तुमच्या मुलांना असेल माती खाण्याची सवय, तर अशी सोडवा

घरात मूल असेल तर त्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. वयाच्या काही काळापर्यंत सतत मुलांवर लक्ष द्यावं लागतं आणि त्याची कारणंही अनेक आहेत. मुलं जितकी लाघवी आणि मजेशीर असतात तितकीच ती कोणत्या क्षणी काय करतील हेदेखील सांगता येत नाही. मुलांना काय चांगलं अथवा काय वाईट हेदेखील एका ठराविक वयापर्यंत कळत नसतं. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींची सवयही पटकन लागते. जे त्यांच्या शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकते. यापैकीच एक सवय म्हणजे माती खाणे. माती खाणे हे मुलांसाठी अत्यंत कॉमन आहे. शरीरात कॅल्शियम कमी असेल तर मुलांना माती खाण्याची इच्छा होते आणि लक्ष न दिल्यास, त्यांना ती सवय लागते. जर एखाद्या मुलाने प्रमाणापेक्षा अधिक माती खाल्ली तर नक्कीच ते त्याच्यासाठी चांगले नाही. माती खाण्याची सवय लागणे हा एक आजार आहे, ज्याला पिका असे म्हटले जाते. यामुळे बाळाच्या पोटात जंतू निर्माण होतात आणि बाळाला भूक लागत नाही. तुमच्याही बाळाला माती खायची सवय लागली असेल आणि ती कशी सोडवायची कळत नसेल तर घाबरून जायची गरज नाही. तुम्ही या लेखातील टिप्स वापरा आणि आपल्या बाळाच्या सुरक्षेची काळजी घ्या.  

डाएटमध्ये करा जिंकचा समावेश (Use Zink)

ज्या मुलांना माती खाण्याची सवय असते त्यांच्या शरीरात बरेचदा जिंकचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांच्या डाएटमध्ये तुम्ही जिंकचा समावेश करून घेऊ शकता. यामुळे माती खाण्यापासून तुम्ही रोख लावू शकता. काही नैसर्गिक फूड्स अथवा सप्लिमेंट्सचा आणि मल्टिविटामिन्सचा वापर करून अर्थात मुलांना अशा पदार्थांचे सेवन करायला लाऊन तुम्ही त्यांची माती खाण्याची सवय सोडवू शकता. 

लोहाचा करा समावेश (Needs More Iron)

सौजन्य – Freepik.com

जिंकप्रमाणेच पिका आणि माती खाण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण आहे ते म्हणजे लोहाची कमतरता शरीरात असणे. तुमच्या बाळाच्या आहारात आयर्नयुक्त अर्थात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोह आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतो आणि लोहाची कमतरता हे कुपोषणालाही बाधित ठरते. तुमचे बाळ जर सतत माती खाण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या बाळाच्या अंगात हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी ही नक्कीच कमी असते आणि त्यामुळे त्याची व्यवस्थित तपासणी करून त्यानुसार पदार्थांचा समावेश खाण्यात करून घेण्याची गरज आहे. 

केळं (Banana For Health)

सौजन्य – Freepik.com

केळं हे पोटॅशियमने युक्त असे फळ आहे, जे मुलांसाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. केळं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. केळ्यात असे अनेक पोषक तत्व आढळतात जे मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. शारीरिक विकासासाठीही फायदेशीर ठरते.  तुमचे बाळ माती खात असेल तर तुम्ही केळ्यात मध आणि दूध मिक्स करून आपल्या मुलाला खायला द्या. माती खाण्याच्या बाळाच्या इच्छेवर मात करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरते आणि त्याशिवाय बाळाला आरोग्यदायी खाणे मिळून त्याचे पोट भरलेले राहते. यामुळे माती खाण्याची सवय पटकन सुटते. 

लवंग पाणी (Clove Water)

सौजन्य – Freepik.com

लवंगेचे पाणीही मुलाची माती खाण्याची सवय सोडविण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही लवंग घालून पाणी उकळून घ्या. हे पाणी थंड करा आणि गाळून बाळाला प्यायला द्या. जर तुमचं मूल लवंगेचे पाणी पित नसेल तर तुम्ही त्यात मध मिक्स करा आणि पिण्यासाठी द्या. नियमित याचे सेवन केल्यास, मुलाची माती खाण्याची सवय सुटते. 

ओव्याचे पाणी (Ajwain Water)

सौजन्य – Freepik.com

तुमच्या मुलाची माती खाण्याच्या सवयीपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या वेळी त्यांना ओव्याचे पाणी पिण्यासाठी द्या. यामुळे ही सवय सुटेल आणि त्याशिवाय मुलांना कॅल्शियमयुक्त पदार्थही खायला द्या. जेणेकरून त्यांना माती खाण्याची इच्छा होणारच नाही. 

हे सोपे उपाय करून तुम्ही माती खाण्याची मुलांची सवय नक्कीच सोडवू शकता. मुलांना ओरडून वा मारून अशा सवयी सोडवता येत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा. 

Leave a Comment