Happy New year नवीन वर्षांच्या शुभेच्छा संदेश

 अगदी थोड्याच दिवसावर नव वर्ष येऊन ठेपलंय. 2022 मधून 2023 मध्ये पदार्पण करणार आहोत. जुन्या गोष्टी मागे ठेवून आता नव्या वर्षात नव्या गोष्टी करण्याचे अनेकांचे प्लॅन नक्कीच असतील. खूप जणांकडे नव्या वर्षी न्यू इयर (New Year Eve) ची पार्टी असते. प्रत्येकवेळी पार्टी करणे शक्य नसते किंवा सगळ्यांनाच भेटता येत नाही. अशावेळी तुमच्या शुभेच्छा नक्कीच कामी येतात. नव्या वर्षाची सुरुवात तुमच्या खास शुभेच्छांनी झाली तर तुमच्या जवळच्या व्यक्तिंनाही एक नवा उत्साह मिळेल. चला जाणून घेऊया Happy New year नवीन वर्षांच्या शुभेच्छा संदेश.हे शुभेच्छा संदेश तुम्हाला sms आणि whatsapp च्या माध्यमातून पाठवण्यात येऊ शकतात.

Happy New Year नवीन वर्षाच्या शुभेच्छा

आज आम्ही तुमच्यासाठी 10 शुभेच्छा शोधून काढल्या आहेत. या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील अशा आहेत.

 • येवो समृद्धी अंगणी,
  वाढो आनंद जीवनी,
  नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 •  दु:ख सारी विसरुन जाऊ,
  सुख देवाच्या चरणी वाहू,
  स्वप्ने ही उरलेली नव्या या वर्षी
  पूर्ण करुया
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • येणारे नवे वर्ष तुमच्या आयुष्यात
  आनंदी आनंद आणो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
   
 • नवे वर्ष घेऊन येवो नवा आनंद
  इच्छा पूर्ण होवो तुमच्या सर्व
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 • सरतं वर्ष जाऊ दे,
  येत्या वर्षात करा नव्या कामाची सुरुवात
  तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा खास
 •  आनंदी आनंद झाला,
  नवीन वर्षाचा दिवस जो जवळ आला
 • नव वर्ष घेऊन येवा सुखाचा प्रकाश,
  नशिबाची दारं उघडावी आणि आनंद यावा खास,
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 •  नव्या वर्षी संस्कृती ही आपली जपूया,
  मोठ्याच्या चरणी मस्तक एकदा तरी ठेऊया,
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 •  क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही,
  कष्ट अपरंपार असतील तर यशालाही पर्याय नाही,
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा

आता तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की या खास शुभेच्छा पाठवायला विसरु नका.

Leave a Comment