगर कॉस्मेटिक्स कोहल ऑफ हॉनर इंटेन्स काजळ (SUGAR Cosmetics Kohl Of Honour Intense Kajal)

SUGAR Cosmetics Kohl Of Honour Intense Kajal – Amazon.com

शुगर हा ब्रँडही कमी वेळात खूपच महिलांचा आवडीचा झाला आहे. याचे उत्पादन तुमच्या त्वचेवर जास्त काळ टिकते. हे काजळही 12 तास तुमच्या डोळ्यात टिकून राहते. तसंच हे काजळ पेन्सिल स्वरूपात असल्याने वापरणे अत्यंत सोपे आहे. तसंच हे काजळ गडद असून तुमचे डोळे अधिक आकर्षक करण्यासाठी आणि याचा आयशॅडो म्हणूनही तुम्हाला उपयोग करून घेता येतो. 

किंमत – रूपये 199/-

नायका ब्लॅक मॅजिक काजळ (Nykaa Black Magic Kajal)

Nykaa Black Magic Kajal- Black
Nykaa Black Magic Kajal- Black – Amazon.com

साधारणतः 0.3 ग्रॅम इतके काजळ यामध्ये मिळते. नायकाचे काजळ वापरणे सोपे असून हे स्मजप्रूफ आणि अधिक काळ टिकणारे आहे. तसंच यावर अनेकदा सूटही उपलब्ध असतात. नायकाचे सतत सेल चालू असल्यामुळे तुम्ही हे कमी किमतीत विकत घेऊ शकता. 

किंमत – रूपये 170/-

तुम्हाला आम्ही दिलेल्या यादीपैकी कोणतेही काजळ आवडले तर नक्की हे आर्टिकल शेअर करा आणि कमेंट करा. तसंच तुमच्या त्वचेला यापैकी कोणते काजळ योग्य दिसून येईल हेदेखील एकदा नक्की पडताळून पाहा. 

Leave a Comment