सकाळची सुरूवात करा हेल्दी, त्वचा दिसेल अधिक तुकतुकीत

सकाळी जेव्हा आपण झोपून उठतो, तेव्हा पोटातील पीएच स्तर (PH Level) हा अॅसिडिक असतो. तसंच मेटाबॉलिजमदेखील (Metabolism) हळू असते. रात्रभर आपण काही खात पित नाही. त्यामुळे सकाळी सकाळी पोटात सगळ्यात पहिले जो पदार्थ जातो तो पटकन शोषून घेतला जातो. त्यामुळे सकाळची सुरूवात ही हेल्दी आणि उत्तम पेयांपासून झाली तर त्याचा तुमच्या त्वचेला आणि केसांना नक्कीच फायदा (Benefits for skin and hair) मिळतो. हे दोन्ही फायदे मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला काही हेल्दी पेयांबाबत या लेखातून सांगत आहोत. तुम्ही घरच्या घरी हे तयार करू शकता. हे बनविण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याचीही गरज नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही. काही मिनिट्समध्ये तयार होणारे हे ड्रिंक्स (Healthy Drinks) तुमची त्वचा अधिक तुकतुकीत (Glowing Fresh Skin) करण्यास फायदेशीर ठरते. 

लिंबू आणि मधाचे पाणी (Lime and Honey Water)

Lime and Honey Water – Freepik.com
  • हलक्याशा कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पाणी प्यायल्यास, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जाण्यास मदत मिळते 
  • लिंबाचा रस त्वचेच्या समस्येला कारणीभूत ठरणाऱ्या फंगची वाढ होऊ देत नाही. त्यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि तजेलदार दिसते 
  • मधामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे त्वचेवरील इन्फेक्शनपासून आपली सुटका करते. तसंच त्वचेवरील अधिक तेल काढून त्वचेमध्ये अधिक चमकदारपणा आणण्यास मदत करते

ग्रीन टी (Green Tea)

Green Tea – Freepik.com
  • तुम्हाला उठल्यानंतर चहा हवाच असेल तर ही सवय जरा बदला. सकाळी दुधाचा चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी प्यावा 
  • ग्रीन टी मुळे रात्रभर सुस्त झालेल्या मेटाबॉलिज्मला जागं करण्यास मदत मिळते 
  • यामध्ये असणारे फ्लेवेनॉईड्स तुमच्या एजिंगच्या समस्येला (Ageing Problem) थांबविण्यास मदत करतात 
  • ग्रीन टी मधील पॉलीफेनॉल्स त्वचेतील विषारी पदार्थ काढून त्वचा अधिक चकचकीत आणि फ्लॉलेस बनविण्यास मदत करतात

काकडी आणि पालक ज्युस (Cucumber And Spinach Juice)

Cucumber And Spinach Juice – Freepik.com
  • काकडीसह पालकाच्या ताज्या पानांचा वापर करून ज्युस बनवा. यामध्ये तुम्ही एक चमचा मध मिक्स केला तर तुम्हाला अधिक फायदा मिळतो 
  • हा फायबरयुक्त ज्युस तुमच्या त्वचेला हायड्रेट राखण्यास मदत करतो
  • काकडी आणि पालक हे दोन्ही विटामिन ए युक्त असतात. याचा रस नियमित प्यायल्याने त्वचेवरील पिगमेंटेशन निघून जाण्यास मदत मिळते. तसंच चेहऱ्यावरील काळे डाग आणि अॅक्नेदेखील कमी करण्यास याचा फायदा होतो 

गाजर आणि बीटाचा ज्युस (Carrot and Beetroot Juice)

Carrot and Beetroot Juice – Freepik.com
  • गाजर आणि बीट हे दोन्ही पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे. त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. याशिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्यातूनही सुटका मिळण्यास मदत मिळते. कारण पचनाच्या समस्येने त्वचेवर अधिक त्रास निर्माण होतो 
  • हा रस संपूर्ण शरीर डिटॉक्स करतो आणि त्याशिवाय यकृत प्रक्रियादेखील व्यवस्थित राखण्यास मदत मिळते
  • हा ज्युस नियमित प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि मुलायम राहते. तसंच ज्यांना सतत मुरूमांचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे

हळदीचे दूध (Turmeric Milk)

Turmeric Milk – Freepik.com
  • फेसपॅकसह वापरण्यात येणारी हळद पावडर जेव्हा दुधात मिसळून पिण्यात येते तेव्हा त्याची ताकद अधिक प्रमाणात वाढते 
  • हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असून त्वचा अधिक चांगली होते आणि दुधातील कॅल्शियम आणि पोषक तत्व त्वचेला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते
  • अँटीबॅक्टेरियल गुण असणारे हळदीचे दूध नव्या पेशींची वाढ त्वरीत करण्यास उपयोगी ठरते आणि एजिंग प्रक्रिया हळू करण्यासही फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा अधिक तरूण आणि निरोगी राहाते 

(विशेष सूचनाः हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणत्याही पदार्थाची अलर्जी असल्यास, पॅच टेस्ट करून घ्या)

Leave a Comment