अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्याकडे लक्ष देतो, पण मानेकडे मात्र दुर्लक्ष होते. त्यामुळे मानेवर पुढे आणि मागेदेखील काळसरपणा वाढतो. याचे कारण म्हणजे मानेवरील मळ वाढणे. आपल्याला घाम आल्यानंतर मानेवर तो साचतो आणि नीट स्वच्छता न केल्यास, मान काळी पडू लागते. पण मग मानेवरील हा मळ नक्की कसा घालवायचा? (How to Remove Neck Dirt) याच्या काही सोप्या टिप्स (Tips to Remove Dirt Of Neck) आम्ही तुम्हाला यातून सांगत आहोत. तुम्ही याचा वापर केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल.
साखर आणि मधाचा स्क्रब (Sugar and Honey Scrub)

साखर आणि मध हे त्वचेसाठी दोन्ही उत्तम साधन मानले जाते. मधामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला अधिक मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बऱ्याचदा चेहऱ्यावरही हा स्क्रब वापरण्यात येतो. मानेवरील मळ काढण्यासाठीही याचा चांगला उपयोग करून घेता येतो
- 1 चमचा साखर, 1 चमचा आणि 1 चमचा लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या
- मानेवर हे मिश्रण लावा आणि स्क्रब करा
- साधारण 10 मिनिट्सने स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून असे दोन वेळा केल्यास, मानेवरील मळ निघून जाण्यास मदत मिळते
दूध आणि बेसन पॅक (Milk and Besan Pack)

दूध आणि बेसन या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी चांगल्या ठरतात. बेसनामुळे त्वचेवर तजेलदारपणा आणि उजळपणा येतो. तसंच दुधातील पोषक तत्वामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास आणि मऊ राहण्यास मदत मिळते.
- बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि दूध मिक्स करून पेस्ट तयार करा
- ही पेस्ट मानेला लावा आणि हलक्या हाताने घासा
- सुकल्यानंतर हाताने घासून हे काढा. यामुळे मानेचा काळेपणा आणि मळ दूर होईल आणि रंग उजळेल
बेसन आणि लिंबू (Besan And Lime)

लिंबू सहसा त्वचेवर डायरेक्ट लावता येत नाही. त्यामुळे बेसन आणि लिंबाचा एकत्र वापर करून तुम्ही मानेवरील मळ काढू शकता. लिंबामध्ये विटामिन सी हे त्वचेवरील काळेपणा दूर करण्यास मदत करते
- बेसनामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि पेस्ट तयार करून ही पेस्ट मानेला लावा
- साधारण 10-12 मिनिट्स तसंच राहू द्या
- त्यानंतर हाताने घासून काढा आणि मग पाण्याने धुवा
बटाट्याचा रस (Potato Juice)

बटाट्यामध्ये असणारे तत्व त्वचेवरील मळ आणि काळेपणा हटविण्यासाठी उपयोगी ठरतात. बऱ्याचदा काखेतला काळेपणा कमी करण्यासाठीही याचा वापर केलेला वाचनात येते. त्याचप्रमाणे मानेचा मळ काढण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो.
- बटाट्याचा रस काढून घ्या आणि मानेवर लावा
- साधारण पाच मिनिट्सने धुवा
- असे आठवड्यातून दोन वेळा करा
बदामाचे तेल (Almond Oil)

बदाम तेल हे मळ घालविण्यासाठी अत्यंत उत्तम ठरते. रोज मानेवरील मळ काढण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल मानेला लावा आणि काही वेळ मसाज करा. यामुळे मानेवर मळ साचत नाही आणि त्याशिवाय तुमची त्वचाही तजेलदार राहाते.
पपई पॅक (Papaya Pack)

पपई ही त्वचेला आकर्षक ठेवण्यासाठी उत्तम ठरते. पपईचा नुसता रस जरी त्वचेला नियमित लावला तरीही त्वचा तुकतुकीत राहण्यास मदत मिळते.
- पपईचा गर काढून त्याचा पल्प बनवा आणि त्यामध्ये मध मिक्स करा
- हे मिश्रण मानेला लावा आणि काही वेळ तसेच ठेवा
- काही दिवसातच तुम्हाला मानेवरील मळ निघून गेलेला दिसून येईल
तुमच्याही मानेवर मळ साचत असेल तर हे उपाय नक्की करून पाहा. यापैकी कोणत्याही पदार्थाची अलर्जी असल्यास वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका. अशाच टिप्स वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा.