थेट कानाखाली वाजवत अपूर्वाने घेतला प्रसादशी पंगा, प्रेक्षकांमध्ये नाराजी

बिग बॉस मराठीचा सीझन 4 (Bigg Boss Marathi S4) आता एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहचला आहे. आपण जसे बाहेर आहोत तसेच घरात राहून प्रेक्षकांचं मन जिंकणं हा खेळातील महत्त्वाचा भाग. मात्र या सीझनमध्ये अनेक कलाकारांनी सहभागी होऊन आपली इमेजच खराब केल्याचं आता दिसून येत आहे. दिवसेंदिवस हा खेळ अधिक रंगत असून वादही विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घरातील वातावरण आणि एकमेकांसह असणारा बाँडही बदलत असलेला दिसत आहे. नुकतीच या आठवड्यात टुकटुकराणी यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar) बाहेर पडली आहे. तर किरण मानेला (Kiran Mane) बाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो आता समोर आला आहे आणि यामध्ये प्रसाद जवादे (Prasad Jawade) आणि अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी पाहयाला मिळत असून सध्या प्रसादच्या अपूर्वाने कानाखाली मारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. 

कॅप्टन्सीच्या स्पेशल टास्कमध्ये हाणामारी 

आज रात्री काय घडणार याचा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये कॅप्टन्सी मिळविण्यासाठी स्पेशल टास्क देण्यात आल्याचे दिसून येत आहे. कॅप्टनपद मिळविण्यासाठी दोन्ही टीम एकमेकांशी भिडल्या असून जी टीम हत्तीच्या गळ्यात अधिक हार घाणार त्या टीममधील सदस्याला कॅप्टनपद मिळणार आहे. त्यासाठी सगळेच स्पर्धक जीव तोडून खेळताना दिसत आहेत. एक टीम आहे अपूर्वा आणि अक्षयची आणि दुसरी टीम आहे तेजस्विनी आणि प्रसादची.  तेजू आणि अपूर्वामध्ये हार घेण्यासाठी भांडण होते आणि त्यावर प्रसाद अपूर्वाला असं म्हणताना दिसून आला की, ‘आरडाओरड आणि भांडण याशिवाय तुला दुसरं काहीच येत नाही’ हे ऐकल्यानंतर अपूर्वाने चिडून प्रसादशी अजून भांडायला सुरूवात केली आणि त्याचा शेवट प्रसादच्या कानाखाली मारण्यापर्यंत झाल्याचे प्रोमोमध्ये दिसून येत आहे. 

अपूर्वाला काढण्यासाठी प्रेक्षकांचा कमेंट्सचा पाऊस

अपूर्वाची ही अरेरावी पाहून प्रेक्षकही चांगलेच भडकले असल्याचे दिसून येत आहे. प्रोमोच्या खाली सोशल मीडियावर अपूर्वावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी तेजस्विनी आणि प्रसादची बाजू घेतली आहे. अपूर्वा कायम अरेरावी करूनच खेळते आणि आता तिची घरी जायची वेळ आली आहे अशा आशयाच्या अनेक कमेंट्स दिसून येत आहेत. बिग बॉसच्या नियमानुसार कोणीही घरात हिंसा करू शकत नाही. जर अपूर्वाने खरंच प्रसादच्या कानाखाली मारली असेल तर बिग बॉसने तिला घराबाहेर काढावे असंही अनेकांचं म्हणणं आहे. तसंच अपूर्वाने पहिल्या आठवड्यापासूनच प्रसादशी पंगा घेतला असून नक्की प्रसादने तिचं काय वाकडं केलं आहे की इथपर्यंत अपूर्वाची मजल गेली असा सवालही अनेक जण आता करू लागले आहेत. ज्यांना अपूर्वा आवडते त्यांनाही तिचं हे वागणं नक्कीच पटलेलं नसल्याचं कमेंट्सवरून दिसून येत आहे. आता या प्रकरणावरून अपूर्वा घरात राहणार की बाहेर जाणार? तिला वेगळी वागणूक मिळणार का?  तिच्यावर नक्की काय कारवाई होणार की प्रकरण अजून काही वेगळं आहे हे पाहणं औत्सुक्याचे आहे. 

Leave a Comment