लग्नाच्या सीझनसाठी निवडा या महागड्या साड्या, दिसाल एकदम रॉयल 

सध्या लग्नाचा सीझन धुमधडाक्यात सुरु आहे. त्यामुळे खरेदीला सगळीकडेच गर्दी दिसते. लग्नात महिलांची खरेदी ही खूप खास असते. कारण लग्न जर खूप जवळच्या व्यक्तीचे असेल तर अशावेळी तर साड्या या अगदी महागड्याच हव्या असतात. पण नुसत्या महाग असून त्या चालत नाही तर त्यांचा लुक रॉयलही दिसायला हव्या असतात. आज आपण लग्नाच्या सीझनसाठी अशाच काही साड्या पाहणार आहोत. ज्या किंमतीने महाग नक्कीच असतील पण या साड्या तुम्हाला लग्नात चांगलाच रॉयल लुक देतील.

मुनिया पैठणी साडी ( Muniya Paithani Saree) 

अभिनेत्री मिताली मयेकरने नेसलेली सुंदर मुनिया साडी

पैठणी साडी ही सगळ्याच महिलांची सगळ्यात फेव्हरेट अशी साडी आहे. एकतरी पैठणी असावी असे प्रत्येकीला वाटते. हल्ली पैठणी 2हजार रुपयांपासून मिळतात. पण तरीही ओरिजनल आणि खास डिझाईन असलेल्या पैठणी साड्या या आजही तुम्हाला 10 हजार रुपयांच्या पुढे मिळतात. सिल्क, जरी, त्यावरील नक्षीकाम यावर त्या साडीची किंमत अवलंबून असते. साधारणपणे पैठणमध्ये कलाजंली पैठणी, महाराणी पैठणी, लोटस बॉर्डर पैठणी,मुनिया पैठणी,ब्रोकेट पैठणी असे वेगवेगळे प्रकार मिळतात. या सगळ्याच साड्यांची रेंज ही 20 हजारच्या पुढे आहे. आज आपण जिची माहिती घेणार आहोत ती आहे मुनिया पैठणी. एक विशिष्ट बॉर्डर असलेली ही साडी अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. याच्या काठावर काही अंतरावर आकडे असतात. जे दिसायला खूप सुंदर दिसतात. या साड्यांवर तुम्हाला बुट्टे, मोर अशा डिझाईन मिळू शकतात.यात सिंगल मुनिया, डबल मुनिया, ट्रिपल मुनिया असे असते ज्यामुळे त्याची बॉर्डर मोठी होऊ लागते.  या पैठणी रॉयल कलेक्शनमध्येच मिळतात. यामधील सिल्कसाड्यांचा प्रकार हा अधिक उठून दिसतो. या साड्याच इतक्या सुंदर असतात की, तुम्हाला हेवी ज्वेलरी करण्याचीही फारशी गरज नसते.

कांजिवरम साडी (Kanjivaram Saree)

सुंदर कांजिवरम साडीमध्ये रेखा

कांजिवरम साडी ही देखील महागड्या साड्यांमध्ये येते. हल्ली कमी किंमतीत कांजिवरम साड्या नक्कीच मिळतात पण खऱ्या कांजिवरम साड्यांचा लुक हा फार वेगळा असतो. अनेकदा अभिनेत्री रेखाला तुम्ही सुंदर अशा साड्यांमध्ये पाहिले असेल. तिच्या साड्या या चकचकीत आणि कायम रिच फिल देणार्या असतात. कांजिवरम साड्यांची खासियत ही त्या साडीची बॉर्डर आहे. या साड्यांना मोठ्या बॉर्डर असतात. साडीचे अंग हे देखील भरलेले असते. पण यासाडीचे कॉम्बिनेशन इतके सुंदर असते की त्यामुळे या साड्या नेसल्या की, तुम्ही चारचौघात ही साडी नेसल्यावर उठून दिसणार नाही असे अजिबात होणार नाही. कांजिवरम साड्या यादेखील 10 हजारांच्या पुढे आहे. साधारण 15 पासून पुढे असणाऱ्या साड्यांची चमक ही खूपच सुंदर असते. पण तुम्ही योग्य आणि विश्वासू दुकानातूनच या साडीची खरेदी करा.

प्युअर बनारसी साडी ( Banarasi Saree)

बनारसी साडी

बनारसी साड्या या देखील हेवी आणि लग्नासाठी एकदम परफेक्ट अशा प्रकारातील आहेत. बनारसी साड्या या दिसायला खूपच रिच लुक देतात. या साड्या थोड्या जाड असतात. म्हणून अनेक जण घ्यायला बघत नाहीत. पण सिल्क प्रकारातील काही साड्या या नेसण्यासाठी तशा सोप्या जातात. नवरीसाठी बनारसी साडी ही एकदम परफेक्ट आहे. बनारसी साड्या आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत यामध्येही तुम्हाला छान नाजूक डिझाईन आणि चांगल्या बॉर्डर मिळतात. ज्या तुम्ही अगदी हमखास घ्याव्यात अशा आहेत. बनारसी साड्यांची किंमत 15 हजारांच्या पुढेच असतात. असे म्हणतात की या साड्यांमध्ये पूर्वीच्या काळी सोन्याच्या आणि चांदीच्या जरी वापरल्या जात ज्यामुळे ही साडी खूप जड असते. 

आता लग्नासाठी  हेवी साड्यांचा प्रकार निवडायचा विचार करत असाल तर तुम्ही यातील एक पर्याय नक्कीच निवडा

Leave a Comment