गौतम – सौंदर्याचा रोमान्स पाहून शिव-अब्दुने उडवली खिल्ली, मजेदार व्हिडिओ

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा आता हा 5 वा आठवडा चालू झाला आहे. पहिल्या आठवड्यापासूनच प्रत्येक स्पर्धक काहीतरी वेगळेच करताना दिसून येत आहे. दोन आठवडे गौतम विग (Gautam Vig) आणि सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) यांच्या एकत्र असण्यावर अगदी सलमान खानपासून (Salman Khan) करण जोहरपर्यंत (Karan Johar) सर्वांनीच शंका घेतली होती. मात्र या दोघांचे नाते ऑन – ऑफ चालू आहे. मात्र आपल्याला एकमेकांसाठी वाटणाऱ्या भावना या खऱ्या असल्याचे दोघांनीही म्हटले आहे. तर आता या दोघांमधील जवळीक अधिक वाढल्याचा प्रोमो बिग बॉसने दाखवला होता. मात्र या दोघांचा रोमान्स संपूर्ण घर पाहात होते आणि त्यातही अब्दु रोझिक (Abdu Rozik) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) या दोघांनी मिळून गौतम आणि सौंदर्याची नक्कल करत रोमान्सची खिल्ली उडवली आहे. सध्या सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया दिसून येत आहे. 

अब्दु बनला सौंदर्या आणि शिव बनला गौतम 

बिग बॉसच्या सोमवारच्या भागात सौंदर्या आणि गौतम यांचा रोमान्स सुरू असलेला दिसून येत आहे. सौंदर्या गौतमच्या मांडीवर बसली आहे आणि दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आहेत. तर समोरच्या खिडकीतून शिव आणि अब्दु हे सर्व पाहत आहेत. तर त्या दोघांना पाहून शिव आणि अब्दुने त्यांची नक्कल करत खिल्ली उडवायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यावर अब्दु शिवच्या मांडीवर जाऊन बसत म्हणाला, ‘बेबी-बेबी काय करतोस, हा रियालिटी शो आहे. माझे आई-बाबा बघत आहेत बाहेर’ आणि दोघेही एकमेकांना किस करतात. तर अब्दु हे सगळे बघून खूपच हसताना दिसून येत आहे. 2-3 तास बाथरूममध्ये जाऊन किस करण्याबाबतही अब्दुने शिवशी चर्चा केली आणि खूपच मजेशीर तोंड करून दोघेही हसत होते. तर हे सगळं झाल्यावर पुन्हा पुन्हा दोघेही खिडकीतून गौतम आणि सौंदर्याला बघत हसत होते. इतकेच नाही तर निमरित, टीना, साजिद यांनीदेखील गौतम आणि सौंदर्याचा हा रोमान्स पाहिला मात्र याकडे दुर्लक्ष केले. 

नेटिझन्स भडकले 

या गोष्टीचा प्रोमोही प्रसारित करण्यात आला होता. सोशल मीडियावर अनेकांनी गौतम आणि सौंदर्याला ईशान आणि माएशाचे सस्ता व्हर्जन असेही म्हटले आहे. इतकंच नाही तर हे सर्व खोटे असून बाहेर आल्यानंतर हे दोघेही ब्रेकअप करून वेगळे होतील असंही सांगितलं आहे. हे प्रेम नसून सर्व काही खोटे आहे हेच दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया आता दिसून येत आहेत. गौतम आणि सौंदर्याचा हा #fake रोमान्स सध्या ट्रोल होताना दिसून येत आहे. 

शिव आणि अब्दुच्या जोडीला प्रेम 

तर दुसऱ्या बाजूला शिव आणि अब्दुच्या #shivbdu जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. दोघांची मस्ती आणि दोघांमधील मैत्री ही प्रेक्षकांना आवडत आहे. शिव अब्दुची घेत असलेली काळजी ही अत्यंत खरी असल्याचे दिसून येत आहे. अगदी पहिल्या आठवड्यापासून या दोघांचे सूर जुळले आहेत आणि त्यामुळेच हे दोघेही प्रेक्षकांना अत्यंत खरे वाटत आहेत. याशिवाय अब्दु आणि शिव दोघेही जे खरं आहे तेच बोलतात. उगीच कोणाच्याही मागून बोलत बसत नाहीत. अब्दुला जे कळत नाही ते शिव समजावून सांगतो हेदेखील अनेकदा दाखविण्यात आले आहे.

Leave a Comment