Bigg Boss 16 : स्टॅन आणि शालिनमध्ये झाला असा राडा की…

बिग बॉसच्या घरातील एक नवा राडा आता डोक्याला ताप होणार आहे. शुक्रवारचा वार अगदी जवळ असताना घरात झालेला हा राडा कोणासाठी त्रासदायक ठरणार आहे ते उद्या कळेलच. पण घरात नेमकं झालं तरी काय? असा विचार करत असाल तर हा राडा शिवने अजिबात केलेला नाही. घरातील तसा शांत सदस्य स्टॅन (Mc Stan) आणि दुसरा चिकन भक्त सदस्य शालिन (Shalin bhanot) यांच्यामध्ये हा राडा झाल्याचे दिसून आले आहे. राडा सुरु एका गोष्टीवरुन झाला आणि त्याचे पर्यवसान चुकीच्या भांडणात झाले. आता या गोष्टीमुळे घरात पुन्हा एकदा गटामध्ये बदल होताना दिसणार आहे.

नेमकं झालं काय?

घरात टिना (Tina Dutta) आणि स्टॅनचे चांगले संबंध आहेत. टिना लिव्हिंग रुममध्ये येत असताना तिला जोरात ढेच लागली. तिला ढेच लागलेली पाहून शालिन किचनमधून आणि स्टॅन जवळच असताना तिथे आला. स्टॅन तिला काय लागले हे पाहण्यासाठी थांबला. पण तेवढ्यात त्याच्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. ही बाचाबाची एवढी वाढली की, शालिनने त्याला त्याच्या खासगी गोष्टीवरुन शिव्या देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम स्टॅन चिडला. तो शालिनच्या अंगावर धावून जाताना दिसला. त्याला अडवण्यासाठी शालिनने त्याला पकडून धरले. शिवने त्याला सोड असे सांगण्यासाठी शालिनला थोडा धक्का दिला. पण त्याचाही अर्थ चुकीचा काढण्यात आला. शिवने तुला मारले असे सांगून अनेकांनी त्याला भडकवले. पण ज्यावेळी टिना आली तिने शालिनला तो चुकला असे सांगितले.

सुम्बुलचा अजब ड्रामा

घरात शालिनवर लट्टू झालेली सुम्बुल शालिनचे कोणतेही प्रकरण असो त्यात खरे किंवा खोटे काय ते जाणून न घेता शालिनची बाजू घेण्यासाठी पुढे येते. याचा परिणाम असा की,स्क्रिनवर सुम्बुल अजूनही शालिनच्या प्रेमात वेडी दिसते. घरात एकीकडे वाद सुरु असताना शालिनला आवरताना सुम्बुल दिसली. पण सुम्बुल ज्यापद्धतीने वागत होती. त्यामुळे ती खूप चुकीच्या पद्धतीने जातेय असे दिसून येत आहे. तिच्या वडिलांनी येऊन खास तिला याबद्दल ताकिद दिली होती. पण त्याचा कोणताही परिणाम तिच्यावर झालेला दिसत नाही. आता सुम्बुलच्या अशा वागण्यामुळे तिच्या चाहत्यांवर नक्कीच परिणाम होऊ लागला आहे. ज्याचे तिला नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोणाला होईल फायदा?

घरात सध्या एक गट खूप स्ट्राँग दिसून आला होता. ज्यामध्ये शिव, स्टॅन, शालिन, टिना, साजिद, निमरित, अब्दू, सुम्बुल यांचा समावेश आहे. सध्या खेळात टिकण्यासाठी आणि आपली मक्तेदारी गाजवण्यासाठी त्यांची एकी चांगली आहे. पण काल झालेल्या भांडणानंतर आता दुसऱ्या गटाची प्रियांका आणि अंकित यांनी फायदा उचण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. प्रियांकाच्या उद्धट बोलण्यामुळे तिला आधीच घरात कोणी जास्त पसंत करत नाही. पण या भांडणातून फायदा काढण्याचा प्रयत्न तिने पुरेपूर केलेला आहे. 

आता स्टॅनला सलमान काय बोलतो? कोणाला याचा फटका बसेल हे वीकेंडचा वारमध्ये नक्कीच कळेल. 

Leave a Comment