Dhanteras 2022: धनत्रयोदयीचा मुख्य देव धन्वंतरीचे मंदिर कुठे आहे भारतात, घ्या जाणून

हिंदुस्तानची (Hindustan) सांस्कृतिक परंपरा आणि पौराणिक कथा या केवळ एकाच राज्यात नाही, भारतात नाही तर अगदी विश्वप्रसिद्ध आहेत. पूर्वेपासून ते पश्चिमपर्यंत आणि उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत भारतात लाखो मंदिरे आहेत, ज्या कोणत्या ना कोणत्या दैवी शक्तीमुळे प्रसिद्ध आहेत. आपण दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी (Dhanteras 2022) धन्वंतरी देवाची (Dhanvantari) पूजा करतो. पण आपल्या भारतात धन्वंतरी मंदिर (Dhanvantari Temple) कुठे आहे याबाबत तुम्हाला माहीत आहे का? भारताचे हृदय समजण्यात येणाऱ्या मध्यप्रदेशमध्ये हे प्रसिद्ध आणि पवित्र धन्वंतरी मंदिर आहे आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने या मंदिराला अनेक भाविक भेट देतात. या लेखातून आम्ही या मंदिराबाबत तुम्हाला आम्ही माहिती देत आहोत. 

मध्यप्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी आहे धन्वंतरी मंदिर (Where Is Dhanvantari Temple)

सौजन्य – Instagram

आम्ही ज्या प्रसिद्ध आणि पवित्र धन्वंतरी मंदिराबाबत सांगत आहोत, ते मध्यप्रदेशातील इंदूर या शहरात वसलेले आहे. हे प्राचीन मंदिर स्थानिक लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. याठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ धन्वंतरीची आरती करण्यात येते. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी सर्वात जास्त भक्तांची रांग असते. इंदूरमधील आडा बाजारात हे मंदिर स्थित असून 182 वर्षांची परंपरा या मंदिराला लाभलेली आहे.  मंदिरामध्ये तीन फूट उंचीची धन्वंतरी देवाची प्रतिमा आहे. यासाठी खास जयपूरवरून दगड मागविण्यात आले होते. सकाळी 9 वाजता धनत्रयोशीला पूजा आणि अभिषेक करण्यात येतो. 

धन्वंतरी मंदिराचा इतिहास (History Of Dhanvantari Temple)

धन्वंतरी मंदिराचा इतिहास खूपच रोचक आहे. 182 वर्ष जुना इतिहास असून या मंदिराचे निर्माण स्वतः देवाने केल्याचा काही लोकांचा समज आहे. तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे प्राचीन राजांनी या मंदिराचे निर्माण केले होते. तर काही जणांच्या सांगण्यानुसार होळकर राजा त्यावेळी आपल्या प्रजेच्या आरोग्यासाठी खूपच चिंतीत होते आणि त्यांनी आपले राजवैद्य यांना धन्वंतरीची प्रतिमा स्थापित करण्यास सांगितले. होळकर राजवंशाच्या वेळी धनत्रयोदशीला आसपासचे वैद्य इथे येऊन स्वतःचे औषध सिद्ध करून दाखवायचे. तत्कालीन होळकर शासन जेव्हा मंदिराच्या समोरून जायचे तेव्हा दर्शन घेतल्याशिवाय कधीही पुढे गेले नाहीत असं सांगण्यात येते. देशात एकूण 9 धन्वंतरी मंदिरे आहेत आणि त्यापैकी सर्वात मुख्य हे मंदिर समजण्यात येते. अधिकतम मंदिरे ही दक्षिण भारतात आहेत. 

धन्वंतरी मंदिराची पौराणिक कथा 

सौजन्य – Instagram

ज्याप्रमाणे या मंदिराचा इतिहास रोचक आहे त्याचप्रमाणे या मंदिराची पौराणिक कथाही अत्यंत रोचक आहे. या मंदिराच्या अनेक पौराणिक कथा आहेत. 

पहिली – काही जणांच्या मते दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी या मंदिराची माती ज्या व्यक्ती आप्लया तिजोरीमध्ये ठेवतात, त्यांना अपार धन प्राप्त होते. 

दुसरी – स्थानिक लोकांच्या मतानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीच्या पूजाअर्चनेने सर्वांना चांगले आरोग्य आणि निरोगी स्वास्थ्य मिळते

तिसरी – इथल्या मान्यतेनुसार, ज्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते, ते भक्त इथे येऊन यज्ञ करतात आणि या यज्ञामुळे धन्वंतरी नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न राहतात. 

धन्वंतरी मंदिर आहे खूपच खास 

हो हे खरं आहे, या मंदिरातील धन्वंतरीची असणारी मूर्ती ही खूपच खास आहे. ही मूर्ती तीन फूट असून जयपूरवरून याच्या निर्माणासाठी मार्बल्स मागविण्यात आले होते. तसंच या परिसरातील राधा – कृष्णाचीही मूर्ती असून ती अतिशय सुंदर आहे. 

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

Diwali 2022: घरातील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काढून टाका हे सामान

Leave a Comment