Diwali Festival 2022: वसुबारस ते भाऊबीज – शुभ मुहूर्त आणि तिथी

दिवाळीचा सण हा हिंदू कॅलेंडरप्रमाणे सर्वात शेवटचा सण मानला जातो. याशिवाय हा हिंदूचा सर्वात मोठा सणदेखील मानला जातो. दिवाळाचा सण हा साधारणतः पाच दिवसांचा असतो. पण काही वर्षी हा चार दिवसांचादेखील असतो. यावर्षी अर्थात 2022 मध्ये दिवाळीचे दिवस कसे साजरे करायचे आहेत आणि हा दीपोत्सव कोणत्या तिथीला आणि शुभ मुहूर्तावर साजरा करायचा आहे याची इत्यंभूत माहिती. वसुबारस (Vasubaras 2022), धनत्रयोदयी (Dhantrayodashi 2022), लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan 2022), दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2022), भाऊबीज (Bhaubeej 2022) हे दिवाळीचे दिवस साजरे केले जातात. 

वसुबारस तिथी आणि शुभ मुहूर्त (Vasubaras 2022)

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस हा सण साजरा करण्यात येतो. तर भारतामध्ये काही ठिकाणी याला गुरूद्वादशी अथवा गोवत्स द्वादशी असेदेखील म्हणतात. यादिवशी गाईंसाठी शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतात. हिंदू धर्मामध्ये गाईला मातेसमान मानले जाते. यावर्षी 21 ऑक्टोबर, 2022 रोजी वसुबारस साजरा करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी श्रीकृष्ण आणि गाईची पूजा करण्यात येते. 

सूर्यादय – सकाळी 6.25 

चंद्रोदय – संध्याकाळी 6.03 

द्वादशी तिथीचा आरंभ – 21 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 5.22 

द्वादशी तिथीची समाप्ती – 22 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 6.02

धनत्रयोदशी तिथी आणि शुभ मुहूर्त (Dhantrayodashi 2022)

सौजन्य – Freepik.com

धनत्रयोदशी असेल तेव्हा धन्वंतरीची, लक्ष्मीची पूजा करण्यात येते. अनेक ठिकाणी धन्वंतरी मंदिरातही भक्त जातात. तर याशिवाय सोन्याचांदीसह घरातील वस्तूंचीही पूजा करण्यात येते. यादिवशी घरातील वस्तूंची खरेदी करणे हे अत्यंत खूप शुभ मानण्यात येते. तसंच महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घर खरेदी अथवा जमीन वा वाहनांची खरेदी करायची असेल तर धनत्रयोदशीचा मुहूर्त (Dhantrayodashi Muhurat) अत्यंत चांगला मानण्यात येतो. यामुळे घरात सुखसमृद्धी येते असा समज आहे. यावर्षी 23 ऑक्टोबर, 2022 रोजी धनत्रयोदशी आहे. 

धनत्रयोदशी आरंभ – 22 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 6.02 

धनत्रयोदशी समाप्ती – 23 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 5.44

धनत्रयोदशी खरेदी शुभ मुहूर्त – 23 ऑक्टोबर, 2022 रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6.03 पर्यंत 

पूजा करण्याचा मुहूर्त – 23 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 5.44 ते संध्याकाळी 6.05 पर्यंत 

नरक चतुर्दशी तिथी आणि शुभ मुहूर्त (Narak Chaturdashi 2022)

सौजन्य – Freepik.com

दिवाळीचा आदला दिवस अर्थात आधीच दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. यमराजाच्या पूजनाचा हा खास दिवस. तसंच नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्णाची आणि काली देवतेची पूजा करण्याचीही प्रथा आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला हा सण साजरा करण्यात येतो. 24 ऑक्टोबर, 2022 रोजीचा दिवस हा सण साजरा करण्यात येणार आहे. 

नरक चतुर्दशी मुहूर्त सुरूवात – 23 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 6.03 

नरक चतुर्दशी समाप्ती – 24 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 5.27

यावर्षी तिथीनुसार 24 ऑक्टोबर, 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि लक्ष्मीपूजनही याच दिवशी करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनाचे महत्त्व तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तही जाणून घेऊया. तर लक्ष्मीपूजनाला काय करू नये याचेही तितकेच महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.

लक्ष्मीपूजन मुहूर्त –  24 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 6.08 ते रात्री 8.38 वाजेपर्यंत 

दिवाळी 2022 अर्थात पाडवा (Diwali 2022)

14 वर्षांचा वनवास भोगून जेव्हा राम आणि सीता अयोध्येला परत आले तेव्हा प्रजेने सर्वत्र दीप उजळवून त्यांचे स्वागत केले आणि तेव्हापासून दीपोत्सव करून दिवाळी हा सण साजरा करण्यात येतो. तसंच पती आणि पत्नीच्या नात्याचा हा सण समजण्यात येतो. दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी पत्नी आपल्या पतीला स्नान घालून तो आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे याबाबत सांगते. तसंच पती आपल्या पत्नीला ओवाळल्यानंतर तिच्या आवडीच्या वस्तू भेट देतो. यावर्षी 26 ऑक्टोबर, 2022 रोजी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येणार आहे. तर याच दिवशी भाऊबीजही असल्याने पाडव्याचा मुहूर्त सकाळी काही वेळच आहे. 

पाडवा शुभ मुहूर्त – सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत 

https://dazzlemarathi.com/2022/10/07/diwali-2022-significance-of-lahya-and-batashe-in-marathi/

भाऊबीज (Bhaubeej 2022/Bhai Duj 2022)

सौजन्य – Freepik.com

भावाबहिणीच्या नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया या तिथीच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो. भावाच्या दीर्षायुष्यासाठी बहीण प्रार्थना करून त्याला या दिवशी ओवाळते आणि लग्न झालेल्या बहिणीला भाऊ या दिवशी घ्यायला जातो अशी प्रथा आहे. यावर्षी 26 ऑक्टोबर, 2022 रोजी हा सण साजरा करण्यात येणार आहे. 

भाऊबीज मुहूर्त – दुपारी 1.10 पासून ते दुपारी 3.21 पर्यंत 

2022 मध्ये कोणत्या दिवशी कोणता सण साजरा करण्यात येणार आहे आणि त्याची नेमकी तिथी आणि मुहूर्त काय याची इत्यंभूत माहिती या लेखात देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! (Happy Diwali)

Leave a Comment