Diwali 2022: दिवाळीसाठी वापरा हे लिपस्टिक्सचे 4 शेड्स

अनेक महिला आणि मुली आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लिपस्टिक्सच्या वेगवेगळ्या शेड्स (Lipstick Shades) वापरतात आणि मेकअपचा (Makeup) वापर करतात. आता लवकरच दिवाळी (Diwali 2022) सुरू होत आहे. या सणाला महिला आपल्या आऊटफिट्सपासून ते आपल्या फुटवेअरपर्यंत सगळ्याच गोष्टींकडे विशेष लक्ष देत असतात. पण बाकी कितीही तयारी केली तरीही लिपस्टिकची नक्की कोणती शेड वापरायची यासाठी अनेकदा गोंधळ उडताना दिसतो. कधीतरी कपडे छान असले तरीही लिपस्टिकच्या शेडमुळे लुक खराब झालेला दिसून येतो. तुमच्यासहदेखील असं होत असेल तर तुम्ही ताण घ्यायची गरज नाही. तुमच्या स्किन टोन (Skin Tone) साठी नक्की कोणती लिपस्टिक शेड मॅच करू शकेल हे आम्ही या लेखातून देत आहोत. दिवाळीसाठी खास लुक करताना तुम्हीही वापरा या 4 लिपस्टिक शेड्स आणि दिसा अधिक आकर्षक!

कॉपर ब्राऊन लिपस्टिक शेड (Copper Brown Lipstick Shade)

Lakme Cushion Matte Lipstick

कॉपर ब्राऊन एक असा रंग आहे जो कोणत्याही वयातील महिलांना आकर्षक दिसतो. तसंच कोणत्याही कपड्यांवर ही लिपस्टिक शेड अत्यंत उठावदार दिसते. तसंच ही लिपस्टिक शेड अत्यंत क्लासी दिसते. दिवाळीच्या सणाव्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही कार्यक्रमालादेखील तुम्ही ही लिपस्टिक शेड वापरू शकता. त्यामुळे तुमच्या लुकमध्येही फरक पडतो. 

बेज कलर लिपस्टिक शेड (Beige Color Lipstick Shade)

Faces Canada

बेज कलर हा अत्यंत युनिक आहे. तुम्हाला जर गडद रंग आवडत असेल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करून घेऊ शकता. याचा रंग अत्यंत उत्तम आहे आणि तुमचा संपूर्ण लुक बदलण्यास फायदेशीर ठरतो. विशेषतः सणाच्या वेळी अशा पद्धतीची गडद लिपस्टिक ही तुम्हाला अधिक आकर्षक बनवते. ही शेड तुम्ही दिवाळीशिवाय कोणत्याही पार्टीसाठीही वापरू शकता. बोल्ड आणि क्लासी लुकसाठी या रंगाचा वापर तुम्ही करून घ्या. 

डस्क रोझ कलर लिपस्टिक शेड (Dusk Rose Color Lipstick Shade)

Miss rose Pretty Matte Lipstick

या लिपस्टिक शेडच्या नावाप्रमाणेच याचा रंगही युनिक आहे. तुमच्या ओठांना नैसर्गिक रंग आणि लुक देण्यासाठी याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. डस्क रोझ कलर हा अत्यंत लाईट असतो. त्यामुळे अधिक महिलांना हा रंग आवडतो. अनेक महिलांना लिपस्टिक्सच्या गडद शेड्स आवडत नाहीत. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या सणाच्या वेळी अशा रंगाची निवड करणार असाल तर नक्कीच उत्तम ठरेल. तुम्हाला दिवाळीसाठी नैसर्गिक लुक करणार असाल, तर हा रंग तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरतो. 

वाईन कलर (Wine Color)

Lakme Forever Matte Liquid Lip Colour, Wine Touch, 5.6 ml

दिवाळी असो वा घरचे कोणतेही कार्यक्रम अर्थात लग्न, मुंज कोणतेही समारंभ असतील तर वाईन रंगाची लिपस्टिक ही अगदी परफेक्ट आहे. कोणत्याही कपड्यांसह ही लिपस्टिक उत्तम ठरते. तसंच तुमचे ओठ वाईन रंगाची लिपस्टिक लावल्यास अधिक आकर्षक दिसतात. 

या गोष्टींची घ्या काळजी 

  • ओठांच्या काळेपणापासून वाचण्यासाठी नेहमी ब्रँडेड लिपस्टिकचाच वापर करावा 
  • लिपस्टिकचे अधिक कोट्स लावू नयेत. अन्यथा तुमचे ओठ दिसायला घाण दिसतात आणि लिपस्टिकचा रंगही शोभून दिसत नाही
  • रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही न विसरता लिपस्टिक रिमूव्हर लावा आणि लिपस्टिक काढून टाका 
  • लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचाही उपयोग करून घेऊ शकता

Leave a Comment