Bigg Boss 16 : टिनाला आता कळली शिवची किंमत

 Bigg Boss 16 च्या घरात नवनवे ट्विस्ट येऊ लागले आहेत. या शोचा उत्तरार्ध आता चांगलाच रंगू लागला आहे. नुकतीच या घरातून टिना दत्ता ( Tina Datta) बाहेर पडलेली दिसली. पण ती इतक्या लवकर कशी काय जाऊ शकते यावर विश्वास होत नव्हता. तो विश्वास आता खरा ठरला आहे कारण या घरात टिना परत आली आहे. शालिन- टिनाच्या नात्याची बाहेर जोरदार चर्चा होत असताना खरं काय आहे? त्यासाठी तिला काही काळासाठी या घरातून बाहेर काढण्यात आले खरे. पण आता ती परतल्यानंतर पुन्हा एकदा घरातील समीकरण बदलेली पाहायला मिळाली आहे.  पण यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, ज्या शिव ठाकरे ( Shiv Thakare) सोबत तिने वाद घातला त्याला येऊन टिनाने जे काही बोलले त्यामुळे सगळीकडे याची चर्चा होऊ लागली आहे.

टिनाला कळली शिवची किंमत

शिव- टिना यांची मधल्या काळात चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. पण कॅप्टन्सीच्या टास्कनंतर टिनाने शिववर एक वेगळाच निशाणा साधायला सुरुवात केली. टिनाने कारण नसताना शिवशी वैरही घेतले. त्यामुळे एक आठवडाभर ती फक्त शिवविरोधी झालेली दिसली. त्यामुळे तिच्याबद्दल शिव फॅन्समध्ये एक नाराजी पसरली होती. शिव हा खेळात टिनावर विश्वास ठेवताना दिसत नाही. त्याने कधीही कोणत्याही गोष्टीसाठी टिनाला कोणताही शब्द दिला नाही. पण तरीही टिनाने जो काही गोंधळ घातला तो सगळयांनी पाहिला. ज्यावेळी टिना घराबाहेर गेली त्यावेळी तिला बऱ्याच गोष्टी कळल्या तिने आल्या आल्या शिवला तू जे बोलतोस तेच करतोस असे म्हणत तिने शिवची पाठ थोपटली. त्यामुळे बाहेर जाऊन तिला शिवची खरी किंमत कळली असे दिसत आहे. 

शालिनचा खरा चेहरा आला समोर

शालिन-टिनाचा रोमान्स पाहून सगळ्यांनाच कंटाळा आला होता. शालिनची ॲक्टिंग ही सगळ्यांना दिसते. पण टिनाला तो अभिनय कधीच दिसत नव्हता. आधी चिकनसाठी तमाशा, त्यानंतर प्रेमाचा खेळ, टिना बाहेर गेल्यानंतर टिनाविरोधात बोलणे असे सगळे दिसून आले. शालिन कॅमेऱ्यासाठीच सगळ्या गोष्टी करतो हे खूप वेळा दिसले होते. आता तरी शालिनची ॲक्टिंग कमी होईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती. पण आता काही काळ अजून ही ॲक्टिंग पाहायला मिळणार आहे.

साजिदला का मिळतेय स्पेशल ट्रिटमेंट

 घरात साजिदचे वागणेही फार वेगळेच दिसायला मिळत आहे. कोणत्याही खेळात त्याचा सक्रिय सहभाग दिसत नाही. राशनिंग टास्क असो किंवा कॅप्टन्सी कोणत्याही टास्कमध्ये साजिद काहीही करताना दिसत नाही. कोणत्याही टास्कमध्ये सहभागी न होणं, चुकीच्या गोष्टीला योग्य म्हणणे, बिग बॉसचे कोणतेही नियम न पाळणे यामध्ये साजिद पुढे आहे. असे असतानाही या घरात तो टिकून आहे. आता घरात जर कोणी अयोग्य स्पर्धक असेल तर तो साजिद आहे. 

आता टिनाच्या घरात आल्याने कोणती समीकरणं बदलणार आहेत ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Leave a Comment