स्किन पिअर्सिंगवर होणार नाही इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी

अनेकांना आपला लुक ट्रेंडी असावा असं वाटतं. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पिअर्सिंग (Piercing) करण्यात येते. केवळ कान आणि नाक न टोचता आपल्या ओठांपासून ते आयब्रोपर्यंत अनेक ठिकाणी पिअर्सिंग करण्यात येते. विशेषतः महाविद्यालयीन मुलंमुली ही फॅशन अधिक प्रमाणात करताना दिसतात. खरं तर पिअर्सिंग तुमचा लुक पूर्णतः बदलून टाकते. पण बरेचदा हे टोचून घेतल्यानंतर अनेकांना इन्फेक्शन झालेले देखील ऐकिवात येते. पिअर्सिंग केल्यानंतर त्वचा सुजण्यापासून ते काही दिवस सतत टोचलेल्या जागी दुखेपर्यंत आणि त्यात अगदी पू देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिअर्सिंग केल्यानंतर त्वचा संपूर्णतः चांगली राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला काही विशिष्ट टिप्स सांगणार आहोत, तुम्ही पिअर्सिंग करून घेतले असेल तर तुम्ही या गोष्टी नक्की वाचा आणि लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही इन्फेक्शनपासून दूर राहू शकता.  

माऊथवॉशने तुम्ही ओरल पिअर्सिंग स्वच्छ करून घ्या (Oral Piercing)

सौजन्य – Freepik.com

तुम्ही तुमच्या जीभ, ओठ अथवा गालावर पिअर्सिंग करून घेतले असेल तर कोणत्याही इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी प्रत्येक वेळी जेवल्यानंतर आणि झोपायला जाण्याच्या आधी अल्कोहोलमुक्त आणि अँटिसेप्टिक माऊथवॉशचा (Antiseptic Mouthwash) वापर करून तुम्ही चूळ भरा. पिअर्सिंग नंतर तुमच्या तोंडामध्ये बॅक्टेरियाने प्रवेश करू नये आणि त्यापासून वाचण्यासाठी एक सॉफ्ट टूथब्रशचा उपयोग तुम्ही करा. जेणेकरून तुम्ही इन्फेक्शनपासून लांब राहू शकता. 

स्किन पिअर्सिंगसाठी स्वच्छता (Skin Piercing)

तुम्ही तुमच्या त्वचेच्या कोणत्याही भागावर टोचून घेतले असेल तर ती जागा तुम्ही दिवसातून दोन वेळा तरी किमान साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. तसंच तुम्ही जेव्हा पिअर्सिंगच्या ठिकाणी हात लावणार असाल तेव्हा तुमचा हात स्वच्छ आहे की नाही याचीही खात्री करून घ्या. लक्षात ठेवा की, पिअर्सिंगच्या जागेवर कोणत्याही इन्फेक्शनला जागा देऊ नका. अन्यथा त्यामध्ये पू होऊन तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्याशिवाय पिअर्सिंग केल्यावर बटाट्यासारखे पदार्थ खाऊ नका, ज्यामुळे त्वचेला अधिक त्रास होऊ शकतो. 

सावधानता बाळगा 

सौजन्य – Freepik.com

पिअर्सिंग केल्यानंतर ती जागा नेहमी स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे हे सत्य आहे. पण हेदेखील लक्षात ठेवा की, तुम्ही जे उत्पादन वापरत आहात ते अल्कोहोलमुक्त आहे की नाही याची खात्री करा. अल्कोहोल हे आपली त्वचा अधिक कोरडी बनवते. त्यामुळे त्वचा फाटून त्यातून रक्तस्राव होऊ शकतो आणि जखम उघडी राहिल्यास, त्यातून लवकर सुटका होत नाही. त्यामुळे तुम्ही सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही तेलयुक्त अशा साबण्याचा अधिक उपयोग करा, जेणेकरून जखम स्वच्छ राहील. याशिवाय पिअर्सिंग सतत स्वच्छ करत राहू नका कारण त्यामुळेदेखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

पोहायला जाणे टाळा (Avoid Swimming)

तुम्ही नुकतेच पिअर्सिंग करून आला असाल आणि तुम्हाला त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही पोहायला जाणे टाळा. स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन मिक्स करण्यात आलेले असते. हे तुमच्या स्किनला इन्फेक्शन होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे स्वतःहून त्रासाला आमंत्रण न देता तुम्ही अशा कालावधीत पोहायला जाणे टाळा. 

पिअर्सिंग दागिन्यांना सतत हात लावू नका 

सौजन्य – Freepik.com

पिअर्सिंग केल्यानंतर तुम्ही जो दागिना घातला आहे. त्याला सतत हात लावू नका. साधारण सहा आठवड्यात हा दागिना तुमच्या त्वचेमध्ये फिट होतो. पण काही जणांच्या त्वचेसाठी वेळ लागतो. रात्री झोपताना हे तुम्ही काढून ठेवू नका. तसंच तुम्ही अगदी लगेच पिअर्सरच्या मदतीशिवाय हे बदलू नका. पिअर्सिंग ठीक होईपर्यंत तुम्ही कॅफीन, निकोटिन आणि अल्कोहोलचे सेवन न करणे योग्य ठरते. त्यामुळे या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. 

या गोष्टीचीही घ्या काळजी 

काही मुली आपल्या योनीमध्येही पिअर्सिंग करून घेतात आणि तसं केलं असेल तर त्वरील यौनसंबंध (Sex) करणे टाळा. लक्षात ठेवा की, तुमची पिअर्सिंग नुकतीच झाली असेल तर सेक्स करताना दुखापत होऊ शकते. कारण सेक्स करताना वाईल्ड झाल्यास, त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. तसंच यामुळे इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. याशिवाय तुम्ही जीभ वा ओठावर पिअर्सिंग केले असेल तर तुम्ही ओरल सेक्स (Oral Sex) करणेही योग्य नाही. त्यामुळे जोपर्यंत पिअर्सिंग ठीक होत नाही तोपर्यंत सेक्स करणे टाळा. 

पिअर्सिंग केल्यानंतर या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 

प्रवासात नक्की कॅरी करा या महत्वाच्या गोष्टी

ब्लाऊज झाला असेल ढगळ, तर वापरा सोप्या टिप्स

Diwali 2022: दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

Leave a Comment