Bigg Boss 16: अर्चनाने लावली आग, सुंबुल आणि शालिनमध्ये पुन्हा घमासान

सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात आल्यापासून नेहमीच शालिनच्या मागे मागे दिसून येत होती. गेले 6 आठवडे समजावल्यानंतर मात्र आता सुंबुल आपल्या खऱ्या अवतारात दिसून येणार असल्याचे आज प्रोमोमधून दिसून येत आहे. 22 नोव्हेंबरच्या भागाचा प्रोमो प्रसारित झाला असून शालिन आणि टीनाच्या विरूद्ध सुंबुल आवाज उठवताना दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात सलमान खानने सुंबुलवर निशाणा साधत तिला खडे बोल सुनावले. तर सुंबुलने त्यानंतर कन्फेशन रूममध्ये जाऊन आपल्या वडिलांशी फोनवरून संभाषणही केले. वडिलांशी बोलल्यानंतर सुंबुलला हिंमत मिळाली. तर तिच्या वडिलांनी नॅशनल टेलिव्हिजनवर टीना (Tina Datta) आणि शालिनला (Shalin Bhanot) त्यांची जागा दाखवून दे असं सांगितले. त्यानंतर सुंबुलने घरात आपली बाजू मांडणे सुरू केले आहे आणि आता टीन आणि शालिनविरोधात सुंबुल उभी राहिली आहे. 

सुंबुलचा राग अनावर

आजच्या भागाचा नवा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अर्चना गौतम (Archana Gautam) घरामध्ये सर्वांना सांगते की ‘रूम ऑफ 4’ अत्यंत घाणेरडी आहे. टीना आणि शालिन या रूमचा भाग असून अर्चनाने याचाच फायदा उचलत आग लावली आणि इतकंच नाही तर त्या आगीत तेलही ओतले. संपूर्ण घरभर सुंबुलच एकटी बिचारी काम करत फिरते असं अर्चनाने सांगितले. संपूर्ण दिवस सुंबुल काम करत असते. सुंबुलला बिचारी म्हटल्यामुळे टीना अधिक भडकते आणि त्यानंतर शालिन आणि सुंबुलमध्ये वाद झालेले दिसून येत आहेत.

अर्चनाच्या भडकवण्याने शालिन – सुंबुल भिडले

https://twitter.com/bb16_lf_updates/status/1594751617798004736?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1594751617798004736%7Ctwgr%5E843e1f568abe34ec94a83df377d92395e7af7495%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fentertainment%2Fnews-from-bollywood%2Franveer-singh-response-to-reporter-who-forgot-his-name-video-impress-fans-at-f1-race-abu-dhabi%2Farticleshow%2F95669281.cms

टीना अर्चनाला सुंबुलला बिचारी म्हटल्यामुळे उलटसुलट बोलते. त्यावर अर्चना बाहेर येऊन नाचताना दिसत आहे. तर त्यानंतर टीना शालिनला जाऊन सांगते. शालिन येऊन सुंबुलला म्हणतो, कोणी आपल्या माणसांबाबत बोललं तर सुंबुलने त्यावर स्टँड घ्यायला हवा. त्यावर सुंबुल भडकते आणि त्याला म्हणते मी काय करायचं हे मला कोणीही सांगायची गरज नाही. मी त्याच लोकांबरोबर उभी राहते जे वाट काळात माझ्यासह उभे राहतात. त्यामुळे शालिनने आपल्याला कोणताही सल्ला देऊ नये असे उलट उत्तर सुंबुल देताना दिसत आहे. टीनाने आपल्यावर वाईटसाईट आरोप लावले, त्यानंतर मी तिच्या बाजूने बोलू? शक्यच नाही. हे सर्व पाहून शालिनदेखील थक्क झालेला दिसून येत आहे. 

पण सुंबुलचे हे वागणे टीना आणि शालिनसाठी असेच राहणार का? हे पाहावे लागेल. कारण आतापर्यंत शालिनच्या बाबतीत नेहमीच सुंबुल आपला राग विसरून जाताना दिसून आली आहे. पण सुंबुलचे हे रूप चाहत्यांना नक्कीच आवडले आहे. कारण पहिल्या आठवड्यापासून सतत रडणारी आणि शालिन टीनाच्या मागे फिरणारी सुंबुल कोणालाच आवडत नव्हती. इतकंच नाही तर तिला समजावण्यासाठी तिच्या वडिलांनाही आणावे लागले होते. 

सुंबुलच्या वडिलांवर टीका

टीव्हीवर शालिन आणि टीनाबाबत वक्तव्य करणं सुंबुलच्या वडिलांना महागात पडले आहे. शालिन आणि टीनाच्या चाहत्यांनी सुंबुलच्या वडिलांना फैलावर घेतले आहे. स्वतःच्या मुलीची चूक लपविण्यासाठी दुसऱ्याच्या मुलीवर आळ घालणे आणि चुकीच्या शब्दांचा वापर यामुळे तौकीर खान यांना सध्या चाहत्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. मात्र आपल्या वडिलांचा सल्ला सुंबुल आता किती ऐकणार आणि पुढे काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

Leave a Comment