दिवाळी म्हणजे सगळ्यांचा आवडता सण. यावेळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपल्याला काय काय गिफ्ट्स मिळणार याची उत्सुकता असते. तर यावर्षी काय खास गिफ्ट द्यायचं याचा खूप आधीपासून विचारही केला जातो. पण कधी कधी कामाच्या गडबडीत गिफ्ट्स मागवायचे राहूनही जातात. विशेषतः भाऊबीज आणि पाडव्याच्या दिवशी तर गिफ्ट्स हवेतच. त्यामुळे यावर्षी तुमच्या प्रियजनांना तुम्ही काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न जर तुम्हाला असेल तर आम्ही काही गिफ्ट्स तुम्हाला सुचवत आहोत.
रिश्ता नी लेंथ कुर्ता

दिवाळी म्हटलं की पारंपरिक कपडे, कुर्ता याची खरेदी अगदी गरजेची आहे. तुम्हाला भाऊबीजेसाठी तुमच्या बहिणीला जर काही गिफ्ट द्यायचे असेल तर अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu) आणि माजी मिस इंडिया विजेतील सुश्रुती कृष्णा (Sushruthi Krishna) यांच्या साकी या एथनिक वेअरमधून तुम्ही या नी लेंथ कुर्त्याची निवड करू शकता. बांधणी क्राफ्ट असणारा हा कुर्ता नक्कीच तुमच्या बहिणीला आवडेल. याशिवाय हा अत्यंत मऊ असून रॉयल्टी आणि साधेपणा याचा उत्तम मेळ यामध्ये साधल्याचे दिसून येत आहे.
किंमत – रू. 1699/- (Discount – 849/-)
नितारा सिल्क ब्लाऊज

दिवाळीच्या वेळी आपण अनेक साड्या विकत घेत असतो. पण हल्ली साड्यांवर डिझाईनर ब्लाऊज घालायचा ट्रेंड अधिक आहे. असा हा रॉयल आणि अत्यंत लक्ष वेधून घेणारा असा ब्लाऊज तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. या सणाच्या वेळी तुमच्या साडीला मिसमॅच करण्यासाठी साकी ऑरेंज सिल्क ब्लाऊज मागवा आणि आपल्या बहिणीला गिफ्ट म्हणून द्या.
किंमत – 1999/- (Discount – 999/-)
डोनट्सचे गिफ्ट पॅक

दिवाळीच्या वेळी अनेक ठिकाणी आपण पूजेला जातो. मित्रमैत्रिणींच्या घरी भेट द्यायला जातो. मग तीच मिठाई गिफ्ट देण्याऐवजी तुम्ही डोनट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. दिवाळी हा दीपोत्सव आहे. घराघरात आनंद आणि प्रेम वाटण्याचा उत्सव आहे. त्यामुळे यापेक्षा गोड आणि वेगळे गिफ्ट नक्कीच काही असू शकत नाही. तुम्हाला नेहमीचे लाडू, काजू कतली असे गोड पदार्थ द्यायचे नसतील तर तुम्ही डोनट्सचा विचार नक्कीच करू शकता.
YSL परफ्युम

तुमच्या बहिणीला परफ्युमची आवड असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी महाग आणि तितकेच लक्षात राहण्यासारखे गिफ्ट घ्यायचे असेल तर तुम्ही ब्रँडेड परफ्युम नक्की विकत घेऊ शकता. Tata CLiQ Luxury या वेबवर उपलब्ध असणारे YSL परफ्युम हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. फ्रान्सचा लव्हेंडर इसेन्स, मोरक्कन ऑरेंज आणि युनिक सेंट असे कॉम्बिनेशन यामध्ये असून फ्लोरल सुगंध आवडणाऱ्या व्यक्तीला हे सेंट नक्कीच आवडेल. बोल्ड आणि फ्री अशा कॉम्बिनेशनचे हे परफ्युम गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
किंमत – 5,900/-
BATEEL मिडास चेस्ट डेट्स गिफ्ट बॉक्स

तुमच्या भावाला युनिक गिफ्ट्सची आवड असेल आणि त्याला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही या सणाला त्याच्या आवडीचा असा ब्राँझ रंगाचा डेट्स गिफ्ट बॉक्स देऊ शकता. अत्यंत स्टायलिश आणि महाग असे हे गिफ्ट तुमच्या भावाला नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही आपल्या भावासाठी काहीतरी खास गेल्याचे समाधान मिळेल.
किंमत – 11,430/-
याशिवाय तुम्हाला बाजारातही अनेक वस्तू दिसून येतील जे तुम्ही कस्टमाईज करून आपल्या बहीण वा भावासाठी भाऊबीजेला घेऊ शकता. तसंच तुमच्या आवडत्या व्यक्तींनाही यापैकी गिफ्ट देऊन त्यांची दिवाळी अधिक खास करू शकता. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा (Happy Diwali)