घनदाट आयब्रो हव्या असतील तर वरदान ठरेल हे तेल

बऱ्याच महिलांना घनदाट आयब्रो (Thick Eyebrows) आवडतात. पण अनेक महिलांचे भुवयांवरील केस हे पातळ असतात. दाट भुवया तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतात. तसे तर भुवयांचे केस वाढविण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण या लेखातून आम्ही तुम्हाला अगदी सोपे उपाय सांगणार आहोत. एक असे तेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भुवया नक्कीच घनदाट करू शकता. ते तेल म्हणजे ऑलिव्ह ऑईल (Olive Oil). ऑलिव्ह ऑईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयब्रोच्या केसांची वाढ लवकर आणि चांगली करून घेऊ शकता. वास्तविक यामध्ये ओलयुरोपिन नावाचे एक पोषक तत्व असते, जे केसांची अधिक चांगली वाढ करण्यास फायदेशीर ठरते. भुवयांचे केस घनदाट करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा कसा उपयोगय करून घेऊ शकता त्याची पद्धत घ्या जाणून. 

ऑलिव्ह ऑईल आणि विटामिन ई ऑईल (Olive Oil And Vitamin E Oil)

सौजन्य – Freepik.com

साहित्य 

 • 2 थेंब ऑलिव्ह ऑईल
 • 1 थेंब विटामिन ई ऑईल 

कृती 

 • ऑलिव्ह ऑईल आणि विटामिन ई ऑईल एकत्र मिक्स करून घ्या 
 • मस्कारा ब्रशच्या मदतीने तुम्ही हे मिश्रण तुमच्या भुवयांवर लावा 
 • रात्रभर हे असंच भुवयांवर राहू द्या
 • तुम्ही रोज हा उपाय केल्यास, लवकरच तुमच्या आयब्रो तुम्हाला घनदाट झालेल्या दिसून येतील

ऑलिव्ह ऑईल आणि गुलाबपाणी (Olive Oil And Rose Water)

सौजन्य – Freepik.com

साहित्य 

 • 5 थेंब ऑलिव्ह ऑईल
 • 5 थेंब गुलाबपाणी 

कृती 

 • ऑलिव्ह ऑईल आणि गुलाब पाणी मिक्स करा आणि भुवयांवर लावा 
 • हे मिश्रण तुम्ही रात्रभर भुवयांना लावून ठेऊ शकता 
 • तुम्ही नियमित स्वरूपात याचा वापर केल्यास, भुवयांचे केस वाढतील आणि आयब्रो घनदाट होतील

ऑलिव्ह ऑईल आणि कोरफड जेल (Olive Oil And Aloe Vera Gel)

सौजन्य – Freepik.com

साहित्य 

 • 5 थेंब ऑलिव्ह ऑईल
 • 2 थेंब कोरफड जेल 

कृती 

 • ऑलिव्ह ऑईल सर्वात पहिल्यांदा कोरफड जेलमध्ये मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही भुवयांवर लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या 
 • या घरगुती पद्धतीचा वापर तुम्ही नियमित करा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल
 • तुमच्या भुवयांचे केस गळत असतील तर ती समस्या कमी होण्यासाठीही याचा फायदा होतो 

भुवयांच्या केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे 

सौजन्य – Freepik.com
 • ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब तुम्ही आयब्रोवर लावा आणि नियमित मसाज करा. यामुळे तुमच्या भुवयांच्या आसपास ब्लड सर्क्युलेशन (Blood Circulation) चांगले होते आणि केस वाढण्यास मदत होते
 • तुमच्या आयब्रोचे केस खूपच पातळ असतील आणि गळतही असतील तर ऑलिव्ह ऑईलचा वापर करून तुम्हाला हे थांबवता येईल
 • ऑलिव्ह ऑईलमुळे भुवयांमध्ये झालेल्या कोंड्याची समस्याही कमी होते 
 • जर तुमच्या आयब्रोजवळ स्किन इन्फेक्शन (Skin Infection) झाले असेल तर ऑलिव्ह ऑईलच्या मदतीने तुम्ही हे कमी करू शकता 

या गोष्टींची घ्या काळजी 

सौजन्य – Freepik.com
 • वर सांगितलेले घरगुती उपाय करण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्या की, तुमच्या डोळ्यांना यामुळे कोणतीही इजा होणार नाही 
 • तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याची गरज नाही 
 • तुमच्या त्वचेवर कोणतेही इन्फेक्शन असेल अथवा तुमच्या चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही यापैकी कोणत्याही उपायांचा वापर करू नका
 • हे उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या

Leave a Comment